सूर्या देवाने केला सिंह राशी मध्ये प्रवेश, सर्वच राशींसाठी फलदायी आहेत सूर्यदेव, जाणून घ्या काय तुमच्यासाठी कसा राहील हा महिना…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

आत्म्याचा कारक आणि नवग्रहांचा राजा सूर्याचे संक्रमण १६ ऑगस्ट २०२० ला आपली स्वराशी सिंह मध्ये होत आहे. ज्याच्या कुंडलीत सूर्य मजबूत त्याचे नेतृत्व खंबीर. सूर्याचे सिंह राशींमधील संक्रमण सिंह संक्रांतिच्या नावाने ही ओळखले जाते.

Advertisement

सूर्य संक्रांतिस शुभ मानले जाते म्हणून, या दिवशी भाविक भक्त पवित्र नदीमध्ये स्नान करुन दानधर्म करतात. सूर्य ग्रहाचे सिंह राशीमध्ये संक्रमण १६ ऑगस्टला सायंकाळी ६.५६ वाजता होईल आणि या राशीमध्ये हे १६ सप्टेंबर २०२०,च्या सायंकाळ ६.५२ वाजेपर्यंत राहील. चला तर मग जाणून घेऊ, सूर्य ग्रहाचे सिंह राशीमधील हे संक्रमण कोणत्या राशीसाठी कसे फळ घेऊन येईल ते…

मेष :- या राशीमध्ये हे सूर्य संक्रमण पंचम भावात होईल. पंचम भाव संतान, प्रेम, शिक्षण, पद, प्रतिष्ठा इत्यादी दर्शवितो. संक्रमणाच्या काळात तुमच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. प्रियजनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार नाहीत यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. मेष विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. नोकरदार वर्गाने कार्य क्षेत्रात सांभाळून राहावे अन्यथा समस्यांच्या विळख्यात येऊ शकाल. अंतर्गत राजकारणापासून दूर राहा. व्यापारी व उद्योजकांसाठी सूर्य संक्रमण शुभ राहील. व्यापार उद्योग विस्तारासाठी काळ अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील.

Advertisement

वृषभ :- हे सूर्य संक्रमण वृषभेच्या चतुर्थ भावात होईल. हा भाव सुख, माता, वाहन, भूमी, निवास इत्यादी दर्शविते. सूर्य तुमच्या आईला कष्ट देऊ शकतो. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. या राशीतील काहींना सूर्याच्या या संक्रमणाच्या वेळी सरकारी निवास वा वाहनसौख्य मिळू शकते. या संक्रमण काळात तुमचा संतृष्टी भाव राहील आणि तुम्ही ते काम कराल जे तुम्हाला आवडतात तुमच्या आवडीचे काम करू शकाल. वैवाहिक जीवन तुमच्यासाठी चांगले राहील. जीवनात आनंद ही वाढेल.

See also  बॉलीवूड मधील या आहेत सर्वात यशस्वी जोड्या, लग्नाला 30 ते 40 वर्षं झाली तरी आनंदाने सोबत संसार करत आहेत...

मिथुन:- बुधाच्या स्वामित्वाखालील मिथुन राशीच्या तृतीय भावात सूर्य संक्रमण होईल. तृतीय भाव लहान भाऊ बहीण, संबंधित लेखन इ. दर्शविते. या राशीतील काहींना सरकारकडून लाभ होईल. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील फक्त क्रोध नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपल्या भाऊ बहिणींच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. लागेल कारण, ते आजारी होण्याची शक्यता आहे. मीडिया किंवा लेखन क्षेत्रातील लोकांना चांगले फळ प्राप्त होऊ शकतात.

Advertisement

कर्क :- या राशीसाठी द्वितीय भावात सूर्याचे संक्रमण होईल. हा भाव आपली वाणी , मालमत्ता, कुटुंब, अन्न, कल्पनाशक्ती इत्यादी दर्शवतो . कर्क राशीसाठी हे संक्रमण शुभ फलदायी असेल. या काळात आपल्याला कौटुंबिक जीवनात शुभ फळ मिळेल. चांगले आर्थिक बदल होतील. तुमचे उत्पन्न वाढून आर्थिक भार कमी होऊ शकतो.

सिंह :- सूर्याचे चे संक्रमण आपल्या स्वत:च्याच राशीमध्ये म्हणजे लग्न भावात असेल. हा भाव आपले व्यक्तित्त्व, आरोग्य, चारित्र्य, बुद्धिमत्ता आणि भविष्य दर्शवितो. तुमची नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल, व्यवस्थापन क्षमता सुधारेल. कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. क्रियाशीलता आत्मविश्वास देईल. लोक प्रभावित होतील. क्रोध उत्पन्न होऊन तुम्ही लहान-सहान गोष्टींबद्दलही रागावू शकता. राग नियंत्रित करा. ध्यानधारणा कराच.

See also  फिल्म इंडस्ट्रीत येण्याअगोदर हे काम करत होते 'तिरंगा' जानी उर्फ राजकुमार, एके दिवशी...
Advertisement

कन्या :- या राशीच्या द्वादश भावात सूर्याचे संक्रमण होईल. हा भाव विदेश, खर्च, दान इत्यादी दर्शविते. हे संक्रमण अडचणी,आव्हाने आणू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तळलेले पदार्थ आणि जंक फूड टाळा, व्यायाम करा. डोळ्यांची काळजी घ्या. संबंधित त्रास होऊ शकतो, आर्थिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळा. वाहन जपून चालवा अन्यथा अडचणीत येऊ शकता. आळशीपणा सोडा, सक्रिय रहा.

तुळ :- शुक्राचे स्वामित्व असलेल्या तुळ राशीच्या लाभ भाव म्हणजे एकादश भावमध्ये हे संक्रमण होईल . हा भाव मोठा भाऊ-बहीण, इच्छा इ. दर्शवितो. या काळात आपल्याला आपल्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा, महत्त्वपूर्ण सल्ला, त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्याचा लाभही मिळू शकेल. त्याच वेळी, नोकरी शोधत असलेल्या लोकांना देखील नोकरी मिळू शकते. वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवनात काळ अनुकूल आहे, रागावर नियंत्रण ठेवले तर हे संक्रमण आपल्याला बरेच शुभ परिणाम देईल.

Advertisement

वृश्चिक :- आपल्या दहाव्या घरात सूर्य संक्रमण करेल. दशम भावामध्ये व्यवसाय, कार्यक्षेत्र, सत्ता, आदर इत्यादींचा विचार केला जातो. हे संक्रमण आनंददायी असेल. तुम्ही कार्याशी निष्ठावान रहाल. उच्च अधिकारी खुश असतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वडिलांशी आपले संबंध सुधारतील. या राशीचे व्यापारी व्यवसायात सकारात्मक बदल करून धन लाभ मिळवू शकतील. मान-सम्मान मिळेल.

धनु :- सूर्य धनु राशीच्या नवव्या घरात संक्रमण करेल. हा भाव भाग्य, धर्म, दूरचे प्रवास इ. दर्शवितो. संक्रमण काळात भाग्य तुमचे समर्थन करेल. नवीन कामात यश मिळेल. उच्चशिक्षणात यश मिळू शकते. अध्यात्म आणि धर्म यांच्यापासून थोडे विमुख होऊ शकता. कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. वडीलधाऱ्यांची सेवा करा.

See also  ऐश्वर्या रायच्या अगोदर करिष्मा कपूर सोबत झाला होता अभिषेक बच्चनचा साखरपुडा, पण या कारणामुळे तुटले होते नाते...
Advertisement

मकर :- हे संक्रमण आपल्या आठव्या घरात म्हणजे आयुर्भावामध्ये होईल. या भावमध्ये त्रास, चिंता, अडथळे, शत्रू इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातात. सूर्याचे हे संक्रमण तुमच्या आयुष्यात आव्हानांना कारणीभूत ठरू शकतो. अनिच्छेने कार्यक्षेत्र, निवासस्थान बदलावे लागू शकते. परिस्थितीशी जुळवून नाही घेतले तर अडचणी येऊ शकतात. प्रवासामध्ये चोरी होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळा.

कुंभ :- या राशीच्या सातव्या घरात सूर्य संक्रमण होईल. सप्तम भाव आपल्या जोडीदाराबद्दल आणि जीवनातील भागीदारीबद्दल दर्शवतो. कौटुंबिक परिस्थिती बिघडू शकते. हुकूमशाही वृत्ती त्रासदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. प्रवास करू नका. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक स्तरावर मात्र चांगले फळ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण प्रतिकूल आहे.

Advertisement

मीन :- आपल्या राशीच्या षष्ठम म्हणजे अरि भावात हे संक्रमण होईल. हा भाव शत्रू, रोग, मातृ पक्ष इत्यादीचा विचार केला जातो. मीन राशीसाठी हे संक्रमण चांगले राहील. कोर्टकचेरीच्या कामात यशस्वी झाल्यामुळे मानसिक शांती मिळू शकते. नोकरीत चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळू शकेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. सर्व कामे उत्साहाने कराल. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा.अधिक खाण्यामुळे पचनासंबंधित समस्या होऊ शकतात. बैठे कार्य करत असाल तर व्यायाम केल्यास कंबर किंवा मागील शारीरिक समस्या त्रास देणार नाहीत.
शुभं भवतु:

Advertisement

Leave a Comment

close