या 6 भाग्यवान राशींवर श्री काळभैरवनाथ कृपा करणार, कठीण काळ दूर होणार जीवन आनंदी राहणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नमो भैरवदेवाय नित्ययानंदमूर्तये । विधिशास्त्रान्तमार्गाय वेदशास्त्रार्थदर्शिने ।।

आज श्री काळभैरवनाथांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : ग्रहसंकेतानुसार नुसार आजचा दिवस तुमचा आहे. निरोगी शरीर आणि मनाने आपण आज सर्व कामे करण्यास सक्षम असाल. परिणामी तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह वाढेल. आज नोकरी, व्यापार आणि उद्योगांत श्रीलक्ष्मीजींचे आशीर्वाद तुमच्यावर असतील. तुम्ही आनंदात मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल. आपल्याला आईकडून फायदा होईल. घरात आनंदी वातावरण असेल.

वृषभ : आजचा दिवस म्हणजे काळजीपूर्वक काम करण्याचा दिवस. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतेने ग्रस्त असेल. आरोग्य बिघडू शकते आणि डोळ्यांमध्ये वेदना होण्याची शक्यता दिसते. इतरांसह कुटुंबातील सदस्यांचाही वि’रो’ध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील असे ग्रह दर्शवित आहेत. विनाकारण खर्च होऊ शकतो. अ’प’घा’तांपासून सावध रहा. आज कठोर परिश्रम करूनही त्यामानाने फळं कमी मिळतील.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, असं ग्रह म्हणतात. असे अविवाहितांना सुयोग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. धन प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांना भेटणे आनंददायक असेल आणि त्याचा तुम्हालाच फायदा होऊ शकेल. पत्नी व संततीकडून फायदा होईल. स्वरुची भोजनाचा आनंद घ्याल. मुलांकडून चांगली बातमी येईल. नोकरी व व्यवसायात नफा आणि उत्पन्न वाढू शकते.

See also  श्री गजानन महाराजांची या 8 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायक आहे. प्रत्येक कार्य सहजतेने केले जाईल. उच्च अधिकारी नोकरीत तुमच्या कार्यामुळे आनंदी होतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून मनमोकळेपणाने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. आपण गृह सजावटीच्या संदर्भात नवीन कार्य देखील कराल. कामानिमित्ताने प्रवास घडतील. पालकांशी असलेले नाते दृढ राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारी कार्यात फायदा होईल, असे ग्रह सांगत आहेत.

सिंह : तुमचा दिवस मध्यम फलदायी ठरेल, असं ग्रह सांगत आहेत. आज ठरविलेल्या कामांकडे लक्ष द्या असे ग्रह सांगत आहेत. आजचा दिवस धार्मिक आणि मंगल कार्यात व्यतीत होईल आणि एखाद्या धार्मिक स्थळी भेट देखील आयोजित केली जाऊ शकते. आज तुम्हाला थोडा राग येईल ज्यामुळे तुम्हालाच मानसिक त्रास होईल. संतती संदर्भात काळजीत असाल. व्यापार, व्यवसायात अडथळा येईल. परदेशात असणाऱ्या नातेवाईकांकडून सुवार्ता प्राप्त होतील.

कन्या : आज ग्रह सांगतात की, तुम्ही कोणतीही नवीन कामे करू नये. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि विशेषत: बाहेर खाणे-पिणे टाळा. आज तुम्हाला अधिक राग येईल, म्हणून बोलण्यात संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी वागता, बोलतांना कुणाचे मन दुःखी होणार नाही याची विशेष काळजी घ्या. खूप पैसा खर्च होईल. जलाशयापासून दूरच रहा. सरकारविरोधी प्रवृत्ती आणि भांडणे टाळा.

See also  सात जन्मात पाहिले नसतील ते लाभ देणार श्री मल्हारी मार्तंड या 6 नशिबवान राशींना, पैश्यांची काळजी तर कायमची मिटवणार…

तुला: आजचा दिवस तुमचा आनंदात घालवाल. आवडत्या व्यक्ती आज तुमच्या आयुष्यावर वर्चस्व गाजवतील. नवीन वस्त्रालंकार खरेदीचा मूड बनून खरेदीही कराल. शरीर आणि मनाने तंदुरुस्त रहाल. आज लोकांमध्ये मान सन्मान मिळेल. ग्रह म्हणतात की, आज स्वरुची भोजनाचा योगही बनला आहे.

वृश्चिक: आज तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता व आनंदाचे वातावरण असेल आणि शारीरिक व मानसिक आरोग्यही तंदुरुस्त राहील. आजारी असलेल्या लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य उपलब्ध असेल. आपण महिला मित्रांना भेटाल. पालकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पैशाचा फायदा होईल आणि रखडलेले काम पूर्ण होईल, असा संकेत आज ग्रहांनी व्यक्त केलेला आहे.

धनु : आज तुम्ही तुमचा प्रवास टाळा किंवा पुढे ढकला. पोटाशी संबंधित त्रास किंवा समस्या उद्भवू शकतात, असे ग्रह म्हणतात. मुलांच्या आरोग्य आणि परीक्षा आशा प्रकारच्या चिंतेने मन विचलित होईल. कार्यात यश न मिळाल्याने निराशा देखील येईल, म्हणून रागाच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज आपल्याला साहित्य आणि कलेमध्ये रस असेल आणि काल्पनिक जगाला भेट द्याल. प्रिय मित्रांसह वेळ चांगला जाईल फक्त तार्किक आणि बौद्धिक चर्चेपासून दूर रहा.

मकर : आजच्या दिवशी तुमचे शारीरिक आरोग्य व मनःस्थिती ठीक रहाणार नाही. कलह आणि भांडणाच्या वातावरणाने कुटुंब अस्वस्थ होईल. उत्साह आणि उर्जेचा अभाव शरीरात जाणवेल. वैयक्तिक स्वभाव विवादास कारणीभूत ठरू शकतात. छातीत दुखणे किंवा काहीतरी तत्सम त्रास असेल. विश्रांती मिळणार नाही. सामाजिक कार्यात बदनामी होण्याची शक्यता. पाणी आणि परस्त्रियांपासून दूर रहा. मानसिक चिंते मुळे दिवस प्रतिकूल परिस्थितीत जाऊ शकतो.

See also  आज श्री स्वामी समर्थ करणार चमत्कार, या 6 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

कुंभ: आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप हलके आणि तणावमुक्त वाटेल, कारण मनावरील चिंतेचे दडपण जाईल. घरात बंधू-भगिनींसह एकत्र काहीतरी नवीन कार्य केले जाईल आणि दिवस आनंदाने त्यांच्याबरोबर व्यतीत होईल. मित्र आणि नातेवाईक भेटतील आणि छोटासा प्रवास देखील केला जाऊ शकतो. नशीब जोरावर असेल आणि स्पर्धकांसमोर तुमचा विजयही होईल.

मीन : आज खर्चावर संयम बाळगण्यास ग्रह सांगत आहेत. आज तुम्ही राग आणि बोलण्यावरही संयम ठेवायला हवा. आज योगच असा आहे की कोणाशीही वाद किंवा विवादाची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारामध्ये विशेषत: सावधगिरी बाळगा. नातेवाईकांमध्ये वितंडवादाची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. अध्यात्म व नामस्मरण मनःशांती देईल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment