श्री शनी देवांच्या कृपेने या 5 राशींच्या नशिबात आहे कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

।। औम प्रां प्रीं प्रौं स: भूर्भुव: स्व: औम शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तु न:.औम स्व: भुव: भू: प्रौं प्रीं प्रां औम शनिश्चराय नम: ।।

श्री शनी देवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ५ भाग्यवान राशी आहेत…मेष, वृषभ, कन्या, धनु आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष:
तुमचा दिवस मित्रांच्या सहवासात व सामाजिक कार्यात व्यतीत होईल. मित्रासाठी पैसेही खर्च करावे लागतील. परंतु नवीन मित्रांसह ओळख होण्याची देखील शक्यता जास्त आहे, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी कामात यश मिळेल. वडिलांचे सहकार्य देखील मिळेल आणि त्यांचा आनंद वाढेल. लांब किंवा परदेशात असलेल्या मुलांच्या संबंधात चांगली बातमी मिळेल किंवा त्यांना भेटण्याची संधी मिळेल. आकस्मिक फायदा होऊ शकतो. प्रवास, स्थलांतर आणि पर्यटन होईल.

वृषभ:
हा दिवस शुभ आहे, असे ग्रह म्हणतात. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर ठरेल. व्यवसायात पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि समाधान देखील मिळेल. मित्रांची भेट झाल्याने आनंद होईल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन:
आपला दिवस संकटग्रस्त असेल, असे ग्रह म्हणत आहेत. मानसिकदृष्ट्या, आपण चिंता आणि शारीरिकदृष्ट्या आळस व शिथिलतेचा अनुभव घ्याल. काम करण्याचा उत्साह कमी राहील. व्यवसायाच्या ठिकाणी उच्च अधिकारी आणि सहकारी कामगारांचे वर्तन नकारात्मक असेल. विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो. मुलांसोबत मतभेद किंवा त्यांच्या चिंतांमुळे मन अस्वस्थ राहिल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा.

READ  श्रीदुर्गामातेच्या कृपेने या 6 राशीच्या आयुष्यात बदल घडणार, धन लाभ होणार, आर्थिक अडचण दूर होणार...

कर्क:
वैचारिक नकारात्मकता दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला अस्वस्थ करेल. म्हणूनच ग्रह नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा इशारा देत आहेत. रागावर आजही तुम्हाला संयम ठेवावा लागेल. खर्च जास्त होईल. कुटुंबांमध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्या. आज नवीन कामे सुरू करू नका. नवीन ओळखदेखील विशेष फायदेशीर ठरणार नाही. सरकारविरोधी प्रवृत्तींपासून दूर राहणेच फायद्याचे ठरेल.

सिंहः
आज पती-पत्नीमधील मतभेदांमुळे वैवाहिक जीवनात त्रास होऊ शकतो, असं ग्रह म्हणतात. तुमच्यातील दोघांचेही कौटुंबिक आरोग्य बिघडू नये याची काळजी घ्या. ऐहिक व इतर प्रश्नांमुळे तुमचे मन आज उदासिन राहील. सामाजिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. भागीदारांमध्ये वागणे व बोलणे समोपचाराचे ठेवा अन्यथा मतभेद देखील उद्भवू शकतात. कोर्टकचेरीपासून शक्यतो दूरच रहा.

कन्या:
आज व्यवसाय क्षेत्रात फायदा व नावलौकिक मिळून प्रसिद्ध होण्याची शक्यता जास्त आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरणात तुम्हाला आनंद मिळेल. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील निरोगी असाल. आर्थिक फायदा होईल. आधीच्या रुग्णाची तब्येत सुधारेल. स्पर्धकांविरोधात विजयी होतील.

READ  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 6 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण…

तुला:
बोलण्यातील मनमोकळेपणा आणि गोडव्याचा परिणाम इतर लोकांवर होईल आणि यामुळे इतर लोकांशी असलेल्या संबंधांमध्ये सुसंवाद निर्माण होईल. आपण चर्चेत देखील सक्षमपणे प्रभाव निर्माण करू शकाल. मात्र परिश्रमांच्या तुलनेत परिणाम समाधानकारक होणार नाहीत आणि तरीही तुम्हाला कामात पुढे जावे लागेल. अपचनामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या. साहित्य लेखनात रस वाढेल.

वृश्चिक:
लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे, असे ग्रह म्हणत आहेत. शारीरिक आणि मानसिक आजारामुळे चिंता कायम राहील. आईची तब्येत बिघडू शकते. पैशाची आणि प्रसिद्धीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण दोलायमान होईल. मनामध्ये अस्वस्थता असल्यामुळे निद्रानाशही आज तुम्हाला त्रास देईल असा इशारा ग्रह देत ​​आहेत.

धनु:
आज स्पर्धकांचा पराभव होईल, असे ग्रह म्हणतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्य चांगले राहील. नोकरी, व्यापार आणि उद्योगामध्ये नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. आनंदात प्रियजनांबरोबर वेळ घालवाल. अध्यात्माचा शांततापूर्ण आनंद आज तुमच्या आयुष्यात राहील. मित्र आणि प्रियजनांना भेटून आनंद होईल.

मकर:
आजचा दिवस संमिश्र फलदायी दिवस आहे, असं ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांशी काही गैरसमज झाल्यामुळे किंवा वाईट सवयीमुळे मनामध्ये अपराधीपणा येईल. मानहानी होईल शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल काळजी घ्या. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस असणार नाही. आपण शेअर्स बाजारात भांडवल गुंतवणूकीचे आयोजन करण्यास सक्षम असाल. गृहिणी मात्र आज असमाधानी राहतील. अध्यात्म आज मानसिक शांततेचा उपाय म्हणून सिद्ध होईल.

READ  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 6 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

कुंभ:
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फायदेशीर आहे, असे ग्रह म्हणतात. कौटुंबिक वातावरण हे आनंदाने भरलेले असेल. आपण मित्रमंडळी आणि कुटूंबासमवेत वेळ घालवाल. आज आपण प्रवास, स्थलांतर आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल. अध्यात्माचा आश्रय घेऊन वैचारिक नकारात्मकता दूर करण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे.

मीन:
आज कोर्ट-कचेरीच्या किंवा स्थावर मालमत्तेच्या संबंधित कामकाजात न पडण्याचा सल्ला ग्रह देत ​​आहेत. आज मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामांमध्ये फायदा होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या नातेवाईकांच्या वियोगाचा विषय उपस्थित असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील. हे लक्षात ठेवा की, आता मिळणारे फायदे घेण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. व्यवहारात चर्चा केल्यानंतर निर्णय घ्या. अपघात आणि गैरसमजांपासून कटाक्षाने दूर रहा.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंका निरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment