सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ‘ही’ साऊथ अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण, जाणून घ्या कोणता आहे चित्रपट…
ओह…तिच्या सौंदर्याची कमाल..तिची ती काळजावर घाव करणारी अदा…लांबसडक काळेभोर दाट केस…मोठे मोठे ङोळे…तिला पाहताच आपल्या सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकतो. अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो, तुमची- आमची सर्वांची लाडकी क्रश रश्मिका मंदाना. आता तुम्हांला ठाऊकच आहे की हिची कमाल. जेव्हापासून रश्मिका आली, तेव्हापासून तिने सगळ्याच अभिनेत्रींची सुट्टी करून ठेवली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. त्यामुळे ती आपले अदाकारी फोटोज् व व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठी नेहमी शेयर करत असते. नुकताच तिने आपला लहानपणीचा गोंडस असा सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. हा फोटो शेयर करत कॅप्शन मध्ये तिने “कोरोना जाण्याची प्रतिक्षा करत आहे” असे लिहिले आहे. याच्या मागील सिक्रेट तुम्हांला समजलं का..
तर मित्रांनो आपल्या तर माहीत आहे की, साऊथ इंडस्ट्रीतील टॉप प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदानाला ओळखले जाते. परंतु आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण साऊथ सिनेसृष्टीची ही नखशिखांत सौंदर्याची क्वीन लवकरच बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे.
रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासह “मिशन मजनू” या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये आपली ढिंकचाक एन्ट्री करत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू बागची हे करणार आहेत. हल्लीच रश्मिकाने आपल्या या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे.
तर काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदाना हिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर करत आपण “मिशन मजनू” या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केले असल्याचे सांगितले. या फोटोत तिच्या व सिद्धार्थ च्या हातात स्क्रिप्ट पाहायला मिळते. हा फोटो शेयर करत तिने लिहिले आहे की,”ओह..मी माझ्या टीमला जॉईन करण्यासाठी वाट पाहू शकत नाही, चला तर मग आता मिशनला सुरुवात करूया.”
या चित्रपटात 1970 च्या पाकिस्तान मधील भारताच्या धाडसी मोहिमेची कथा आहे. ज्यामुळे दोन्ही देशांतील नातेसंबंध कायमस्वरूपी साठी बदलले. परवेज शेख, असीम अरोङा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रीलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा हा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. यामध्ये रश्मिका मंदाना त्याच्यासोबत काम करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.