कधी काळी या प्रसिद्ध अभिनेत्रीची साडी इस्त्री करायचा हा दिग्दर्शक, आज एक चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी घेतो 15 कोटी रुपये!
.
रोहित शेट्टी प्रसिद्ध स्टंटमॅन आणि खलनायक एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे. वडिलांच्या नि-ध-नानंतर रोहितला बालपणात खूप संघर्ष करावा लागला. त्याला महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने अभ्यासाचा त्याग केला. कारण त्यांच्याकडे पैसे खूपच कमी होते.
रोहित शेट्टीची पहिली कमाई 35 रुपये होती: संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना रोहित एका मुलाखतीत म्हणाला- जेव्हा मी काम सुरू केले तेव्हा मला घर चालविण्यासाठी पैसे मिळवायचे होते.
मी कॉलेज सोडले कारण मला पुस्तके आणि कपड्यांसाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न मनात होता. मला हे देखील मला माहित नव्हते कि मी कोणाला पैसे मागावे. म्हणून मी काम करून पैसे मिळवू लागलो. माझी पहिली पगार 35 रुपये होती.
रोहित पुढे म्हणतो – माझ्या मोठ्या बहिणी म्हणतात की मी एक भाग्यवान मुलगा आहे. असे जीवन मिळणे दुर्मीळच आहे. मी महान आहे असे म्हणत नाही. माझे चित्रपट चित्रपट हिट होतात म्हणून फक्त प्रेक्षक माझ्यावर प्रेम करीत नाहीत. लोक मला का पसंद करतात मला हे अद्याप समजलेले नाही. हे जादू सारखे आहे. मला चाहते आणि माध्यमांकडून खूप प्रेम मिळालं आहे.
आता रोहित चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी 15 कोटी रुपये फीस घेतो आणि त्याची गणना देशातील सर्वाधिक हिट दिग्दर्शकांमध्ये केली जाते. पडद्यावर बॉलिवूड अॅक्शन आणि कॉमेडीमध्ये माहिर असलेल्या रोहितने एका मुलाखतीत सांगितले की, या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला खूप कठोर परिश्रम करावे लागले होते. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूच्या साड्या इस्त्री केल्या होत्या असे त्याने सांगितले. तो एकेकाळी काजोलचा स्पॉटबॉय देखील बनला होता.
रोहितने ‘फूल और कांते’ या चित्रपटाद्वारे वयाच्या 17 व्या वर्षी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट ‘जमीन’ २००३ साली दिग्दर्शित केला, पण हा चित्रपट फारशी कमल नाही दाखवू शकला. यानंतर, त्याच्याबरोबर कोणीही काम करण्यास तयार नव्हता.
पण त्याने हार मानली नाही. अशा परिस्थितीत अजय देवगणने त्याला साथ दिली आणि रोहितने आज बनवलेला प्रयेक चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सहज पोहचतो. रोहितने 2006 मध्ये ‘गोलमालः फन अनलिमिटेड’ हा चित्रपट बनविला होता. आतापर्यंत ‘गोलमाल’ सीरिजचे 4 चित्रपट बनले असून चौघेही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.
रोहित शेट्टी यांनी अजय देवगन यांच्या सोबत 10 चित्रपट केले आहेत. ‘फूल और कांटे‘, ज़मीन, ‘गोलमाल‘, ‘संडे‘, ‘गोलमाल रिटर्न‘, ‘ऑल द बेस्टः फन बिगिन्स‘, ‘गोलमाल 3′, ‘सिंघम‘, ‘बोलबच्चन‘, ‘सिंघम रिटर्न‘, ‘गोलमाल अगेन‘ सारखे चित्रपट केले आहेत. रोहितच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटात अजय देवगन दिसणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.