मल्हारी मार्तंड श्री खंडोबाराया या 6 राशींच्या जीवनामध्ये आनंद भरणार, नशिब देणार साथ आणि होणार धनलाभ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II

आज म्हाळसकांत श्री खंडोबारायाची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, सिंह, कन्या, मकर, कुंभ आणि तूळ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : व्यापार वसुली आणि त्यानिमित्ताने प्रवास करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, असे ग्रह म्हणतात. व्यवसायाशी संबंधित कामांसाठीही हा दिवस फायदेशीर आहे. घरात शुभ कार्यक्रम होईल. शेअर बाजारातील आधीच्या गुंतवणुकीचा आर्थिक फायदा मिळण्याचे योग बनतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. आरोग्य उत्तम असेल.

वृषभ: हा दिवस अनुकूलता व प्रतिकूलतेने संमिश्र राहील, असे ग्रह म्हणतात. व्यावसायिकदृष्ट्या, आज आपण नवीन विचारसरणी आणि कार्यप्रणालीची ची ओळख करुन घ्याल. आळस आणि चिंता राहील, म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या. स्पर्धकांशी वाद घालू नका. अग्नि आणि पाण्यापासून काळजी घ्यावी. पैशांच्या व्यवहार व वसुलीसाठी प्रवास केल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे मनास आनंद होईल. गृहस्थ जीवन आनंदाचे राहील.

मिथुन : ग्रह मनातून नकारात्मक विचार दूर करण्याचा सल्ला देत आहेत. खाण्यापिण्याची काळजी घ्या. वाहन चालवताना कोणतीही अपघात, अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या. आकस्मिक पैसे खर्च होतील. काही कारणास्तव, बाहेर जाण्याचा प्रसंग उपस्थित होईल. दुपारनंतर बौद्धिक किंवा साहित्यिक वातावरणात रमाल. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. मुलांच्या प्रश्नांमुळे मानसिक चिंता वाढेल. विनाकारण जास्त पैसे खर्च होणार नाहीत, याची काळजी घ्या.

See also  श्री शनी देवाच्या कृपेमुळे या 6 राशीचे भाग्य बलवान झाले, सर्व बाजूने लाभ होणार, नशिबाची मिळेल साथ…

कर्क : ग्रह म्हणतात की आपण आज आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मौजमजा कराल. नवीन वस्त्रालंकार, स्वरुची भोजन मिळण्याचे योग आहेत. आपली आर्थिक आघाडी मजबूत राहील. अनेक लाभदायक योग आहेत. परंतू विचारांमधील अनिश्चितता त्रासदायक ठरेल. अचानक पैसा खर्च होईल. भागीदारांमधील अंतर्गत मतभेद वाढतील. नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवा. नवीन काम सुरू करू नका.

सिंग: आपला व्यापार, व्यवसाय विस्तारेल, असे ग्रह म्हणतात. व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात नियोजन कराल. योग्य कारणास्तव पैसा खर्च होईल. परदेशातील व्यवसायिकांपासून फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्या आर्थिक बळकटीमुळे , पैशाच्या बाबतीत आपले हात सढळ राहतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे. विचारांमध्ये अनिश्चितता टाळा. क्रोध आणि भागीदारांमध्ये असणारे अंतर्गत मतभेद टाळल्यास, परिस्थिती अधिकच अनुकूल असेल.

कन्या : आज तुमचा दिवस आनंदात व शांततेत जाईल, असे ग्रह म्हणतात. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. कालात्मतेत रस असेल. आजचा दिवस व्यवसायासाठी खूप चांगला आहे. पैशाशी संबंधित विषयांमध्ये सरळता असेल. कौटुंबिक वातावरण आणि आरोग्य चांगले राहील. आज व्यवसायातील वातावरण चांगले राहील आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

See also  श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच आनंदाची बातमी मिळणार...

तुळ : आज तुमचा दिवस मध्यम फलदायी होईल, असे ग्रह म्हणतात. शारीरिक उर्जा आणि मानसिक आनंदाचा अभाव असेल. कुटुंबात तीव्र वातावरण असेल. व्यावहारिक जीवनात काही मानहाणीचा विषय होऊ नये याची काळजी घ्या. परंतु दुपारनंतर तुमची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारेल. चिंतामुक्त होऊन तुमचा सर्जनशीलता आणि कलात्मकतेकडे कल राहील.

वृश्चिक : मिश्र फलदायी दिवस आहे. आज ग्रह म्हणतात की मालमत्तेशी संबंधित कामे आणि कौटुंबिक जीवनाचे प्रश्न सुटतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणीचे वर्तन सहकार्याचे असेल. स्पर्धकांचा पराभव होईल. शारीरिक आणि मानसिक त्रास होईल. कौटुंबिक जीवनात दुरावा येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची वेळ टळेल. निद्रानाश व आर्थिक तोटा होण्याचे योग आहेत.

धनु : आज संमिश्र दिवस राहील. नातेसंबंधात निष्काळजीपणाने वागू नये. वैयक्तिक संबंध जपण्याचा सल्ला ग्रहांनी दिलाय. आज आरोग्य चांगले राहील. अध्यात्मिक साधनेसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभही होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सरावावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याला असे वाटेल की दुपारनंतर मनातील कोंडी दूर होईल. शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतील. हितशत्रु यशस्वी होणार नाहीत.

See also  श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या ४ राशींचे नशीब हिऱ्याप्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प'ड'णा'र...

मकर : आज तुमची धार्मिक व आध्यात्मिक वृत्ती वाढेल, असे ग्रह म्हणतात. नोकरी, व्यापार आणि व्यवसायातही वातावरण अनुकूल राहील. आपली सर्व कार्ये सहजपणे पूर्ण होतील. जीवनाचा आनंद उपभोगण्याचे प्रमाणही वाढेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील. शेअर बाजारात भांडवल गुंतवाल. अतिचिंता टाळा.

कुंभ: धार्मिक आणि सामाजिक कार्यात पैसा खर्च होईल. नातेवाईक आणि मित्रांसह मौजमजा कराल. आज आपल्या वागण्यात अध्यात्मभाव अधिक दिसून येईल. आजची प्रत्येक कार्ये सहजपणे केली जातील. आपला प्रभाव कार्यालयात वाढताना दिसेल. वरील अधिकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील. मानसिक शांतीसाठी मात्र कुणाशीही वाद टाळा. अपघात व शस्त्रक्रियेपासून जपा.

मीन : आजचा दिवस नोकरी, व्यापार, व्यवसाय आणि इतर क्षेत्रातही आपल्यासाठी फायदेशीर आहे, असे ग्रह म्हणतात. अविवाहितांचा लग्नाचा प्रश्न सुटेल. प्रवास होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. मर्यादित का होईना, यश मिळेल. आध्यात्म आणि नामस्मरणाने मनःशांतीचा अनुभव घ्याल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment