काळजी करण्याचे दिवस संपले, भगवान श्रीशिवशंकर 5 राशींना देत आहेत सुख समृद्धी चे वरदान…
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
आज भगवान श्रीशिवशंकरांची ची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ५ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, कन्या, धनु आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.
मेष : आज तुमचा दिवस मित्रांच्या सोबतीने काही सामाजिक कार्यामध्ये व्यतीत होईल. त्यासाठी पैसेही खर्च करावे लागतील. तथापि, ते वाया जाणार नाहीत. नवीन मित्रांशी झालेली ओळख भविष्यात आपल्यासाठी फायदेशीरच ठरेल. सरकारी कामात यश मिळेल. वाडवडिलांचे सहकार्य देखील मिळेल आणि त्यामुळे आनंद वाढेल. दूर किंवा परदेशात असलेल्या मुलांच्या संबंधात चांगली बातमी मिळेल किंवा त्यांना भेटण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवास होईल.
वृषभ: आजचा दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. विशेषतः व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर ठरेल. व्यवसायात पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. नोकरीत कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.कौटुंबिक जीवनात सुख आणि समाधान देखील मिळेल. मित्रांची भेट झाल्याने आनंद होईल. शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राहील.
मिथुन: तुमचा आजचा दिवस संकटदायी ठरणार असं ग्रह म्हणतात. मानसिकदृष्ट्या चिंता आणि शारीरिक दृष्ट्या थकव्याचा अनुभव घ्याल. काम करण्याचा उत्साह असणार नाही. व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी आणि सहकारी कामगारांचे वर्तन नकारात्मक असेल. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होऊ शकतो. मुलांशी मतभेद होतील. त्यांची चिंता मनाला कष्टी ठेवेल. हितशत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा.
कर्क: वैचारिकदृष्ट्या नकारात्मकतेचे वर्चस्व असल्यामुळे दिवसभर शारीरिक आणि मानसिक बेचैनी असेल. म्हणूनच ग्रह नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा इशारा देत आहेत. आज रागावर तुम्हाला संयम ठेवावा लागेल. खर्च जास्त होईल. कुटुंबांमध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्या. आज नवीन कामे सुरू करू नका. नवीन ओळखदेखील विशेष काही फायदेशीर ठरणार नाहीत. सरकारविरोधी प्रवृत्तींपासून दूर राहणेच फायद्याचे ठरेल.
सिंह: आज पती-पत्नीमधील मतभेदांमुळे वैवाहिक जीवनात बरीच कटुता निर्माण होऊ शकते, असं ग्रह म्हणतात. तुमच्यातील कौटुंबिक आरोग्य बिघडू नये याची काळजी घ्या. ऐहिक व इतर प्रश्नांमुळे तुमचे मन आज उदासिन राहील. सामाजिक क्षेत्रात अपमान होणार नाही याची काळजी घ्या. भागीदारांमध्ये वितंडवाद देखील उद्भवू शकतात. कोर्टकचेरी पासून दूर रहा.
कन्या: आज नोकरी, व्यापार, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरणात तुम्हाला आनंद मिळेल. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील निरोगी असाल. आर्थिक फायदा होईल. आजारी असणाऱ्यांची तब्येत सुधारेल. विरोधक पराभूत होतील.
तुळ : आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. बोलण्यातील नम्रता आणि गोडपणाचा परिणाम इतर लोकांवरही होईल आणि परिणामस्वरुप इतर लोकांशी संबंध सुधारून दृढ होतील. आपला चर्चेत प्रभाव राहील. परिश्रमांच्या तुलनेत समाधानकारक यश मिळणार नाही. तुम्हाला कामात कष्ट घ्यावे लागतील. अपचनामुळे आज खाण्यापिण्याची काळजी घ्या. साहित्य लेखनाची आवड वाढेल.
वृश्चिक: आज लोकांशी सुसंबंध ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे, असे ग्रह म्हणतात. शारीरिक आणि मानसिक आजारामुळे चिंता कायम राहील. आईची तब्येत बिघडू शकते. पैशाची आणि प्रसिद्धीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण दोलायमान राहील. मनात आनंद नसल्यामुळे निद्रानाशही आज तुम्हाला त्रास देईल. अध्यात्म आणि नामस्मरण मनःशांती देईल.
धनु : तुमच्या हितशत्रू स्पर्धकांचा आज पराभव होईल, असे ग्रह म्हणत आहेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्य चांगले राहील. व्यापार, व्यवसाय आणि नोकरीच्या कार्यस्थळी अनुकूल वातावरण असेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आनंदात प्रियजनांबरोबर वेळ घालवाल. अध्यात्माचा आनंद व अनुभव घ्याल.
मकरा: आज मिश्र फलदायी दिवस आहे, असं ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्यामुळे किंवा आपल्याच वाईट सवयीमुळे मनामध्ये अपराधीपणा येईल. मानहानी होईल आरोग्याबद्दल काळजी घ्या. विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये रस असणार नाही. शेअर्समध्ये भांडवल गुंतवणूकीचे नियोजन करणे भविष्यात फायदेशीर ठरेल. महिलावर्ग आज असमाधानी राहतील. अध्यात्म आणि नामस्मरणाने आज मनःशांती मिळेल.
कुंभ: आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणारा असे ग्रह सांगत आहेत. नोकरी, व्यापार आणि उद्योगधंदा कार्यस्थळी उत्तम वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाने भरलेले असेल. आपण मित्र आणि कुटूंबासमवेत वेळ घालवाल. आज आपण प्रवास आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल. अध्यात्म व नामस्मरणाचा फायदाच होईल.
मीन: कोर्टकचेरी किंवा रिअल इस्टेट प्रॉपर्टीच्या भानगडीत न पडण्याचा ग्रह सल्ला देत आहेत. आज मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामांमध्ये फायदा होईल. आज आपल्या आरोग्याची काळजी घ्या नातेवाईकांपासून दुरावा राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील. आर्थिक निर्णय घेताना सध्याचे फायदे मिळविण्यामध्ये कोणतीही तोटा होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवहारात साधकबाधक चर्चा केल्यानंतरच निर्णय घ्या. अपघात आणि गैरसमजांपासून काळजीपूर्वक दूर रहा.
शुभं भवतु: !
टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.