“तू खरंच एक परमात्मा आहेस” रेमो डिसूजाच्या पत्नीने मानले सलमान खानचे आभार

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडचा सुप्रसिद्ध ङान्स कोरिओग्राफर रेमो ङिसूजा याला मागील काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून ङिस्चार्ज मिळाला आहे. रेमो ला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला ताबडतोब कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आता तो व्यवस्थित ठीक होऊन आपल्या घरी परतला आहे. म्हणून रेमो च्या पत्नीने सोशल मीडियावर विशेषतः त्या सर्व लोकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ज्यांनी कठीण काळात त्यांना भरपूर साहाय्य केले.

लिजेलने रेमो सोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर शेयर केला. या मध्ये ती आपला पती रेमो याला मीठी मारताना दिसत आहे. त्याचसोबत लिजेलने म्हटले आहे की, “हे आतापर्यंतचे माझे सर्वांत किंमती गिफ्ट आहे. मी हा क्षण सदैव लक्षात ठेवेल. एक हफ्त्याच्या धावपळीनंतर मी तुझ्या मिठीत येत आहे. तुझ्यामते तर मी एक सुपरवुमन आहे.

See also  रणवीर सिंहला कं'डोमच्या जाहिरातीत पाहून त्याचे वडील खूपच भ'डकले होते, अशी होती त्यांची रिएक्शन...

मात्र सध्या मला एका हरवलेल्या मुलाप्रमाणे वाटत होते. मला फक्त एवढेच माहीत आहे की, मी फक्त त्यावरच विश्वास ठेवला होता. तू म्हणाला होता की मी एका फाईटरसारखा लगेच परत येईल.” या पोस्ट मध्ये लिजेल ङिसूजा यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले आहेत.

लिजेलने कोरिओग्राफर सलमान युसुफ खान याचे आभार व्यक्त करत म्हटले आहे की,”मला ठाऊक आहे की, रेमो आणि मी तुझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहोत. परंतु फक्त म्हणणे आणि दाखवणे यामध्ये फरक असतो आणि तू ते करून दाखवले. त्यासाठी मी तुझी लाख लाख आभारी आहे.

लिजेलने अभिनेता सलमान खान याचे सुद्धा आभार व्यक्त करत त्याला परमात्मा म्हटले आहे. तिने लिहिले की,”मी अगदी हृदयापासून सलमानचे आभार व्यक्त करते. जो माझ्यासाठी एक भावनिक आधार बनून राहिला. तू खरंच एक परमात्मा आहे. आमची मदत करण्यासाठी मी तुझी ऋणी आहे.”

See also  सलमान खानच्या बर्थडे पार्टीत डान्स केल्यामुळे अभिनेत्री जेनेलिया देशमुख झाली सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment