‘रात्रीस खेळ चाले 2’ मलिकतेतील ‘या’ सदस्याचे झाले निधन, अपूर्वाने वाहिली श्रद्धांजली!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या रात्रीस खेळ चाले 2 च्या सेटवरुन एक दुःखद बातमी आली आहे. या मालिकेच्या टीममधील एका सदस्याचे 8 फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले असून मालिकेत शेवंताची भूमिका वठवणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे.

गूढ कथानक आणि मालवणी भाषा यामुळे ‘रात्रीस खेळ चाले -२’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या ही मालिका रंगतदार वळणावर आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट लिहिली असून त्यातून चाहत्यांना एक आवाहन देखील केले आहे. अपूर्वाने लिहिले, “ रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका , त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफीने.

See also  पार्ले जी बिस्किटावर दिसणारी मुलगी बघा कशी दिसते? फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Ratris Khel Chale Poster

ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. तारीख ८.२ .२०२० त्यांनी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ४वाजता चहा कॉफी दिली.आणि अचानक छातीत दुखायला लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं आणि उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते निधन पावले.

रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टिमला त्यांनी तरोताजा केले.म्हणुन आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील.त्याच्या पश्चात पत्नी , ३ मुली आणि १मुलगा असा परिवार आहे.म्हणुन त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून आमच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करु. आपणांस सांगु इच्छिते की तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे.आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. 🙏”

See also  शिल्पा शेट्टी : 'माझा पती पॉर्न नाहीतर एरोटिक फ्लिम्स बनवतो' ; जाणून घ्या दोघात नेमका काय फरक असतो?

अपूर्वाने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना एक आवाहन देखील केले आहे. ती म्हणते, ”आपणांस सांगु इच्छिते की, तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. ”

a still from ratris khel chale 2

ओमबीर सिंह
युनियन बँक
दीपांशी ओमबीर सिंह
अकाऊंट नंबर – 569002010003891
IFSC कोड – UBIN556904

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment