तिजोरी भरून जाईल पैसे ठेवण्यास नवीन जागा शोधावी लागेल या 8 राशींना कारण भगवान श्रीविष्णू देत आहेत धन लाभ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नमो स्तवन अनंताय सहस्त्र मूर्तये, सहस्त्रपादाक्षि शिरोरु बाहवे।
सहस्त्र नाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटि युग धारिणे नम:।।

आज भगवान श्रीविष्णूंची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ८ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष : आजच्या दिवशी तुम्हाला धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीत विशेष रस असेल. आपल्या मनातील दोलायमान भावनांमुळे आपण ठोस निर्णय घेऊ शकणार नाहीत. आज पैशाचा व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाण न करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता येईल. धार्मिक कामांकरिता पैसा खर्च होईल. परदेशात स्थायिक झालेल्या आप्तेष्टांच्या वार्ता समजतील.

वृषभ: आज व्यापारात वाढ झाल्याने त्यासंबंधित व्यवहार फायदेशीर सिद्ध होतील. उत्पन्नाची साधने वाढतील. वडील आणि सहयोगी यांच्या पासून लाभ मिळेल आणि आनंदाचे क्षण अनुभवाल. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद मिळेल. पर्यटन, प्रवास इ. आयोजित केला जाईल. महिलांकडून फायदे आणि आदर मिळेल. विवाह योग आहेत. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी येईल.

मिथुन: शारीरिक व मानसिक आनंद राहील. नोकरी, व्यवसायातील तुमच्या श्रमाची आज भरपाई होईल असे दिसते. अधिकारी वर्गाचे प्रोत्साहन आपला उत्साह वाढवेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. वडिलांपासून फायदा होईल. सरकारी काम पूर्ण करण्यात सहजता येईल. ग्रहानुसार वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि सौख्य मिळेल.

See also  श्री स्वामी समर्थ खूपच खुश आहेत या 4 राशींवर, केलेल्या कर्मांची फळे देणार आहेत स्वामी...

कर्क: ग्रह म्हणतात की आज आकस्मिक धनलाभाचे योग बनून भाग्यवृद्धी होईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. धार्मिक कार्यात किंवा प्रवासासाठी पैसा खर्च होईल. घरी कुटुंबातील सदस्य वा बाहेर पदाधिकारी यांच्यासमवेत दिवस व्यतीत केला जाईल. नोकरी, व्यापार, व्यावसायिकांनाही लाभ मिळेल.

सिंह : आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्यावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. चुकीचे विचार तुम्हाला गैरमार्गाला नेणार नाही याची काळजी घेण्यास ग्रह सांगत आहेत. कुटुंबातील सदस्यांसह दुरावा असेल. अनैतिक कृतीतून निंदा होण्याची शक्यता आहे. आज नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार तुमचे खरे मार्गदर्शक असतील.

कन्या : ग्रहांच्या कृपेने आज तुम्ही वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. करमणूक कार्यक्रमामध्ये भाग घ्याल. वस्त्रालंकार आणि वाहन खरेदीचे योग आहेत. नव्या व्यक्तींचा परिचय प्रेमात बदलेल. व्यवसायातील भागीदारांशी संबंध चांगले राहतील. अर्थिक फायदा होईल.

See also  मल्हारीमार्तंड श्री खंडेरायांच्या आशिर्वादाने या 6 राशी चे खिसे भरलेले राहतील जीवनातील समस्या पासून मिळेल मुक्ती...

तुला: ग्रह म्हणतात की आज आरोग्य चांगले असेल. आधी आजारी असणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य सुधारेल. आपण घरात शांतता आणि आनंदाच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात यश आणि कीर्ती मिळून उत्साह वाढेल. नोकरीला फायद्याची बातमी मिळेल आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महिला मित्रांसह भेटी होतील. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांचा पराभव होईल.

वृश्चिक : आज ग्रह प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला देत आहेत. तुम्हाला आरोग्याबद्दल काळजी असेल मुलांच्या संबंधात समस्या उद्भवतील. हट्टी स्वाभिमानाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तथापि, आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगला आहे. ग्रह बौद्धिक चर्चा किंवा वादविवादात भाग न घेण्याचा सल्ला देतात. शेअर्स-सट्टेबाजीच्या प्रलोभनामुळे नुकसान होऊ शकते.

धनु : आज आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगला आहे. नोकरी, व्यापार, उद्योगात आज सकारात्मक वातावरण असेल. शारीरिक व मानसिक आरोग्यही उत्तम राहील. आधीच्या भांडवली गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत ग्रह देत आहेत. इतरांच्या वादविवादात भाग न घेणेच इष्ट ठरेल.

मकर: आज तुम्ही नोकरी, व्यापारातील रणनीतीत शत्रूंचा पराभव कराल. नवीन कामे सुरू करण्यास सज्ज रहा त्यात यश मिळेल, असा ग्रहसंकेत आहे. आज आपण निरोगी मनाने आणि शरीराने प्रत्येक काम कराल. व्यापार, व्यवसायात फायदा होईल. भागीदारीत पैशाचा फायदा होईल. मित्र, नातेवाईक आणि भावंडांशी संपर्क होईल. मनातील संभ्रम सुटेल. विद्यार्थी उज्वल कामगिरी करतील.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 8 राशींना, भगवान शिव शंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

कुंभ: ग्रह म्हणतात की मनामध्ये द्विधा विचार घेऊन आपण ठाम निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. महत्वाचे निर्णय घेऊ नका. बोलण्यावर संयम न ठेवल्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह विवादाची स्थिती उद्भवू शकते. धार्मिक कार्यांसाठी खर्च होतील. आरोग्य कमकुवत राहील. विद्यार्थ्यांसाठी साधारण काळ आहे. वेळीच नकारात्मक विचार दूर करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत.

मीन : आज शरीर तसेच मनाचा उत्साह आणि आनंद आपल्याला दिवसभर चैतन्य व समाधान देईल. जर आपण नवीन कामे हातात घेतली तर तुम्हाला यश मिळेल. धार्मिक वा मंगलकार्य प्रसंगी उपस्थिती राहील. कोणताही निर्णय घेतांना मनात द्विधा विचार येत असल्यास, निर्णय पुढे ढकलण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. कुटुंबासमवेत स्वरुची भोजनाचा आनंद घ्याल. वैवाहिक सौख्य लाभेल.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment