या 6 राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यापारात मोठे यश मिळण्याचे संकेत, भगवान श्रीविष्णू देणार नशिबाला कलाटणी…

ऊँ वासुदेवं हृषीकेशं वामनं जलशायिनम् , जनार्दनं हरिं कृष्णं श्रीवक्षं गरुडध्वजम्।
वाराहं पुण्डरीकाक्षं नृसिंहं नरकान्तकम्, अव्यक्तं शाश्वतं विष्णुमनन्तमजमव्ययम्।।

आज भगवान श्रीविष्णूकृपा असणाऱ्या ६ भाग्यवान राशी आहेत, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आपल्यासोबतच समोरच्या व्यक्तीच्याही हिताचे ठरतील असे निर्णय घेतल्यास आज कोणाशीही संघर्ष होणार नाही, असे ग्रह म्हणतात. लेखक आणि कलाकारांसाठी वेळ अनुकूल आहे. कौटुंबिक नात्यामध्ये प्रेम वाढेल. आज मन काहीसे चिंतीत राहील. उत्साह कमी होईल. संवेदनशीलता वाढेल. मित्रांसह प्रवास करण्यास मन उत्सुक असेल. आर्थिक बाबतीत व्यवहार आणि खर्च जपून करा. मित्रमंडळी, कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल.

वृषभ : आज महत्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत. दुपारनंतर व्यापार-उद्योगात आर्थिक नु’क’सा’न होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असाल. कुटुंबासमवेत वेळ घालवला जाईल. दुपारनंतर कदाचित आपण हातात असलेली संधी गमावू शकता त्यामुळे शक्य असल्यास, कोणतेही काम दुपारच्या आधीच करणे इष्ट. भावंडांशी नातेसंबंधात कटुतेची भावना येईल ती कटाक्षाने टा’ळा.

मिथुन : आज ग्रह तुम्हाला काळजीपूर्वक राहण्याचा सल्ला देत आहेत. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला वि’रो’ध होईल. नोकरी, व्यापार उदयोग इ. ठिकाणी अधिकारी वर्गाशी वाद टाळा. कोणतेही काम सुरू केल्यानंतर ते अपूर्ण राहतील. तुम्हाला शारीरिक त्रा’स व मानसिक चिं’ता जाणवेल. कौटुंबिक वातावरणात मात्र अनुकूलता असेल. करमणुकीसाठी पैसा खर्च होईल.

कर्क : आज व्यवसायात फायदा होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, असे ग्रह म्हणतात. काही रमणीय ठिकाणी प्रवास आयोजित केला जाईल. परंतु उत्तरार्धात आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खालावेल. डोळ्याचे आ’जा’र वा वे’द’ना वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च होईल. वाहन काळजीपूर्वक चालविणे. अ’प’घा’त योग आहे.

सिंह : आजचा हा दिवस नवीन कार्याचे आयोजन करण्यासाठी शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आपली मित्र आणि प्रियजनांशी भेट होऊन त्यातून लाभ मिळेल. व्यवसाय क्षेत्रातील नवीन संपर्कांमुळे भविष्यात नफ्याची शक्यता वाढेल. कुटुंब आणि मित्रांसह आनंददायक क्षण घालवाल. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एक लहान परंतु आनंददायक प्रवास घडेल.

कन्या : तुमच्या सोबतच, तुमच्याशी जोडलेले इतर व्यवसायिक सुद्धा आपल्या व्यवसायातून आर्थिक लाभ मिळवतील असे ग्रह म्हणतात. लांबच्या प्रवासाचे योग बनले आहेत. प्रवासात आपल्या आरोग्याची काळजी घ्या. दूर असलेल्या प्रियजनांच्या बातम्या कळतील. कार्यालयात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आज कुटुंबप्रमुखाच्या मनात आनंद आणि समाधानाची भावना कायम राहील. मानसन्मान मिळाल्यामुळे आज मन प्रसन्न राहील.

तुला : शारीरिक आळस आणि जास्त कामांमुळे तुम्हाला मानसिक त्रा’स होईल. त्यामुळे आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार नाही. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हानिकारक आहार घेऊ नका. प्रवासात अ’ड’थ’ळा येण्याची शक्यता आहे. दूर असलेल्या आपुलकीच्या नातेवाईकांकडून सुवार्ता प्राप्त झाल्याने आनंद होईल. परदेशात जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. व्यापार-व्यवसायालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आज शारीरिक उर्जा राहील. मानसिक दृष्ट्याही आनंदी राहाल. आपण कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने वेळ व्यतीत करून सुरुची सहभोजनाचा आनंद घ्याल. आहारात मात्र पथ्यापाण्याची काळजी घ्या. नोकरी, व्यवसायात आर्थिक लाभाचे योग बनतील. मात्र संधीचा अति फायदा न घेता मिळतेय त्यात समाधान माना. प्रवास मात्र टाळा. आज अध्यात्म आणि भक्तीमार्गाकडे मन ओढ घेईल आणि नामस्मरण आपल्याला मदत करेल.

धनु : आजचा दिवस आनंदी आणि उत्साही मानसिकतेने व्यतीत होईल, असे ग्रह म्हणतात. आपले कार्य योजनेनुसार होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील पैशाशी संबंधित फायदे होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. एखादा छोटा प्रवास आयोजित करण्यास उत्सुक असाल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल. परदेशी नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल.

मकर : केलेल्या परिश्रमांइतकेच फळ मिळेल असे ग्रह म्हणतात. तरीही आपल्या कामावरील निष्ठा कमी होणार नाही. इतर लोकांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज आरोग्य चांगले राहील. आणि ते तसेच टिकविण्यासाठी साठी बाहेरील खाद्यपदार्थ टा’ळा. दुपारनंतर अपूर्ण कामे पूर्ण होतील. आजारी लोकांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. मुलांच्याकडून तुम्हाला चांगली बातमी येईल. सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील.

कुंभ : विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंसाठी आजचा दिवस चांगला आहे, असे ग्रह म्हणतात. वाडवडील आणि सरकारकडून फायदा होईल. तुमचे मनोबलही मजबूत असेल. त्यामुळे यशामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पचनक्रिया बिघडून पोटाचा त्रास संभवतो आहे, टाळण्यासाठी शक्य असल्यास बाहेरचे खाणेपिणे टा’ळा. वाचन आणि लेखन क्षेत्रात आपली आवड वाढेल. पैशाशी संबंधित गुंतवणूक व इतर व्यवस्था करतांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

मीन : आज आपण दिवस एका कल्पनारम्य जगात घालवाल. आपल्या सर्जनशील कल्पनाशक्तीला देखील योग्य दिशा मिळेल. कुटुंब आणि मित्रांसह सहभोजन आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आपण आत्मविश्वासाने आणि एकाग्र मनाने दैनंदिन कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ चांगला आहे. मुलांसाठी वेळ अनुकूल आहे, असे ग्रह म्हणतात. पितृसंपत्ती संदर्भात फायदा होईल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment