अभिनेत्री रेखा या वयाची साठी ओलांडून सुद्धा एवढ्या सुंदर कश्या राहतात माहितेय? जाणून घ्या त्यांच्या सुंदरतेचं रहस्य…
आज बॉलिवूड मधील सुंदर नव्या जुन्या अभिनेत्री यांचा विषय जरी निघाला तरी एक नाव आजही सर्वांसमोर येतं ज्या नावाने अक्षरशः वेड लावलं होतं एकेकाळी. म्हणजे अजूनही काही कमी नाही सौंदर्य. तर जिच्या बद्दल आपण बोलत आहोत ती आहे रेखा. कुणाला नसेल माहिती ? असा एकही फिल्मी प्रेमी नसेल. ज्याला रेखा सारखी लोकप्रिय अभिनेत्री माहिती नसेल. 90 च्या दशकात आणि त्याआधी रेखाने आपल्या अभिनयाने वेडे करून टाकलं सगळ्यांना.
आणि सुंदर दिसणे हे तिचं कधी कमी होतच नव्हतं. म्हणजे आज रेखा 60 च्या वर गेलेली आहे; पण तिच्याकडे पाहिलं की वाटतच नाही ती म्हातारी झालीय. अजून ही तिच्यामध्ये सौन्दर्य कुटून कुटून भरलेलं आहे. आजही तिचे लाखो चाहते आहेत. कधी जेव्हा ती परीक्षण करते जज बनून तर सारा भारत तिला बघायला येतो. डान्स शो वेळी. तर अशी क्रेज आहे तिची.
तिचं सौंदर्य जर शब्दात व्यक्त करायचं झालं तर कसं करता येईल ? कारण तिचं सौन्दर्य रहस खूप गुपित आहे. म्हणजे बघा ना आकर्षक चेहरा, मोहक सौंदर्य, सडपातळ बांधा म्हटलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या ग्लॅमरस अभिनेत्री. सुंदर दिसण्यासाठी चंदेरी दुनियेतील नट्या हवी ती मेहनत घ्यायला तयार असतात. पण सौंदर्याच्या बाबतीत एव्हरग्रीन रेखा यांचा हात कोणीच धरू शकत नाही.
देखणं रूप काय असतं हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. समोरच्या व्यक्तीला प्रेमातच पाडेल असं त्यांच सौंदर्य आहे. पण रेखा यांच्या करिअरची सुरुवात झाली आणि त्यांना त्यांच्या शरीरयष्टीवरून बरेच टोमणे ऐकावे लागले होते. तरी सुद्धा त्यांनी डेव्हलप होऊन रेखा यांनी वाढत्या वयात ही आपलं सौंदर्य आणि लोकप्रियता थोडी सुद्धा कमी होऊ दिलेली नाही. आजही त्यांचीच सगळी कडे चर्चा असते.
फक्त अनेकांना एकच प्रश्न पडलेला आहे की तिच्या सौंदर्य याचं रहस्य काय आहे ? हे जाणुन घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. तर आपण आज आपण जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध लोकप्रिय अश्या रेखा या अभिनेत्री बद्दल. जेष्ठ त्यांना म्हणूच शकत नाही. कारण त्यांच्याकडे बघून वाटतच नाही. सुंदर नाही म्हणून करियर च्या सुरुवात ला टोमणे मिळाल्यावर माणूस किती अस्वस्थ मध्ये असतो. जश्या रेखा या सुद्धा होत्या. तर अश्या परिस्थितीमध्ये रेखा यांनी हार न मानता स्वतःवर अधिक मेहनत घेतली.
आणि आजही त्यांचं सौंदर्य, त्यांचा उत्साह तरुण अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे. कारण बघा ना किती तरी लोकप्रिय चित्रपट दिले त्यांनी. वरून वयाची पन्नाशी काय साठी सुद्धा ओलांडली तरी अजून सुंदर तितक्याच आहेत. तर हेच सर्वांना जाणून घ्यायचं आहे.
म्हणजे बघा त्यांच्या पुढे सर्वात आधी टास्क होता वजनाचा तर त्यांनी वजन नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला आपल्या डाएटकडे लक्ष दिलं. कारण ते देणं खूप गरजेचं होतं. सुरुवातीला घरगुती, सात्विक आहाराचा आधार त्यांनी घेतला. कारण घरगुती सात्विक आहार आजही खूप महत्वपूर्ण आहे. फक्त वजन नियंत्रित करण्यासाठीच नव्हे तर आयुष्यभर स्लिम फिगर राहावी म्हणून त्यांनी हाच आहार सुरु ठेवला.
आणि इतरांनि ही ठेवावा अश्या त्या सांगतात नेहमी. आजही त्या कमी तेल आणि कमी मसाल्यांमधील खाद्यपदार्थांचेच सेवन करतात. म्हणूनच त्यांची त्वचा आज म्हातारी होऊन ही मुलायम सारखी स्क्रीन वर दिसते. आता मेकअप लावतात आणि म्हातार पण झाकतात का ? हे काहीच सांगता येत नाही.
कसं असतं फिट राहायचं असेल तर व्यायाम हा खूप गरजेचा असतो. आणि त्यासोबत योगा केला तर सोन्याहून पिवळे. म्हणजेच खूप उत्तम. तर रेखा हे नियम पाळून रोज करायच्या. म्हणून आज त्या एवढ्या फिट आणि स्लिम आहेत. रेखा योगबरोबरच प्रत्येक दिवशी कमीतकमी ३० मिनिटे मेडिटेशन करतात. योग आणि मेडिटेशन नियमित केलं तर तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल देखील जाणवतील.
आणि हे खरे आहे कारण साधने तून तुमचं आयुष्य स्थिर होतं. माणूस शांत होतो आणि शांतीत क्रांती करून यश संपादन करतो. तर आलं का आपल्या लक्ष्यात कसं असतं अभिनेत्री रेखाच्या सुंदरता चं गणित.
तर यात ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं कुठलंही समर्थन स्टार मराठी करत नाही. फक्त माहिती म्हणून आमचा आपल्याला अश्या गोष्टी पोहचवण्याचा प्रयत्न असतो. काळजी घ्या सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.