रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्यात झालंय भांडण? कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

रोहित शेट्टी यांनी रणवीर सिंग सोबत ‘सर्कस’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाला गुलजारच्या ‘अंगूर’ चित्रपटाचा चा रिमेक म्हणून वर्णन केले जात आहे. परंतु ‘अंगूर’ हा चित्रपट ‘दो दूनी चार’ चित्रपटाचा चा रिमेक होता. ‘सर्कस’ या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे तसेच विनोदी क्षेत्रातील खूप कलाकार असणार आहेत.

रोहित शेट्टी बऱ्याच काळापासून रणवीर सिंगसोबत चित्रपटाची योजना आखत आहेत हे सर्वाना माहित होते परंतु बॉलिवूड मधील काही लोकांचा असा विश्वास होता की रोहित शेट्टी त्याचा पुढचा चित्रपट त्याच्या खास आणि जीवलग मित्र अजय देवगण याच्या सोबत बनवेल. पण तसे झाले नाही.

यामुळे बॉलिवूडमध्ये अफवांचे वादळ निर्माण झाले की रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या मैत्रीत वाद निर्माण झाला आहे. रोहित आता अजयपेक्षा इतर कलाकारां सोबत अधिक काम करत आहे.

See also  बबिताजींसोबत डेटवर कधीच जाणार नाही जेठालाल, कारण ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क...

रोहित शेट्टी ने त्याचा मागचा चित्रपट ‘सिंबा’ रणवीर सिंग सोबत केला होता, जो खूप सुपरहिट झाला. तर रोहित शेट्टी ने अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी ‘ हा चित्रपट बनवला आहे जो रिलीज साठी तयार आहे. त्या आधी 2017 मध्ये रोहित शेट्टी ने अजय देवगन बरोबर ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट केला होता.

२०१३ च्या पूर्वी रोहित शेट्टी ने त्याचा प्रत्येक चित्रपट त्याचा खास मित्र अजय देवगण सोबत केला होता. परंतु रोहित शेट्टी ने पहिल्यांदा शाहरुखबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट बनवला. अशा अफवा आहेत कि शाहरुख खान आणि अजय देवगण चे नाते फारसे चांगले नाही.

रोहित शेट्टी ने 2003 मध्ये जामीन , 2006 मध्ये गोलमाल , 2008 मध्ये संडे ,2009 मध्ये गोलमाल रिटर्न्स, 2009 मध्ये ऑल द बेस्ट, २०१० मध्ये गोलमाल 3 , 2011मध्ये सिंघम, 2012 मध्ये बोल बच्चन , 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स आणि 2017 मध्ये गोलमाल अगेन हे सारे चित्रपट अजय देवगण बरोबर तयार केले, त्यापैकी बरेच चित्रपट सुपर हिट झाले.

See also  स्वतःचा चित्रपट पाहायला गेली हि अभिनेत्री बुरखा घालून, त्यानंतर जे झाले ते...

रोहित आणि अजय यांची जोडी या चित्रपटांच्या यशामागचे कारण मानले जाते. पण गेल्या काही वर्षांत रोहित शेट्टी ने इतर कलाकारांसोबत काम करण्यास सुरवात केली आहे. जसे कि ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंग सोबत तसेच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत काम केले आहे.

तसेच शाहरुख खानबरोबर रोहित ने २००३ मध्ये चेन्नई एक्सप्रे आणि २०१५ मध्ये दिलवाले या चित्रपटांची निर्मिती केली. आणि रोहित आता पुन्हा रणवीर सिंग बरोबर ‘सर्कस’ हा चित्रपट बनवणार आहे.

तसेच रोहितशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की रोहित दुसर्‍या कलाकारांसोबत काम करत असला तरीहि याचा अर्थ असा नाही कि अजय आणि रोहित शेट्टी त्याच्यात मतभे’द आहेत. वास्तविकता अशी आहे कि अजय देवगण ‘सिंबा’ आणि ‘सर्कस’ या सारख्या चित्रपटात बसत नव्हता. त्याचबरोबर प्रेक्षकांना अजय आणि रोहित च्या जोडी चा कंटाळा येऊ नये म्हणून रोहित शेट्टी अजय देवगण बरोबर चित्रपट न बनवता दुसऱ्या बॉलिवूड कलाकारांसोबत चित्रपट बनवित आहे.

See also  'प्रेमकैदी' चित्रपटातील करिष्मा कपूरचा हिरो आता दिसतोय असा कि ओळखणे हि झाले कठीण...

तसेच अशी हि माहित मिळत आहे कि रोहित शेट्टी सध्या ‘गोलमाल 5’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टवरही काम करत आहे. ‘सर्कस’ या चित्रपटा नंतर तो गोलमाल ५ या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार असून या चित्रपट मध्ये अजय देवगन मुख्य भूमिकेत असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment