कडक मंगळ ग्रह आज या 5 भाग्यवान राशींवर झाले प्रसन्न, समृद्धीचे वरदान देवून तारणार सर्व संकटातून…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।
स्थिरासनो महाकायः सर्वकर्मविरोधकः।।
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।
धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः।।

आज देवतांचे सेनापती असणाऱ्या मंगळग्रहाची विशेष कृपादृष्टी झालेल्या या ५ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, वृश्चिक, मकर आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आजचा दिवस आपणांस संमिश्र फलदायी आहे. ग्रह आज तुम्हाला बोलण्यात व वागण्यात संयम ठेवून, क्रोधापासून दूर राहण्याची सूचना करत आहेत. आपल्या गुप्तशत्रूंबद्दल सावधगिरी बाळगा. आज आपणास रहस्यमय गोष्टींमध्ये रस असेल आणि गूढ विषयांबद्दल तुमचे आकर्षण अधिक असेल. कदाचित प्रवास घडेल पण तो आज पुढे ढकलणे, कारण प्रवासात अनपेक्षित व्यत्यय येऊ शकतात. आज कोणतीही नवीन कामे सुरू करू नका. आध्यात्मिक साधना नामस्मरणाने मनःशांती मिळेल.

Advertisement

वृषभ : ग्रह म्हणतात की आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल. तुम्हाला मानसिक आनंदही मिळेल. कुटुंब आणि प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवाल. आपणांस सामाजिक जीवनात यश आणि कीर्ती मिळेल. परदेशातून किंवा दूरवरून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. वैवाहिक आनंद मिळेल. आकस्मिक धनलाभ होईल.

मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील, असे ग्रह म्हणतात. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. सुखदायी घटना घडतील. खर्चही होतील, परंतु ते लाभदायकच ठरतील. आर्थिक फायद्याचीही शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. महिला मित्रांसह भेटी होतील. रखडलेली कामे होतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे विनासायास होतील. सहका-यांचे सहकार्य मिळेल. स्पर्धकांवर विजय मिळवाल.

See also  श्री महालक्ष्मी आज या 6 भाग्यवान राशींवर झाल्या आहेत प्रसन्न, समृद्धीचे वरदान देवून तारणार सर्व संकटातून…
Advertisement

कर्क : ग्रह म्हणतात की आज थोडी काळजी घेण्याचा दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य नाही. मानसिक अस्वस्थता आणि घालमेल तुमच्या मनावर अधिराज्य गाजवेल. शरीरही अस्वस्थ होईल. ओटीपोटात दुखणे, विशेषत:, अपचन मंदाग्नी यासारख्या आजारांनी आपण त्रस्त असाल. आकस्मिक पैसे खर्च होतील. प्रिय व्यक्ती मनाला दुखवून अबोला धरु शकतात. अति कामुकतेमुळे मानहानी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. शक्यतो प्रवास टाळा.

सिंह: आपला आजचा दिवस शुभ नाही, असं ग्रह सांगतात. घरात वादविवादाचे वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांसह झालेला कलह आपल्या मनाला दुखवेल. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. मन अधिक चिंताग्रस्त असेल. नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देतील. आईची तब्येत ढासळेल. निद्रानाश सतावेल. आपण थोडे अधिक संवेदनशील व्हाल. जलाशय आणि ललनांपासून जपून. भोजनवेळा टळतील. नोकरीबद्दल चिंता असेल. कर्ज, प्रॉपर्टीच्या इ. कामात एकतर जमीन राहूच नका. शक्यच नसल्यास सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून मगच सही करा.

Advertisement

कन्या: आज ग्रह तुम्हाला कोणासही विचारात न घेता, अविचाराने कोणत्याही कार्यात सहभागी होण्यास मनाई करत आहेत. मित्रांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आपण भावनिक दृष्टया नरम व्हाल. मित्रमंडळी, नातेवाईकांची भेट होईल. भाऊ-बहिणींपासून फायदा होईल. आज आपण प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यास सक्षम असाल. गुढविद्या, रहस्यमय आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्याल.

See also  आज श्री गजानन महाराज करणार चमत्कार, या 8 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

तुला: ग्रह म्हणतात की आज तुमचे मन कोंडीत अडकेल. निर्णय न घेतल्यामुळे नवीन कामे सुरू करणे आपल्यासाठी आज फायदेशीर नाही. आज आपणास नातेसंबंधात औपचारिकता, परकेपणा जाणवण्याची शक्यता आहे. स्वभावातील हट्टीपणा कमी करा, असा ग्रहांचा सल्ला आहे. परावलंबी न राहणे फायद्याचे आहे. आर्थिक फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. आज कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेऊ नका, असं ग्रह म्हणतात. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

Advertisement

वृश्चिक: आज सुखमय दिवस असेल असे ग्रह सांगतात. शारीरिक व मानसिक सौख्य मिळून आनंद प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ घालवला जाईल. मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. प्रियजनांसोबतची भेट यशस्वी होईल. चांगली बातमी मिळेल. सुखद प्रवासाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

धनु: आज काही वेदनादायक योग आहेत त्यामुळे ग्रह काळजीपूर्वक रहाण्याचा सल्ला देताहेत. कुटुंबातील सदस्यांसह कौटुंबिक कलह उपस्थित असेल. विशेषत: आपल्या स्वभावामुळे, वाणीमुळे कोणाशीही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आज तब्येत बिघडू शकते. बोलण्यात व वागण्यात संयम ठेवा. अपघातातून सावराल. जास्त पैसा खर्च होईल. कोर्ट-कचेरीच्या प्रश्नांबाबत काळजीपूर्वक पावले उचला. अविचारी कृतीने मनःशांती नष्ट होऊ शकते.

Advertisement

मकर: आज सामाजिक कार्य केल्याने आपल्याला फायदा होईल असे ग्रह म्हणतात कारण आज विविध क्षेत्रांतून फायदा होण्याचे चांगले योग आहेत. मित्र आणि नातेवाईकांची भेट तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कमी मेहनत करुनही आज यश मिळू शकते. शुभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. आपल्याला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आज कोणतीही खरेदी करणे शुभ आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचा आर्थिक फायदा होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील.

See also  श्रीखंडेराया या 5 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच मिळणार आनंदाची बातमी …

कुंभ: आज तुमचा आनंदाचा दिवस असल्याचे ग्रह म्हणत आहेत. आपले प्रत्येक कार्य सहजपणे केले जाईल, ज्यामुळे आपण आनंदी व्हाल. नोकरी,व्यापार आणि व्यवसाय कार्यस्थळावर अनुकूल वातावरण राहील आणि आपणास चांगले यश मिळू शकेल. उच्च अधिकाऱ्यांचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आज आपल्या पाठीशी आहेत, ज्यामुळे आपण मानसिक ताणतणावातून मुक्त व्हाल. घरगुती जीवन आनंददायक असेल. सामाजिक मानसन्मान वाढेल.

Advertisement

मीन: आपला दिवस मनातील दुरावस्था आणि अस्वस्थतेच्या भावनेने सुरू होईल. शारीरिकरित्या तुम्हाला थकवा जाणवेल. ग्रह त्याला उच्च अधिकाऱ्यांसोबत जपून काम करण्याचा सल्ला देत आहेत. संतती विषयी चिंता राहील. खर्च होतील स्पर्धकांशी वादविवाद टाळा. पाचन संबंधित रोगांचा योग आहे. भाग्य प्रतिकूल असेल. तुमच्या मनात उद्भवणारे नकारात्मक विचार तुमच्या मनावर अधिराज्य गाजवणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close