ही मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच बनणार ‘आई’, पाहिलेत का तुम्ही तिचे बेबी शॉवरचे फोटोज्
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्मिता तांबे हिने मागील महिन्यातच एका गोंडस मूलीला जन्म दिला आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री खुशबू तावडे साळवी हिने सुद्धा “कुणी तरी येणार येणार गं…” असे म्हणत आपल्या बेबी शॉवर चे अफलातुन फोटोज् शेयर केले होते. आई बनणे, हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. त्यामुळे फक्त अभिनेत्री नव्हे तर प्रत्येक सर्वसामान्य महिला सुद्धा या मनमोहक क्षणाचा पुरेपुर आनंद घेतात.
यामध्ये फरक इतकाच आहे की, प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेयर करतात. तर सर्वसामान्य महिला आपल्या फॅमिलीसोबत हा आनंद शेयर करतात. तुम्हांला ठाऊक आहे का, आता आणखी एक मराठमोळी जोडी आईबाबा बनणार आहेत.
हो, अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही. अर्थातच तुम्ही सुद्धा त्या जोङी विषयी ऐकण्यासाठी उत्सुक आहातच. अभिनेत्री रुची सवर्ण हिने लवकरच आपण आई होणार असल्याची गोङ बातमी चाहत्यांसोबत शेयर केली. मराठी अभिनेता अंकित मोहन हा अभिनेत्री रुची सवर्ण हिचा पती आहे. या मराठमोळया जोडीने “फत्तेशिकस्त” या चित्रपटातून अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर जादू केली. तर अंकित मोहन याने ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘फर्जंङ’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांतून आणि चित्रपटांतून आपला अभिनय साकारला आहे.
त्याचप्रमाणे अंकित मोहन ची पत्नी रुची सवर्ण ही देखील एक मराठी व हिंदी मालिका अभिनेत्री आहे. “सख्या रे” या मालिकेतून तिने प्रियवंदाची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली होती. प्यार का बंधन, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, घर आजा परदेसी या मालिकांत सुद्धा ती झळकली होती. 2015 साली रुची- अंकित मोहन हे दोघेही विवाहबद्ध झाले होते. मालिकांमध्ये एकत्र काम करत असतानाच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर या दोघांनीही आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनेता अंकित मोहन याची जबरदस्त शरीरयष्टी असल्याने त्याला मराठी इंङस्टीमध्ये बाहुबली असे म्हटले जाते. या गोङ दाम्पत्याचे एकमेकांसोबत व्यायाम करतानाचे बरेचसे व्हिडिओज आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतील. अंकित मोहन आणि रुची सवर्ण यांनी गणपती उत्सवाच्या दरम्यान बेबी शॉवर चे फोटोज् शेयर करून ही गोङ बातमी आपल्या फॅन्सना दिली होती.
आम्ही दोघेही आमच्या आयुष्यातील अत्यंत मनमोहक क्षण अनुभवत आहोत, असे रुची सवर्ण हिने सांगितले. तर नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेयर करत आपला पती अंकित मोहन याचे आभार मानले आहेत. स्टार मराठीतर्फे अभिनेता अंकित मोहन आणि रुची सवर्ण या गोड दाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.