अनेक सुवर्ण संधी मिळणार या 6 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि ॥

आज भगवान श्रीशिवशंकरांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ६ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, मिथुन, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
आज आपला दिवस मध्यम फलदायी राहील, असे ग्रह म्हणतात. आपले आरोग्य अस्वस्थ राहू शकते. तुम्हाला शारीरिक थकवा येईल. शक्य असल्यास प्रवास टाळा. हट्टी स्वभाव सोडा. पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे लक्ष्य द्या. मुलाबद्दल काळजी वाटेल. आज यश मिळेल पण कामाच्या गडबडीमुळे आपण कुटुंबासाठी कमी वेळ द्याल यामुळे कुटुंबातील सदस्यांसह परस्पर संबंध दुरावू शकतात.

Advertisement

वृषभ:
आज तुमचा दिवस शुभ फलदायी होईल, असे ग्रहांना वाटते. दृढ मनोबल आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपण कोणतीही कार्य करण्यास सक्षम असाल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्याबद्दल तुमच्या जेष्ठांची वागणूकही चांगली असेल. कलाकार आणि खेळाडूंसाठी आजचा दिवस उत्तम आहे कारण त्यांना त्यांची कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च कराल.

मिथुन:
आजचा दिवस तुमच्यासाठी एक चांगला आणि फायद्याचा दिवस असेल. मित्र, बंधु आणि शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या नव्या धोरणांची जाणीव होईल. ग्रह भांडवल गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक भांडवल गुंतवावे असा सल्ला देत आहेत. आज तुमच्या चंचल मनस्थितीमुळे विचार सतत बदलतील. शरीर आणि मनाने प्रसन्नता होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुम्ही विरोधकांना हरवू शकाल. हा आनंद आणि सौख्याचा आणि दिवस आहे.

See also  श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच आनंदाची बातमी मिळणार...
Advertisement

कर्क:
हा दिवस साधारण आहे, असं ग्रह म्हणतात. आज तुमच्या मनात अपराधीपणाचे भाव असतील. आपण जे काही काम करता त्यात समाधान मिळणार नाही. आरोग्य चांगले राहणार नाही. डोळ्याशी निगडित अडचण येण्याची शक्यता आहे. कुटूंबातील सदस्यांमध्ये परकेपणा असू शकतो. तुमची मानसिक वागणूक नकारात्मक असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे. खर्चावर संयम ठेवा.

सिंहः
आज तुमचा दिवस शुभ असेल. आज तुमचा आत्मविश्वास परीपूर्ण असेल. दृढनिश्चयाने प्रत्येक कार्य पूर्ण करण्यास सक्षम असाल. शासकीय कामात तसेच सरकारकडून फायदे मिळतील. वडील आणि वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर, मानसन्मान मिळेल. स्वभावात रागाचे प्रमाण जास्त असेल. पोट संबंधित वेदना त्रास देऊ शकते, म्हणून खाण्यापिण्याची काळजी घ्या. संपूर्ण दिवस आनंदाने व्यतीत होईल.

Advertisement

कन्या:
आपला दिवस शारीरिक आणि मानसिक चिंतांच्या ओझ्याखाली व्यतीत होईल. आपला अहंकारामुळे कोणाशीही भांडणार नाही याची काळजी घ्या. कोर्टकचेरीच्या कामात काळजी घ्या. आकस्मिक पैसे खर्च करावे लागतील. मित्रांमध्ये कोणतेही गैरसमज, मतभेद नसल्याचे सुनिश्चित करा. धार्मिक कामांच्या साठी पैसा खर्च होईल. शांत मनाने कार्य करा. रागामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता असेल. नोकरीत काळजी घ्या. आपल्या हाताखाली असलेल्या लोकांपासून सावध रहा

See also  या 4 भाग्यवान राशींवर श्री शनिदेव कृपा करणार, कठीण काळ दूर होणार जीवन आनंदी राहणार…

तुळ:
आजचा दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. आज तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसह भेटण्याची आणि काही निसर्गरम्य ठिकाणी सहलीस जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला संतती व पत्नीकडून आनंद मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. उत्पन्न वाढू शकते. व्यापारी वर्गाला चांगले उत्पन्न मिळू शकते. महिला मित्रांपासून फायदा होईल. आपल्याला सर्वोत्तम वैवाहिक आनंद मिळेल.

Advertisement

वृश्चिक:
हा दिवस शुभ आहे, असं ग्रह म्हणतात. आपल्या घरातील जीवनात आनंद आणि सौख्यपूर्ण वातावरण असेल. आपले सर्व काम अडथळा न येता पूर्ण केले जाईल. मानसन्मान मिळू शकतो. नोकरी, व्यवसायात पदोन्नती मिळेल. उच्च अधिकारी आणि वडीलजन प्रसन्न होतील. आरोग्य चांगले राहील. लाभांचे योग आहेत. व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी बाहेरगावी प्रवास होईल. मित्र आणि नातेवाईकांपासून फायदा होईल. संततीची समाधानकारक प्रगती होईल.

धनु:
ग्रह आज तुम्हाला प्रवास पुढे ढकलण्यास सूचित करतात. आज तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. आरोग्य काहीसे अस्वस्थ राहील. मनामध्ये मुलांविषयी चिंता असेल. व्यापार, व्यवसायात अडथळे येतील. असे दिसतेय की आज भाग्य साथ आणि आधार देत नाहीय. धोकादायक विचार आणि वागण्यापासून दूर रहा. कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. उच्च अधिकाऱ्यांशी संघर्ष होईल. स्पर्धकांशी वादविवाद टाळा.

Advertisement

मकर:
आज आपल्या कार्यालय आणि व्यवसाय क्षेत्रात परिस्थिती अनुकूल असेल, असे ग्रह म्हणतात. ऑफिसची कामे तुम्ही सक्षमपणे करू शकाल. व्यावहारिक आणि सामाजिक कार्यासाठी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. खाण्यापिण्यात काळजी घ्या. अचानक खर्चाचे योग आहेत. भागीदारांमधील अंतर्गत मतभेद वाढतील. गुडघ्यात वेदना होऊ शकते. स्वत:ला राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवा. आज नवीन काम सुरू करू नका असा सल्ला ग्रहांनी दिला आहे.

See also  नशिबाने भरपूर त्रा’स दिला पण आता श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे या 7 राशींना मिळणार नशिबाची साथ…

कुंभ:
आज तुम्हाला स्वतःमधे दृढ मनोबल आणि आत्मविश्वास दिसेल. एखादा प्रणयप्रसंग आपला दिवस आनंदी करेल. भिन्नलिंगी व्यक्तीशी ओळख आणि मैत्री वाढेल. छोटा प्रवास किंवा आनंददायक सहल घडेल. सुरुची भोजन आणि नवे वस्त्रालंकार यामुळे मन खूप आनंदित होईल. विवाहित जोडप्यांना उत्तम वैवाहिक आनंद मिळेल. समाजात तुमचा आदर वाढेल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारीत फायदा होईल आणि ग्रहांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत.

Advertisement

मीन:
आजचा दिवस तुमच्या दिवसासाठी शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. आज तुमच्याकडे दृढ मनोबल आणि आत्मविश्वास असेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनंदिन काम चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम असेल. स्पर्धकांसमोर विजय होईल. स्वभावातील उत्तेजना नियंत्रित करा, जेणेकरून हळूवारपणे बोलून आणि विनम्रपणे वागून सर्व कामे मनाप्रमाणे पूर्ण होतील. संततीकडून बातम्या येऊ शकतात. सहकारी व नोकरदार यांचेकडूनही सहकार्य मिळेल.

शुभं भवतु: !

Advertisement

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close