मंगळ ग्रह प्रसन्न होऊन दोषमुक्त करणार या 5 भाग्यवान राशींना, घोड्यासारखे जलद बदलणार त्यांचे नशीब…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

“ॐ अग्निमूर्धा दिव: ककुत्पति: पृथिव्या अय्यम्।
अपां रेतां सि जिन्वति।।”

आज मंगळ ग्रह खुश होऊन शुभफळे देणार आहे या ५ भाग्यवान राशींना.

Advertisement

मेष: दिवसाच्या सुरूवातीस नवीन कार्य करण्यास तुम्ही उत्साहित रहाल, असं ग्रह म्हणतात. शरीर आणि मनाचे आरोग्य देखील आपला उत्साह दुप्पट करेल. मित्र आणि नातेवाईकांच्या मंगल प्रसंगी जावे लागेल. परंतु दुपारनंतर काही कारणास्तव आपले आरोग्य खराब राहील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. पैशांच्या संबंधित व्यवहारात दक्ष रहा. मनातील उदासीनता टाळल्यास तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होणार नाहीत. आजचा दिवस सामान्य असेल.

वृषभ: तुम्ही घरातील सदस्यांशी संवाद साधाल. आपल्याला घराची सजावट आणि इतर विषयांमध्ये बदल करावासा वाटेल. जेष्ठांचा आदर कराल. कार्यालयात अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. सामाजिक कार्यात अधिक रस असेल. मित्रांचा फायदा होईल. नातेवाईकांशी सुसंवाद होऊन मनस्थिती सुधारेल. मुलांना फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन मैत्रीमुळे मन प्रसन्न होईल. आकस्मिक धनलाभाची शक्यता आहे, असे ग्रह म्हणतात.

Advertisement

मिथुन: कौटुंबिक आणि व्यवसाय क्षेत्रात आपला दिवस चांगला जाईल, दोन्ही ठिकाणी आवश्यक विषयावर चर्चा केल्यानंतर एक निर्णायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य निर्णय घ्या. कामाचा ताण वाढल्याने आरोग्यामध्ये थोडीशी सुस्तता येईल, परंतु दुपारनंतर आपले आरोग्य सुधारेल. मित्रांना भेटणे आनंददायी असेल. त्यांच्यासमवेत छोटे प्रवास आयोजित केले जातील. सामाजिक कार्यात हातभार लावाल.

See also  श्रीखंडेराया या 6 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच मिळणार आनंदाची बातमी …

कर्क: आज तुमची वागणूक चांगली असेल, असे ग्रह म्हणतात. आपणास नेमून दिलेले काम करण्याची प्रेरणा मिळेल. पण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण करत असलेले सर्व प्रयत्न उलट दिशेने जात आहेत. आरोग्यही बिघडू शकते. रागाचे प्रमाणही अधिक असेल. परंतु सायंकाळी शारीरिक आणि मानसिक तणावमुक्ती मिळून आनंदी व्हाल. व्यावसायिक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आवश्यक विषयांवर चर्चा केली कराल. घराच्या सजावटीमध्ये काही बदल करण्याची इच्छा होईल.

Advertisement

सिंह: आज दिवसाच्या सुरूवातीला तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणाव वाटेल. अति रागामुळे एखाद्याबद्दल वाईट भावना तुमच्या। मनांत उद्भवू शकतात. त्यावर ताबा ठेवा कारण उत्तरार्धात तुमची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी आवश्यक चर्चा होईल. कुटुंबातील सदस्यांसह महत्त्वाच्या विषयांवर सुखसंवाद साधाल.

कन्या: आज ग्रह नवीन कामे न करण्याचा व शांत राहण्याचा सल्ला देतात. आजचा दिवस म्हणजे प्रेम, राग सोडून सर्वांशीच समानतेने वागण्याचा दिवस. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्तीचे योग आहेत. परंतु बिघडलेले आरोग्य चिंता निर्माण करेल. रागाचे प्रमाण अधिक असेल, त्यामुळे आपलेच नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवसायाच्या ठिकाणी कोणी तुमच्याकडून दुखावणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक समारंभास उपस्थित राहण्याचे योग आहेत.

See also  या 7 राशींना सुख आणि धन प्राप्ती होणार, श्री शनी देव देत आहेत विशेष आशीर्वाद, दुः’ख देखील हरणार…
Advertisement

तुळ : दिवसाची सुरुवात आनंददायक होईल, असे ग्रह म्हणतात. क्रोधाची भावना मनात कायम राहील. पुढील आर्थिक लाभ व छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. परंतु संध्याकाळी वादविवाद होणे शक्य आहे, म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. हितशत्रूंपासून सावध रहा. आज नवीन कार्य सुरू करु नका.

वृश्चिक: बौद्धिक कार्य आणि जनसंपर्क साधून लोकांच्या सोबत राहण्यासाठी हा दिवस चांगला आहे, असे ग्रह म्हणतात. छोटे प्रवास घडतील. आर्थिक उलाढाली करण्यासाठी वेळ शुभ आहे. संध्याकाळनंतर आपण मित्र आणि नातेवाईकांसह आनंदाने वेळ व्यतीत कराल. त्यांच्या समवेत सहभोजनाचा आनंद घ्याल. वैचारिक पातळीवर विवेकाचा ताबा ठेवण्याचा ग्रह सल्ला देतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.

Advertisement

धनु: शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत ग्रह सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. अधिक श्रम करून जर तुम्हाला कामात यश नाही मिळालं तर निराश होऊ नका, असं ग्रह म्हणतात. शक्य असल्यास आपण प्रवास पुढे ढकलला पाहिजे. उत्तरार्धात आपल्यासाठी वेळ अनुकूल असेल. शरीरात उर्जा असेल. आर्थिक फायद्यासाठी दिवस अनुकूल राहील. व्यवसायिक नियोजन उत्तम होईल. आनंदात वेळ घालवाल.

मकर: आज तुम्ही अधिक संवेदनशील असाल, असे ग्रह म्हणतात. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. घातकी विचार, वागणूक आणि योजनेपासून दूरच रहा. त्वरीत निर्णय घ्या. कौटुंबिक व सामाजिक संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. आज यशासाठी जास्त काम करावे लागेल.

See also  आज श्री गजानन महाराज करणार चमत्कार, या 6 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…
Advertisement

कुंभ: ग्रह तुम्हाला महत्वाची कामे व निर्णय पुढे ढकलण्याचा सल्ला देत आहेत. नवीन काम सुरू करण्यासाठी आज सकाळची वेळ अनुकूल आहे. मध्यान्हानंतर तुमची मानसिक चिंता वाढेल. मालमत्ता व्यवहार व दस्तऐवजीकरण करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस मध्यम आहे. आईच्या आरोग्याबाबत चिंता असेल. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. शक्यतो मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन: आज आपल्या स्वार्थी स्वभावाचा त्याग करुन इतरांचा विचार करण्यास ग्रह तुम्हाला सल्ला देतात. घर, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रात समाधानी राहिल्यास परिस्थिती आपल्या बाजूने राहू शकते. बोलण्यावर संयम ठेवल्यास आपण विवाद टाळण्यात यशस्वी व्हाल. आज तुमच्यात चांगली सुधारणा होईल. आपण नवीन कार्य करण्यास उत्साहित व्हाल आणि कार्य सुरू करण्यास सक्षम असाल. परंतु आपण द्विधा मनस्थितीत असल्यास घाईत निर्णय घेऊ नका. आवश्यक कारणास्तव छोटा प्रवास होऊ शकतो.

Advertisement

आज मंगळ ग्रहाची विशेष कृपादृष्टी लाभलेल्या ५ राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक आणि धनु
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close