श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 7 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नृसिंहसरस्वती गुरुस्वामी, गुप्त जाहले कर्दलवनी।
येतां पुनश्च धर्मा ग्लानी, अक्कलकोटी अवतरले ||

आज सद्गुरु श्री स्वामी समर्थांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
शुभं फलदायी दिवस. आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यांत व्यतीत होईल, असे ग्रह म्हणतात. आपल्या हातून सेवा आणि पुण्याचे कार्य देखील होऊ शकतात. मानसिकदृष्ट्या आनंदी राहून कामाचा अतिरिक्त ताण तुम्ही हलका कराल. हातून सत्कार्य घडल्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक आनंद होईल. आर्थिक फायदा होण्याचीही शक्यता आहे.

वृषभ:
ग्रह सांगतात की आज तुम्हाला वादविवादात चांगले यश मिळेल. आपले बोलणे एखाद्याला भुरळ घालतील आणि ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे नवीन नात्यात सुसंवाद वाढण्याचीही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचा वाचन, लिखाणातील आवड यामुळे आजचा दिवस चांगला आहे. आपण कठोर परिश्रम केले तर आपल्या कामात प्रगती होईल. श्रमांचे फळ मिळेल. पथ्यपाणी सांभाळून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. .

मिथुन:
आज ग्रह तुम्हाला सल्ला देतात की भावना आणि संवेदनशीलतेमध्ये गुंतून स्त्रीवर्गाशी संबंध ठेऊ नका. अडचणीत याल. पाणी वा तत्सम द्रवपदार्थापासून धोका आहे, म्हणून त्यांच्यापासून दूर रहा. एखाद्या आजारामुळे कोंडीत सापडल्याने निर्णय घेण्यास अडथळा येऊ शकतो. अत्यधिक विचारांमुळे मानसिक थकवामुळे देखील होऊ शकतो आणि त्याचा आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक मालमत्तेवर होणाऱ्या चर्चा किंवा वादविवादापासून दूरच रहा. प्रवास टाळण्याचा ग्रह सल्ला आहे.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

कर्क:
आज आपला दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्ही एखादे नवीन कामदेखील सुरू करू शकता. मित्र आणि प्रियजनांना भेटणे आनंददायक ठरू शकते. कामात यश मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. नात्यात भावनिकता अधिक असेल. मुक्काम वा प्रवास देखील आनंददायक असेल. तुम्हाला समाजात आदर मानसन्मान मिळेल.

सिंहः
आज ग्रह म्हणतात की आपल्यासाठी संमिश्र फलदायी आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत तुम्ही आनंदाने वेळ घालवू शकाल. त्यांचा चांगला आधारही मिळू शकेल. आर्थिक क्षेत्रात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. तेंव्हा खर्च जपून करा. आपण वागण्या-बोलण्यातून प्रत्येकाचे मन जिंकण्यास सक्षम असाल. कामें नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत.

कन्या:
ग्रह सांगतात की, आज तुम्ही मधाळ बोलण्याने नवीन नाती निर्माण कराल, जे तुमच्यासाठी भविष्यात फायद्याचे ठरेल. नोकरी, व्यापार, व्यवसायात, भरभराट वाढेल. शरीर, आरोग्य आणि मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. कौटुंबिक सुवार्ता व प्रवास, पर्यटन यामुळे आज मन प्रसन्न राहील.

See also  अक्कलकोटनरेश ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ कृपेने यशस्वी होणार या ५ भाग्यवान राशी. जाणून घ्या.

तुळ:
आज दिवस प्रतिकूल असल्याने ग्रह तुम्हाला सर्वच बाबतीत खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. आज आपले आरोग्य बिघडू शकते. मानसिकरित्याही तुम्हाला अस्वस्थ वाटेल. आपल्या वागण्याने व संभाषणाने कोणाताही गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त असेल.

वृश्चिक:
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे, असे ग्रह म्हणतात. मित्रांसह भेट होईल आणि कुठेतरी बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर आनंद लूटण्याची संधी मिळेल. नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय क्षेत्रात तुमचे आर्थिक उत्पन्न वाढेल. उच्च अधिकारी आनंदी होतील. वैवाहिक जीवनात वातावरण आनंदी असेल.

धनु:
आज कार्यसफलता आणि यशाचा दिवस आहे. तुम्ही नवीन कार्य सुरू करण्यास सक्षम असाल. व्यापारी व व्यावसायिकवर्ग त्यांचा व्यवसायविस्तार करण्यात सक्षम होतील. आपल्या पदोन्नतीसाठी नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांकडून विचार केला जाईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक जीवनात आर्थिक फायदा, सन्मान वाढेल, असे ग्रहांचे म्हणणे आहे.

मकर:
ग्रह म्हणतात की आपण बौद्धिक उद्योगधंदा आणि व्यवसायात नवीन शैलीचा अवलंब कराल. साहित्य आणि लिखाणाचा विस्तार व वृद्धी वेगवान होईल. आपल्याला शारीरिक अस्वस्थता आणि थकवा येईल. मुलांची समस्या चिंता निर्माण करेल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी सखोल चर्चा करू नये आणि अनावश्यक खर्च टाळावा असा सल्ला ग्रहांनी दिला आहे.

See also  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 6 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण…

कुंभ:
आज अत्यधिक विचारांमुळे मानसिक थकवा येईल. मनात संतापाची भावना येईल आणि मात्र ती दूर करण्याचा प्रयत्न करून संभाव्य दुष्कर्म टाळता येईल. चोरी, अनैतिक कृत्ये, निषिद्ध कृत्ये आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा, असा ग्रहांचा सल्ला आहे. वागण्या-बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबात विवाद होण्याची शक्यता आहे. खर्च वाढल्यामुळे हात तंग राहतील. नामस्मरण आणि आध्यात्मिक विचारांमुळे तुमचे मन शांत होईल.

मीन:
आजच्या दिवशी, आपल्यातील लपलेल्या लेखक किंवा कलाकाराला आपली कला दर्शविण्याची संधी मिळेल. नोकरी, व्यापार, व्यवसायात भाग घेण्यासाठी शुभ काळ. आपण दररोजच्या रुटीन मधून बाहेर जाऊन आनंदात व मौजमजेत आपला वेळ घालविण्यास उत्सुक असाल. नातेवाईक, मित्रांसह प्रवास, पार्टी किंवा सहलीचे आयोजन केले जाईल. आपण नाटकं, चित्रपट इ. मनोरंजक स्थळांना भेट देऊ शकता. आपली यशकीर्ती वाढेल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment