भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या ५ राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…
.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
आपल्या भक्तांवर कायमच प्रसन्न असणारे भगवान भोलेनाथ श्रीशंकर प्रसन्न आहेत या ५ राशींवर…
मेष: आपला दिवस फलदायी ठरेल असे आपले ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यां समवेत तुम्ही सुखसंवाद कराल. घराच्या इंटेरियर मध्ये बदल करावासा वाटेल. कार्यालय किंवा व्यवसाय क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा कराल. सरकारी लाभ मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसशी संबंधित कामांसाठी प्रवास संभवतो. कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याच्या बाबतीत, शारीरिक थकवा, थोडीशी अस्वस्थता जाणवेल. आईकडून फायदा होण्याची शक्यता आहे.
वृषभ: आपले ग्रह सांगतात की तुम्हाला नवीन कार्याची प्रेरणा मिळेल व ती तुम्ही सुरू करू शकाल. धार्मिक स्थळाला भेट द्या, ऊर्जा मिळेल. प्रवास लाभदायक. आपल्याला आपल्या प्रिय व्यक्ती किंवा दूरवर असलेल्या आप्तांची चांगली बातमी मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदे होऊ शकतात. आरोग्य मध्यम राहील.
मिथुन: आपले ग्रह सांगतात की , आजचा दिवस प्रतिकूल आहे, म्हणून आज तुम्ही प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आज कोणतीही नवीन कामे सुरू करू नका. रागामुळे काही नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. आजारात नवीन उपचार किंवा शस्त्रक्रिया करू नका. कामभावना काबूत ठेवा. जादा खर्च होऊ शकतो. बोलण्यावर संयम ठेवल्यास भांडणे किंवा वाद टाळता येतील. काही कारणास्तव वेळेवर खाणंपिणं होणार नाही. देवाची उपासना केल्यास शांती मिळेल.
कर्क: आपले ग्रह म्हणतात की, आजचा संपूर्ण दिवस आनंद आणि करमणुकीच्या मूडमध्ये व्यतीत होईल. आवडत्या व्यक्तींची भेट घडेल. सुखसाधने, कपडे खरेदी इत्यादी कामे केली जातील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते. चांगले भोजन, वाहनसौख्य मिळेल. मानसन्मान वाढण्याचा योग आहे. व्यवसाय क्षेत्रातही एक फायदेशीर दिवस असेल. आरोग्य चांगले राहील.
सिंग: आज मिश्रित फळांचा दिवस आहे, असं आपले ग्रह म्हणतात. घरात शांततेचे वातावरण असेल. कार्यालयात सहकाऱ्यांचे कमी सहकार्य मिळेल. दैनंदिन कामात काही अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्धी यांच्यामुळे त्रास होईल. उच्च अधिकाऱ्यांशी वाद टाळा. संतती चिंता सतावेल. आज तुमच्यात खूप उदासीनता असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. आरोग्य सामान्य असेल. बरीच मेहनत घेतल्यानंतरही आज यश कमी मिळेल.
कन्या: आपले ग्रह म्हणतात की आज तुम्ही तुमच्या मुलाबद्दल चिंता कराल. मन विचलित राहू शकते. पोटाशी संबंधित आजारामुळे वेदना राहू शकते. शैक्षणिक अडथळे येतील. परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. संभाषणात तार्किक आणि बौद्धिक चर्चेपासून दूर रहा. प्रियजनांमध्ये वाद होईल. शेअरमध्ये सावधगिरी बाळगा.
तुला: या दिवशी तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल, असे आपले ग्रह सांगतात. आज तुम्ही अधिक भावनिक व्हाल. मनातील विचारांमुळे काहीजण अस्वस्थ होतील. आईबद्दल चिंता वाटेल. प्रवास करण्यासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर रहा. झोप अपूर्ण राहील. मानसिक चिंता सतावेल. कौटुंबिक आणि मालमत्तेच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
वृश्चिक: आज दिवस शुभफलदायी आहे असे आपले ग्रह म्हणतात. आपण नवीन कार्य सुरू कराल. मित्रमंडळींकडून आनंद आणि समाधान मिळेल. नातेवाईकांना भेटू शकेल. आज कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक फायद्याची आणि चांगली संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींना याचा फायदा होईल. स्पर्धकांसमोर विजय होईल. आपुलकीचे संबंध निर्माण होतील. लहान प्रवास होतील.
धनु: आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल, असे आपले ग्रह म्हणतात. अकारण खर्च होईल. मनात अपराधभाव असेल. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्यामुळे नाराजी होऊ शकते. कामांमध्ये अपेक्षित यश मिळणार नाही. निराश मनःस्थितीमुळे आपण आज कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेऊ शकणार नाही, असे आपले ग्रह सांगतात. लांबच्या नातेवाईकांशी संवाद साधल्यामुळे तुमचा फायदा होईल. कामाचा ताण वाढेल.
मकर: शिवशंकराच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. बढतीची संधी मिळेल. घरगुती जीवनात आनंदाचे वातावरण असेल. तब्येतीची जरा काळजी घ्या. प्रियजनांसोबत सुखद अनुभव येतील. मनाची शांती मिळेल.
कुंभ: आपले ग्रह आरोग्यासंबंधी जागरूक राहण्याचा सल्ला देतात. मानसिक आरोग्य कमी होईल. कोर्ट-कोर्टाच्या कचाट्यात सापडणार नाही, अयोग्य ठिकाणी भांडवल गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्य वैमनस्याने वागू शकतात. अपघातापासून दूर रहा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. खर्चाचे योग आहेत.
मीन: आपले ग्रह म्हणतात की आज तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींमध्ये मन गुंतवाल. मित्र भेटतील, त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रमणीय ठिकाणी फिरून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
आज श्रीशिवशंकरांची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ५ राशी आहेत… वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन.
शुभं भवतु: !
टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.