या 6 भाग्यवान राशींवर श्री शनिदेव कृपा करणार, कठीण काळ दूर होणार जीवन आनंदी राहणार…
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तुते।
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽ भयदायच।।
आज श्री शनिदेवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींpचे आजचे भविष्य.
मेष : ग्रहाच्या विधानानुसार आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण जाईल आणि शारीरिक व मानसिक आरोग्यही चांगले राहील. आज जे काही कराल ते यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. माहेरहून आलेल्या सुवार्तेचा फायदा देखील होऊ शकेल. आर्थिक फायद्याचीही शक्यता आहे. मित्र आणि प्रियजनांबरोबर आनंदी प्रवास, पर्यटन कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आपल्याला आनंद होईल.
वृषभ : हा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. अनेक प्रकारची चिंता उत्पन्न होईल आणि शारीरिक आरोग्य देखील ठीक रहाणार नाही. मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये मतभेद उद्भवतील, परिणामी घरातही कलुषित वातावरण असेल. आजची कामे अपूर्ण राहू शकतात. काही कारणास्तव खर्चही जास्त होईल. आज केलेल्या कठोर परिश्रमांचेही असंतोषजनक परिणाम होतील जे मनाला दुखावतील. अनावश्यक अविचारी निर्णयामुळे गैरसमज होऊ नयेत याची खबरदारी घ्या.
मिथुन : आज नोकरी, व्यापार आणि उद्योगांसह इतरही गोष्टींमध्ये होणाऱ्या फायद्यांमुळे आपल्या आनंदात दुप्पट वाढ दिसून येईल, असे ग्रहांचे सांगणे आहे. पत्नी व मुलाकडूनही फायद्याच्या बातम्या येतील. मित्रांची भेट घेण्यास मजा येईल. अविवाहितांना जीवनात योग्य जोडीदार सापडेल. ठणठणीत आरोग्यासह स्वरुची भोजनाचा वेळेवर आनंद उपभोगाल.
कर्क : ग्रहांच्या मते आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल व तुमचे वर्चस्व वाढेल. तुमची पदोन्नती होण्याची प्रत्येक शक्यता आहे. कुटुंबात महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. आईची तब्येत चांगली राहील. संपत्ती आणि मानसन्मानाचे अधिकारी व्हाल. घराची सजावट बदलाल. दिवसभर कामात गुंतून रहाल. आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक जीवनही आनंदी असेल.
सिंह : आजचा दिवस धार्मिक प्रवृत्तींमध्ये घालवाल. मित्रमंडळी, प्रियजनांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची ही सुवर्णसंधी आहे. मुळातच मेहनती असल्याने, आज सर्व काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमचा प्रयत्न असेल. इतरांची तुमच्याप्रती वागणूक चांगली असेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा व्यवसायात अडथळा येण्याची अथवा उच्च अधिकारी नाराज होण्याचीही शक्यता आहे. आज आरोग्य मध्यम राहील.
कन्या: आज ग्रह तुम्हाला वागण्या-बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. तुम्ही आज कोणतेही नवीन काम सुरू करू नये आणि राग व क्रोध वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे. कुटुंब आणि प्रियजनांशी भांडण झाल्यामुळे मनांत उदासिनता असू शकते. शक्य असल्यास प्रवास टाळा. हितशत्रूंपासून सावधगिरी बाळगा.
तुळ : आजच्या दिवसात मित्र आणि प्रियजनांसोबत मनोरंजन, राहणे, खाणे, पिणे आणि प्रेमसंबंधांमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. प्रवास, पर्यटनाचा योग आहे. आज मौजमजेच्या वस्तू आणि वस्त्रालंकार खरेदीचा योग आहे. शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले राहील. आपण सार्वजनिक, सामाजिक आदर, मान सन्मानास पात्र ठराल.
वृश्चिक : आपले कौटुंबिक वातावरण सुखमय असेल. शरीरात चैतन्य आणि आनंद राहील. प्रतिस्पर्धी तसेच मित्रांच्या वेशातील शत्रू त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरतील. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य असेल. महिला मित्रांसोबत मैत्री, प्रेमसंबंध आणि आनंद वाढेल. आर्थिक फायद्याची चिन्हे आहेत. अपूर्ण कामे पूर्ण होतील. रुग्णांना आजारांपासून आराम मिळेल.
धनु : आज नोकरी, व्यापार, उद्योगात जर आपल्याला केलेल्या कार्याचे अपेक्षित यश मिळाले नाही तर निराश होऊ नका असा सल्ला ग्रह देत आहेत. आज आपण वागण्या-बोलण्यावर तसेच रागावर नियंत्रण ठेवा. मुलाशी संबंधित विविध प्रश्नांमुळे तुमचे मन चिंताग्रस्त होईल. कोणताही प्रवास न करण्याचा सल्ला आहे.
मकर : आज आपला दिवस शुभ नसल्याचे वर्तवताना, ग्रह म्हणतात की तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांसह अप्रिय, अनिष्ट घटनेमुळे घरात त्रास होईल. वेळेवर अन्न न मिळण्याची शक्यता आहे. शांत झोप लागणार नाही. पाणी आणि परस्त्रिया यांच्यापासून जपा. कारण या संदर्भात मानहानी वा पैशाचा अपव्यय होण्याचे योग आहेत.
कुंभ : ग्रह म्हणतात की मनावरील चिंतेचे निवळून आज तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल. मनामध्ये उत्साह असेल, ज्यामुळे दिवसाचा काळ आनंदाने व्यतीत होईल. भाऊ-बहिणींशी बंधुभाव वाढेल. नोकरी, व्यापार, उद्योगात आज एखादी महत्वाची योजना आखू शकाल. जिचा भविष्यात लाभ होईल. एक छोटा प्रवास देखील आयोजित केला जाऊ शकतो. ज्याचा फायदाच होईल.
मीन: आज ग्रह आपल्याला चेतावणी देत आहेत की जीभेवर ताबा ठेवा नाहीतर वादविवाद व भांडण्याची शक्यता निर्माण होईल. खर्चावर संयम ठेवणे देखील महत्वाचे आहे. पैशाशी संबंधित व्यवहारातही अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य कमकुवत शकते. कुटुंबातील सदस्यांशी दुरावा निर्माण होऊ शकतो. पथ्यपाणी, व्यायाम इ. नियमित सांभाळा.
शुभं भवतु: !
टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.