श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तगुरु यांची कृपादृष्टी आहे या ५ राशींवर, धन, सुख, समाधानाचा होईल लाभ; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम् | सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||

सर्व व्याधींतून मुक्ती देऊन भक्तांना भावसागरातून पार नेणारे श्री दत्तगुरु प्रसन्न आहेत आज यांच्यावर…

मेष : ग्रह आज तुम्हाला नवीन कामे करण्याचा सल्ला देत आहेत. आज आपण गूढ ज्ञान आणि रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. वाणी आणि वागणे संयमित ठेवणे आपल्या स्वतःच्या हिताचे आहे. उत्तरार्धात नवीन कार्य सुरू करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायाच्या कार्यस्थळी सतर्क रहा. सहकाऱ्यांची मदत मिळेल.

वृषभ : दिवसाची सुरुवात आनंदी होईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. आज नवीन ओळखी होऊ शकतात. छोटेखानी समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. उत्तरार्धात आचार, विचार आणि प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला ग्रह देतात. वाणी नियंत्रित ठेवून वाद टाळू शकाल. हितशत्रूंपासून सावध रहा. अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : आजचा दिवस तुमचा मनोरंजन करण्याचा आणि आनंद घेण्याचा दिवस आहे, असे ग्रह म्हणतात. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण राहील. मित्रांसह पर्यटनस्थळांना भेटीचे आयोजन केले जाईल. सुरुची भोजन घेण्याची संधी लाभेल.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 7 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

कर्क : प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही परिश्रमपूर्वक काम केले तर पुढे जाण्याची संधी आहे. पोटाचे आरोग्य जपा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. दुपारनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल. तब्येत सुधारून तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी व्हाल. कार्यालयात सहकार्याचे वातावरण राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्पर्धकांवर विजय मिळवाल.

सिंह : आजचा दिवस काळजीपूर्वक वाटचाल करण्याचा आहे, असं ग्रहांनी म्हटलं आहे. मानसिक ताण टाळा. शारीरिकदृष्ट्या थकवा अनुभवाल. कुटुंबातील सदस्यांबरोबरचे वाद टाळा. संयम बाळगण्याचा ग्रहांचा सल्ला आहे. संपत्तीचे नुकसान होईल. मुलांविषयी चिंता असेल. बौद्धिक चर्चेपासून दूर रहा. पैशाच्या गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.

कन्या : ग्रह दर्शवितात की आज लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे योग आहेत. भावंडं आणि नातेवाईकांपासून फायदा होईल. नात्यात प्रेम आणि आदर भावना राहील. परंतु उत्तरार्धात, आपण चिंताग्रस्त व्हाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा. वैयक्तिक जिव्हाळ्याच्या व्यक्तीसोबत खटके उडण्याचा संभव. आईची तब्येत ढासळण्याची शक्यता. पाण्यापासून सावधानतेचा इशारा आहे.

तुला : आरोग्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खराब होऊ शकते. कौटुंबिक कलहात वाणीवर ताबा ठेवा. नकारात्मक मानसिकता टाळा. घरातील सदस्यांसोबत वाद होणार नाही याची काळजी घ्या. दुपारनंतर आपल्या मनातील अपराधी भावना निघून जाईल आणि मन आनंदाने भरले जाईल. आपण नवीन कार्य करण्यास तयार रहाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. छोटा प्रवास घडेल.

See also  आज शनिदेव करणार चमत्कार, या ८ राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल...

वृश्चिक : आज तुमचा दिवस मध्यम फलदायी ठरेल, असे ग्रहमान आहे . आपण आनंद आणि समाधानाचा अनुभव घ्याल. कुटुंबातील सदस्यांसह आनंददायक दिवसाची सांगता होईल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. दुपारनंतर कुटुंबात भांडणाचे वातावरण असण्याची शक्यता आहे, म्हणून वेळीच संभ्रम दूर करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शारीरिक आरोग्य बिघडेल.

धनु : आज ग्रह वाहने सावधगिरीने चालविण्याबाबत सल्ला देत आहेत. आनंद प्राप्तीसाठी तुम्ही जादा खर्च कराल. स्वभाव काही प्रमाणात उग्र बनेल. प्रियजनांसोबत कुरबुरी होतील. उत्तरार्धात आपल्याला शारीरिक आणि मानसिक आनंद मिळून स्वास्थ्य लाभ मिळेल. नातेवाईकांच्या भेटीने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मकर : हा दिवस व्यवसाय-उद्योगास फायदेशीर आहे, असं ग्रह सांगतात. कुटुंबापासून फायदा होईल. सांसारिक जीवनात सुखद प्रेम लाभल्याने मनही सुखी होईल. उत्तरार्धात मानसिक त्रास आणि खराब तब्येत तुम्हाला त्रास देईल. बोलताना गोंधळ टाळा. पैसा मनोरंजन व करमणुकी साठी खर्च होईल. स्वतःचा मान सन्माना जपा.

See also  श्री खंडेरायाची या 7 राशीवर पडली शुभ दृष्टी, मनासारखे काम होईल पूर्ण, आनंदाने भरलेलं राहील जीवन...

कुंभ : आजचा दिवस हा लाभदायी आहे, असे ग्रह म्हणतात. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल. सन्मान होईल. नोकरी किंवा व्यवसायात पदोन्नती मिळेल. उच्च अधिकारी आणि वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. आरोग्यही चांगले राहील. विविध मार्गांनी उत्पन्न वाढेल. मित्रांना भेटाल. मुलांच्या समाधानकारक प्रगतीमुळे आपले हृदय आणि मन आनंदित होईल. सांसारिक जीवनात आनंद राहील.

मीन : आपण आज बौद्धिक लेखन कार्यात सक्रिय व्हाल. नवीन कार्य सुरू करण्यास दिवस शुभ असेल. छोटा प्रवास, धार्मिक स्थळी भेट देण्याची शक्यता आहे. परदेशात असलेल्या मित्र आणि प्रियजनांशी संपर्क होऊ शकेल. शरीराला आनंद आणि थकवा दोन्हीचा अनुभव येईल. आपले काम निर्विघ्न पार पडेल. धनलाभ होईल. मित्रांपासून फायदा मिळण्याचे ग्रहयोग आहेत.

आज श्रीपादवल्लभ दत्त दिगंबरांची विशेष कृपा लाभलेल्या राशी आहेत… वृषभ, मिथुन, कर्क, कुंभ आणि मीन
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment