“आई कुठे काय करते” मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यामध्ये झाले ब्रेकअप?
इश्क, प्यार, मोहोब्बत हे सगळं जणूकाही स्वर्गासमान आहे. परंतु जेव्हा ब्रेकअप चा बॉम्ब रिलेशनशिपमध्ये फुटतो. तेव्हा मात्र व्यक्तीला आयुष्य नकोसे वाटू लागते. मग सतत हसतखेळत असणारा चेहरा अगदी हिरमुसतो. असेच काहीसे या मराठमोळया अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडले आहे.
बिग बॉस मराठीमुळे झळकलेले एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री रुपाली भोसले आणि अंकित मगरे हे दोघेही मागील एक वर्षापासून एकमेकांना ङेट करत होते. एकदा कामाच्या निमित्ताने हे दोघेही कॉफी शॉपमध्ये पहिल्यांदाच भेटले.
पहिल्यावहिल्या भेटीतच रुपालीला अंकित चा साधेपणा, शांत स्वभाव आणि त्याचे निरागस हास्य रुपालीच्या मनाला भावले. तर अंकित ला सुद्धा रुपाली पहिल्याच भेटीत आवडली. अंकित विषयी सांगताना रुपाली म्हणाली की,”अंकितचा स्वभाव खूप सकारात्मक आहे. तो त्याच्या व्यस्त कामातून माझ्यासाठी नेहमीच वेळ काढतो. तसेच तो माझ्या कामाचा पण खूप आदर करतो. या आमच्या नात्याविषयी खास गोष्टी आहेत.”
तर अंकित ने म्हटले की,”या नात्यात रुपाली सर्वांत जास्त प्रेम करते. कारण रुपाली ही साथ देणारी, काळजी घेणारी व्यक्ती आहे. एवढंच नव्हे तर ती तिच्या प्रत्येक कामात परफेक्ट असते”. अभिनेत्री रुपाली ने अंकितला मॉलमध्ये अत्यंत रोमॅन्टिक स्टाईल मध्ये प्रपोज केले. याविषयी अंकित ने सांगितले की,”पुण्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये असताना रुपाली काही क्षणासाठी गायब झाली होती. त्यानंतर जेव्हा ती माझ्यासमोर आली. तेव्हा तिच्या हातात एक गुलाबाचे फूल होते. मॉलमध्ये गुडघ्यावर बसून तिने मला प्रपोज केले. ते मोहक क्षण मला नेहमीच स्मरणात राहतील. कारण रुपाली सारखी मूलगी मला भेटणं, हे मी माझे भाग्य समजतो.”
परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, मागील काही दिवसांपासून रुपाली आणि अंकितचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. रुपालीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत “टाइम टू ब्रेकअप विथ ऑल सेल्फिश” असे कॅप्शन सुद्धा दिले होते. रुपालीची ही पोस्ट सगळीकडे वायरल होत असून बहुतेकजण तिला तुझं ब्रेकअप झाले आहे का? असा प्रश्न विचारत आहेत.
सोशल मीडियावर एकमेकांविषयी सतत बोलणारे रुपाली आणि अंकित आता एकमेकांविषयी काहीच बोलत नसल्याने त्यांच्या फॅन्स मध्ये याची चर्चा होत आहे. त्यामुळे रुपाली आणि अंकित यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.