आर्यन खान कोणता धर्म मानतो हिंदू की मुस्लिम? स्वतः गौरी खानने केला खुलासा
बॉलीवुड इंडस्ट्रीचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी यांच्या विवाहाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरूख व गौरीचे नाव आज इंङस्टीमधील टॉप कपल्स मध्ये येते. जसे की आपल्याला माहितच आहे की शाहरुख खान हा मुस्लिम धर्मीय आहे तर गौरी ही हिंदू धर्मीय आहे. परंतु शाहरुख खान म्हणतो की, मी माझ्या मुलांना सर्वांत आधी आपण भारतीय आहोत, असे सांगतो.
किंग शाहरुख खान च्या घरी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. मग ती ईद असो वा दिवाळी… मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. असे सगळे असूनही शाहरूख व गौरी यांची कोणत्या धर्मावर जास्त श्रद्धा आहे, असे प्रश्न त्यांना नेहमीच विचारण्यात येतात. एकदा एका मुलाखतीमध्ये गौरी खानला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर देताना गौरी म्हणाली की,”आर्यन वर त्याचे वडील शाहरुख खान यांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे तो स्वतःला मुस्लिम समजतो.”
गौरी खानच्या मते आर्यन ने तो मुस्लिम असल्याचे कबूल केले आहे. आपण स्वतः हिंदू आणि शाहरूख मुस्लिम असल्याने गौरी देखील अगदी मनमोकळेपणाने बोलली. तिने म्हटले की,”मी हिंदू असले तरीही मी शाहरुख च्या धर्माचा मनापासून आदर करते. मात्र याचा अर्थ असा नाही की मी त्याचा धर्म स्वीकारावा. शाहरूख खान देखील या सर्व गोष्टींची काळजी घेतो.
शाहरूख खान च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तो लवकरच “पठाण” या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. तसेच सध्या त्याने पूर्णपणे ब्रेक घेतला आहे. आपला मुलगा 25 दिवसांनंतर जेलमधून बाहेर आल्यावर शाहरुखने काही दिवस फक्त आर्यन सोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.