रिंकू राजगुरूने ‘सैराट’ नंतर अनेक चित्रपटांना का दिला नकार? अखेर तिने स्वतः केला खुलासा…
‘सैराट’ या नावानेच लोकांना अक्षरशः वेड लावून टाकले आहे. 21 एप्रिल 2016 रोजी तल्लख बुद्धीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे नागराज मंजुळे यांचा “सैराट” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने पाहता- पाहता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लोकांना आपल्या तालावर नाचवलं. या चित्रपटातील प्रत्येक गाणी व ङायलॉग्ज हे सुपरङुपरहिट ठरले. त्याचसोबत या चित्रपटातील सर्व कलाकार मंडळींनी देखील चाहत्यांच्या मनावर आपली जबरदस्त छाप उमटवली.
सैराट मध्ये आर्ची, परशा, लंगङ्या आणि सल्ल्या यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. लहान वयातील या कलाकारांनी पहिल्यांदाच आपल्या अभिनयाची छाप रसिकांच्या हृदयावर उत्कृष्टपणे उमटवली. यामधील आर्चीची भूमिका तर कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखीच आहे. त्यामुळेच तर रिंकू राजगुरू हिला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ओळखतात.
असे असूनही “सैराट” या चित्रपटानंतर रिंकूने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. परंतु असे करण्यामागे सुद्धा तिचे एक कारण होते. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने हे कारण सविस्तरपणे सांगितले आहे. ती म्हणते की, सैराट या चित्रपटानंतर मला अनेक नवीन चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.
अनेकांना सैराट सारखेच सुपरङुपरहिट चित्रपट करायचे होते. कारण हा गा’जला होता. तसेच सैराट मध्ये मी जी भूमिका केली होती, अगदी त्याच प्रकारच्या भूमिका येथे सुद्धा करायच्या होत्या. परंतु मला तशी भूमिका पुन्हा मुळीच करायची नाही. कारण मला काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे सैराट नंतर मी कित्येक चित्रपटांना स्पष्टपणे नकार दिला, असे तिने सांगितले.
तसेच त्यानंतर सैराट हा चित्रपट इतर अन्य भाषांमध्ये करण्यासाठी रिंकूला विचारण्यात आले. तेव्हा देखील ती म्हणाली की, मी याविषयी काहीच बोलू इच्छित नाही. लोकांना जे करायचे असेल, ते सर्व ते करू शकतात. कारण ते त्यांचे काम आहे. मराठी चित्रपटांचे रिमेक हिंदीमध्ये होत नाहीत. उलट हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीत केले जातात.
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही लवकरच “200 ह’ल्ला हो” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दलित महिलांवर झालेल्या अ’त्या’चा’रावर बोलले जाणार आहे. हा चित्रपट सत्य घ’ट’नेवर आधारित आहे. तर या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत अमोल पालेकर व बरूण सोबती हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे तर हा चित्रपट 20 ऑगस्ट रोजी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचे फॅन्स आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.