जाणून घ्या ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेतील कलाकरांच्या खऱ्या आयुष्याबद्दल, ही अभिनेत्री तर होती डॉक्टर…

लॉ’क डा’ऊ’न शि’थि’ल केल्यानंतर मराठी मध्ये अनेक मालिका आल्या आहेत. त्यात नवीन मालिका खूप आहेत. कारण या को’वि’ड काळात रसिकांना वेगळा विषय हवा. जो जवळचा वाटेल. तर श्रीमंताघरची सून ही मालिका आता आपल्या भेटीला आलेली आहे. तर त्यात खूप चांगली कलाकार काम करत आहेत. जी सध्या मराठीत आ’घा’डी’व’र आहेत. तर त्या सर्वांची नावेही माहीत व्हायला हवी. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

रुपल नंद : रुपल नंद हिला आपण अनेक उत्तमोत्तम भूमिकांसाठी ओळखतो. पे’शा’ने डॉक्टर असणाऱ्या रुपल हिने एकांकिकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. पुढे मालिकांमधून तिने काम करणं सुरू केलं. या क्षेत्रातली, गोठ ही तिची पहिली मालिका.

त्यांनतर तिने फुलपाखरु, आनंदी हे जग सारे या मालिकांतून भूमिका केल्या आहेत. यांतील काही मालिकांमध्ये यशोमान आपटे हा तिचा सहकलाकार राहिलेला आहे. या मालिकेत तिने अनन्या ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे.

यशोमान आपटे : यशोमानचं नाव घेतलं की त्याने केलेली कामं हमखास आठवतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शाळेत असे पर्यंत त्याने कधीही अभिनय केला नव्हता. अगदी घरी कलेसाठी पोषक वातावरण असताना. पण महाविद्यालयात आल्यावर मात्र त्याने स्वतःला या क्षेत्रात झो’कू’न दिलं.

अनेक एकांकिका स्पर्धांमधून त्याने भाग घेतला आणि पारितोषिकं मिळवली. अगदी मुंबई युनिव्हर्सिटीची पारितोषिकं ही मिळवली. बी.पी. या नाटकातही तो होता. पुढे फुलपाखरू ही मालिका आली आणि त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. नुकताच त्याने सिंगिंग स्टार या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.

गाण्याचं कोणतंही प्रशिक्षण नसतानाही उत्तम गायकीच्या जो’रा’व’र त्याने या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. श्रीमंता घरची सून या मालिकेतील अथर्व या नायकाची भूमिका त्याने साकार केली आहे.

ऐश्वर्या नारकर : ऐश्वर्याजींचं नाव उच्चारलं की उत्तम अभिनय हे ओ’घा’ने आलंच. त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम प्रकारे व्यक्तिरेखा साकारून भूमिका जि’वं’त केल्या आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून काम केलेलं आहे. नजीकच्या काळातली त्यांनी साकारलेली पेशवीण बाई ही स्वामिनी मधील व्यक्तिरेखा प्रेक्षकपसंतीस उतरली आहे.

तसेच त्यांनी केलेल्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत त्यांनी अथर्व ची आई आणि अनन्या ची सासू ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

अविनाश नारकर : अविनाशजींचं नाव घेतलं की आठवतं ते त्यांचं रणांगण या नाट्यकृतीतलं अफलातून काम. त्यांची पल्लेदार वाक्य उ’द्धृ’त करण्याची पद्धत प्रेक्षकांना मोहवून टाकते. मालिका, नाटकं यातून त्यांनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे.

त्यांच्या अभिनयाने अनेक नावाजलेल्या कलाकृती नटल्या आहेत. त्यांनी ऐश्वर्याजीं सोबत अनेक नाट्यकृतींत अभिनय केलेला आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेतही दोघांनी नवरा बायकोची भूमिका साकारली आहे. अथर्व चे वडील म्हणजे अशोक ही ती भूमिका आहे.

अश्या प्रकारे अनेक कलाकार अजून या मालिकेत काम करतात. ज्यांचं सध्या इंडस्ट्रीत बऱ्यापैकी नाव आहे. त्यामुळे मालिका खूप चालली आहे. टीआरपी च्या बाबतीत ही मालिका खूप आघाडीवर आहे. त्या सर्वांना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment