कधी काळी ३० रुपये पगाराने काम करायचा हा बॉलीवूड फिल्म डायरेक्टर, आज आहे कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

एके काळ असा होता की ही व्यक्ती ३० रुपये रोजाची नोकरी करत आयुष्य जगत होती. पण आज तीच व्यक्ती आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालक. कोण आहे ती व्यक्ती. चला जाणून घेऊ.

Advertisement

बॉलीवूडला सिम्बा, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, गोलमाल अगेन, सिंघम, सिंघम 2, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे सुपर हिट चित्रपट देणारी ही व्यक्ती म्हणजे फिल्म डायरेक्टर रोहित शेट्टी. आज बॉलिवूड मधील टॉपच्या दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टीचे नाव आहे .

रोहित शेट्टीचे वडील एम. बी. शेट्टी यांनी अनेक जुन्या हिंदी चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत. जरी रोहितचे वडील चित्रपटांमध्ये काम करत होते, फिल्म इंडस्ट्रीत त्यांचे चांगले नाव होते तरी त्यांच्या मृत्युनंतर रोहितला मात्र खूप संघर्ष करावा लागला. वडिलांच्या निधनानंतर खूपच कमी वयात आपले घर चालवण्याची जबाबदारी रोहितवर आली होती.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील चंपक चाचाची भूमिका करणारा अभिनेत्याचं वय ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
Advertisement

अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे रोहितला त्याचे शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. याविषयी बोलताना एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, माझ्या घरच्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला खूपच कमी वयात शिक्षण सोडावे लागले.

अगदी कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी, अभ्यासाची पुस्तकं आणि कॉलेज साठी कपडे विकत घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मग मी कॉलेजमध्ये जाण्यऐवजी कुठेतरी काम करून पैसे कमावण्याकडे जास्त लक्ष दिले.

Advertisement

माझे वडील या फिल्म इंडस्ट्रीचा भाग असल्याने मला सिनेमाच्या या मायानगरी विषयी नक्कीच आकर्षण होते. मी सतराव्या वर्षीच असिस्टंट स्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझी पहिली कमाई होती फक्त ३०/- रुपये.

See also  अभिनेता अक्षय कुमारची बहीण आहे त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत, तिची संपत्ती पाहून विश्वास बसणार नाही...

तो चित्रपट होता फूल और काटे. माझ्या या खडतर आयुष्यात मी घर चालविण्यासाठी मी अशा काही गोष्टी केल्यात की तुम्हाला विश्वासही बसणार नाही. १९९५ साली एक चित्रपट आला होता,” हकीकत ” या चित्रपटाची नायिका होती अभिनेत्री तब्बू. या फिल्मच्या वेळी तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्याचे काम करत होतो.

Advertisement

नंतर रोहित शेट्टीने “जमीन” या फिल्म च्या माध्यमातून त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पण दुर्दैवाने त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. त्या वेळी रोहितला त्याच्या भविष्याचे आणि करियर चे चांगलेच टेन्शन आले होते.

एके काळी त्याच्यासोबत काम करायला कोणी तयारच होत नव्हते. पण अजय देवगण या त्याच्या जिवलग मित्राने मात्र त्याची साथ सोडली नाही. त्याने मग गोलमाल बनवला आणि याच गोलमाल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही.

See also  "बिग बॉस फेम" ही अभिनेत्री घटस्फो'टानंतर पुन्हा पडलीय या व्यक्तीच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तिचा नवा बॉयफ्रेंड...
Advertisement

आज रोहित शेट्टी कडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. तो अनेक नवीन प्रोजेक्ट्स सुदधा करतो आहे. पण आजही तो ते जुने दिवस आणि जुन्या मित्रांना विसरलेला नाहीय.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close