या 5 भाग्यवान राशींवर श्री शनिदेव कृपा करणार, कठीण काळ दूर होणार जीवन आनंदी राहणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभायच।
नम: कालाग्निरूपाय कृतान्तायच वै नम:।।

आज श्री शनिदेवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ५ भाग्यवान राशी आहेत… वृषभ, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.

मेष :
घर, कुटुंब आणि मुलांच्या बाबतीत आज तुम्हाला काळजीची भावना येईल. आज आपण कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींपासून दुरावा अनुभवाल. महत्वाच्या कामास्तव होणारे प्रवास टळतील. आणि त्याचे व्यवसायाच्या संबंधात तोटेही असतील. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता राहील. नोकरीनिमित्त प्रवासयोग. दगदग, अपघात योग आहेत. आग, जलाशयापासून जपण्याचा ग्रह सल्ला देत आहेत.

वृषभ :
आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी शुभ आहे. आज नवीन कार्यक्रम हाती घेण्यास उत्सुक असाल. याशिवाय आज तुम्हाला आर्थिक फायदाही होईल. परदेशात राहणारे मित्र किंवा नातेवाईकांच्या बातम्या तुम्हाला प्रभावित, आनंदित करतील. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. तीर्थयात्रा करणे शक्य होईल. जास्त लाभामुळे तुम्हाला उत्साही वाटेल, असे ग्रह म्हणतात.

मिथुन:
अनियंत्रित रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. निंदा आणि निषेधात्मक विचारांपासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. जास्त खर्चामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. ऑफिसमधील, कुटुंबातील सदस्य आणि सहकार्यांशी मतभेद किंवा वादविवाद घडतील ज्यामुळे मन दु:खी होईल. आजारी, रूग्णाला आज नवीन उपचार वा ऑपरेशन न करण्याचा सल्ला ग्रह देत आहेत. देवाची उपासना, जप आणि अध्यात्म यामुळे आपणास मनशांती प्राप्त होईल.

See also  श्री महालक्ष्मी देवी करणार या 7 राशींचे कल्याण, मिळणार पैसा आणि प्रसिद्धी...

कर्क:
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी असमाधानाचा ठरेल. नवीन वस्तू, उपकरणे, उत्कृष्ट दागिने आणि वाहने खरेदी टाळा. मौजमजा आणि करमणुकीत पैशाचे नुकसान होईल, असे ग्रहमान आहे. यासह प्रेमाच्या व्यक्तीबरोबर भेटीतून वादविवाद होतील. विवाहित जीवनात उदास भावना येईल. भागीदारीमध्ये नुकसान होईल. प्रवासाचीही शक्यता आहे.

सिंह:
आज तुम्ही मानसिक दृष्टया उदास रहाल. तुमची उदासीन वृत्ती आणि नैराश्य यामुळे मानसिक त्रास अनुभवाल. तरीही कौटुंबिक वातावरण शांत व समाधानी राहील. दैनंदिन कामात थोडा अडथळा येईल. कठोर परिश्रम करून त्यावर मात कराल. नोकरी, व्यापारात संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. शारीरिक आरोग्य ठीक राहील. अध्यात्म व नामस्मरणाने मनःशांती मिळेल.

कन्या:
आजचा दिवस तुम्हाला आनंदी, चिंतामुक्त करणारा असेल. आज तुमच्या मनास अतिशय उल्हसित वाटेल. आपण मुलांबद्दल आणि विशेषत: आरोग्याबद्दल अधिक समाधानी असाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रगती. भागीदारी आणि शेअर-सट्टा इ. पासून फायद्याचा ग्रहांचा सल्ला आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होईल.

See also  श्रीशिवशंकराच्या कृपेने नोकरी, व्यापार-व्यवसायात यशस्वी होणार या ६ भाग्यवान राशी, जीवनाला मिळणार योग्य दिशा...

तुळ :
ग्रह म्हणतात की आज तुम्ही अत्यंत भावनिक व्हाल आणि यामुळे तुम्हाला मानसिक द्विधेचा सामना करावा लागेल. आईशी असलेले नाते बिघडू शकेल किंवा आईच्या आरोग्याबाबत चिंता असेल. प्रवासासाठी सध्याचा काळ अनुकूल नाही. कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित चर्चेत सावध, सतर्क राहण्याची गरज आहे. पाण्यापासून सावध रहा.

वृश्चिक :
कामाच्या यशासाठी, आर्थिक फायद्यासाठी आणि संपत्तीसाठी चांगला दिवस आहे. आपण नवीन कार्य देखील सुरू करू शकता. भावंडात आज अधिक सहकार्य आणि प्रेम असेल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यास सक्षम असाल. प्रिय व्यक्तीच्या संगतीमुळे मनाला आनंद होईल. एक छोटी सहल वा प्रवास होईल. आरोग्य उत्तम राहील ग्रहाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

धनु :
आज दोलायमान मनःस्थिती आणि कलुषित कौटुंबिक वातावरणामुळे तुम्हाला अडचणी येतील. व्यर्थ पैसे खर्च होतील. निर्णयात उशीर झाल्याने कामे अपूर्ण राहतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेणे फायद्याचे ठरणार नाही, असे ग्रह म्हणतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याला एखाद्या दूरच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या रोषाचा सामना करावा लागेल.

मकर:
आपला दिवस देवाच्या नावाने स्मरण करून प्रारंभ होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. घरगुती जीवनात आनंदी वातावरण राहील. आपली प्रत्येक कार्ये सहजपणे पूर्ण होतील. आज आपल्याला मित्र आणि नातेवाईकांकडून भेट मिळेल, शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आनंदी रहाल. नोकरी व्यवसायातही अनुकूल परिस्थिती राहील. वैवाहिक जीवनात तुम्ही आनंदाचा अनुभव घ्याल.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

कुंभ:
ग्रह म्हणतात की आजचा दिवस तुमच्या नोकरी, व्यापार, उद्योगासाठी फायदेशीर दिवस आहे. उत्पन्नाची वाढ होईल. जेष्ठमंडळी आणि मित्रांकडून तुम्हाला फायदा मिळेल. नवीन मित्र तयार होतील, ज्यांची मैत्री भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. शुभ प्रसंगी जाणे आवश्यक असेल. मित्रांसह प्रवास आयोजित कराल. कुटुंबाकडून चांगली बातमी येईल. अचानक धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.

मीन :
ग्रह आज कोणासही जामीनदार न घेण्याचा वा होण्याचा आणि तसेच मोठा आर्थिक सौदा करू नका असा सल्ला देतात. विनाकारण मनस्ताप आणि खर्च वाढेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी गैरसमज झाल्याने भांडण होईल. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. एखाद्याचे कल्याण करण्यासाठी जाल आणि स्वतःच आपत्तीला मिठी माराल, असे संभाव्य अपघात टाळा.

शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment