शनिदेवची कृपादृष्टी आहे या ७ भाग्यवान राशींवर, शनिदेव करणार धनवर्षाव, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी…

.

हीं नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्‌।
परिवर्तीनी एकादशीच्या पावन दिवशी शनीदेवांच्या कृपादृष्टीचा लाभ घेणार या ७ राशी…

मेष: तुमचे ग्रह सांगतात की आज तुम्हाला थकवा, आळस आणि चिंता जाणवेल. आज तुम्हाला स्फूर्ती मिळणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत राग येईल. ज्यामुळे तुमचे काम अडचणीत येईल. नोकरीमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात क्रोध टाळा. एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याला जावे लागू शकते.

वृषभ: आज आपले ग्रह सांगतात की, तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी वाटेल. कोणतीही नवीन कामे सुरू करू नका. खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्या. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास प्रवास टाळा. आपले काम वेळेवर पूर्ण होणार नाही. योग, ध्यानधारणा करून मनशांती मिळेल.

मिथुन: आपले ग्रह असे सांगतात की आज आपण मनोरंजन व आनंदात व्यस्त रहाल. आपण मित्र आणि कुटुंबीयांसह आनंदमय वातावरणात दिवस घालविण्यात व्यग्र रहाल. सामाजिकदृष्ट्या आदर आणि कीर्ती मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

कर्क: आपले ग्रह आज तुमच्यासाठी आनंदाचे, सुखसमाधानाचे योग दाखवत आहेत. कुटुंबातील सदस्यांसह आनंदाने वेळ घालवाल. आवश्यक कामासाठी खर्च होईल. आर्थिक फायद्यासाठी आज एक चांगला दिवस आहे. आज कार्यालयात वातावरण अनुकूल राहील.

सिंहः तुमचे ग्रह म्हणतात की, आज तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल. सर्जनशीलता पूर्ण भरात असेल. संततीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पारिवारिक मित्रांमुळे आनंदित व्हाल. धार्मिक दानपुण्य कराल.

कन्या: आज आपले ग्रह अनुकूल नाहीत. आपल्याला खूप गोष्टींबद्दल काळजी वाटेल, ज्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. आईची तब्येत ढासळेल. कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी काळजी घ्या. विनाकारण पैसा खर्च होईल.

तुला: आपले ग्रह आजचा दिवस भाग्यवान असल्याचे सांगत आहेत. कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. नवीन कामाच्या सुरूवातीसाठी शुभ दिवस आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. परदेशातून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. सन्मान होईल.

वृश्चिक: आजचा दिवस आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. बोलण्यावर संयम ठेवल्यास आपण कुटुंबात शांती व आनंद निर्माण करू शकाल. नकारात्मकतेवर चांगल्या विचारांचा विजय होईल. धार्मिक कार्यांसाठी खर्च होऊ शकतो.

धनु: आजच्या दिवशी ठरवलेली कामे पूर्ण होतील असे आपले ग्रह सांगतात. लक्ष्मीजींचा आशीर्वाद राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला आनंदी ठेवेल. नातेवाईकांना भेटल्यानंतर मन आनंदित होईल. प्रियजनांचा सहवास मिळेल. कीर्ति वाढेल.

मकर: आपले ग्रह सांगतात की आज मन अस्वस्थ होईल. धार्मिक, सामाजिक कार्यात पैसा खर्च होईल. कुटुंब आणि मित्रांमध्ये मतभेद असतील. बदनामी आणि मानहानीचा योग आहे. आज तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. कोर्ट-कचेरीच्या कामात अपयश. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कुंभ: आपले ग्रह असे सांगतात की आज आपल्याला मिळणारे लाभ आपला आनंद द्विगुणित करतील. नवीन कार्याचे आयोजन करण्यासाठी दिवस शुभ आहे. कामाची सुरुवात चांगली होईल. व्यापाऱ्यांना व्यापारामध्ये विशेष फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. मुलांशी संवाद सुखावेल. उत्पन्न वाढेल.

मीन: आपला दिवस शुभ आहे, असे तुमच्या ग्रहांचे म्हणणे आहे. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूष असतील. याबरोबर तुमचा आनंदही वाढेल. व्यापारात तुम्हाला तगाद्याचे पैसे मिळू शकतात. जेष्ठांकडून तसेच वडिलांकडून फायदा होईल. कौटुंबिक आनंदात तुम्ही समाधानी व्हाल.

आज शनिदेवांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ७ राशी आहेत… मिथुन, कर्क, सिंह, तुळ, धनु, कुंभ आणि मीन.
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment