‘अशा लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नाही’, आमदार रोहित पवारांचे नितेश राणे आणि सदाभाऊ खोतांच्या टीकेला प्रत्युत्तर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पुणे: राज्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांचे पूरग्रस्त भागात दौरे सुरू आहेत. त्यामुळे या भागाशी काही संबंध नसलेल्या नेत्यांनी या भागात पाहणी दौरा करू नये असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं.  मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांच्या या दौर्‍यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप नेते नितेश राणे यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली.

यावर रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले असून, फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून मोकळं व्हायचं परंतु प्रत्यक्ष कुठेही जायचं नाही. अशा लोकांना महत्व देण्याचे काही कारण नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संकटकाळात पक्ष वगैरे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या भागाचा दौरा करत आहेत. माझीही त्यांच्यासोबत भेट झाली होती, असं रोहित पवार म्हणाले. सर्व पंचनामे झाल्यावर 10 ते 12 दिवसात पुरग्रस्तांना सरकारकडून मदत जाहीर होणार असल्याचं रोहित पवार यांनी माहिती दिली.

See also  जगातील 5 सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू... ज्यांच्या पुढे मोठ मोठ्या अभिनेत्री ही आहेत फेल..

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

Sada

शरद पवार यांनी पुरग्रस्त भागांचा दौरा टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. त्यांनी कोकणात जाऊनही परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांच्या दौर्‍यावर प्रश्न उपस्थित केला. ट्विटरच्या माध्यमातून सदाभाऊ खोत म्हणाले की, राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं… आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.’

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment