“माझ्या नवऱ्याची बायको” फेम या अभिनेत्रीचा विमानतळावर बॉयफ्रेंड सोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
मनोरंजन क्षेत्रात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड याचे अनेक किस्से आपल्याला रोज पाहायला मिळतील एवढे आहेत. ओळख झाली किंवा सोबत काम केलं की अनेक अभिनेत्री अभिनेत्यामध्ये मैत्री होते आणि पुढे मग त्याचं रूपांतर प्रेमात होतं.
मराठी मध्ये एक अशी लोकप्रिय अभिनेत्री आहे की जिचा बॉयफ्रेंड ला भेटण्यासाठी चा एयरपोर्ट वरचा उतावीळ झालेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
रसिका सुनील ( rasika sunil ) हे नाव ऐकलं असेलच ना. होय माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री. तर तिच्या बद्दलच माहिती आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊ. ( majhya navryachi bayko )
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी रिलेशनशीपमुळे. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. रसिका बॉयफ्रेंडला आणण्यासाठी एअरपोर्टवर गेली होती. त्याला ती भेटण्यासाठी उतावीळ झाल्याचे या व्हिडीओत पहायला मिळते आहे.
रसिका सुनीलने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझा डान्स मंकी इकडे आला आहे. ही मिठी पूर्ण वाटलीच नाही. बिन, मी तुला खूप मिस केले.
सोशल मीडियावर एक तर आधीच रसिका हॉ’ट फोटो आणि व्हिडीओ मुळे नेहमी चर्चेत असते. त्याचप्रमाणे बॉयफ्रेंड ला विमानतळ वर भेटायला ती किती उत्सुकता दाखवत होती हे तिच्या व्हिडीओ वरून लक्षात चाहत्यांना येत आहे.
सोबत लिंक दिलेल्या या व्हिडीओत रसिका तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीला आणण्यासाठी एअरपोर्टला गेलेली दिसते आहे. त्याला एअरपोर्टवर पाहताच रसिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती त्याला पाहून एअरपोर्टवर उड्या मारू लागली आणि आनंदाने बागडू लागली. तो एअरपोर्टवरून बाहेर येताच त्याला तिने घट्ट मिठी मारली. हा सर्व क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.
रसिकाने आदित्य बिलागीला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ती त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
दोघांची जोडी तशी खुप सुंदर आहे. आणि लवकरात लवकर त्यांनी आपलं नातं लग्नात बदलावं अशी चाहत्यांची मागणी आहे. त्या दोघांना आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.