आनंदाची बातमी! या देशाने लाँच केली कोरोनाची पहिली लस, जाणून घ्या काय असेल किंमत आणि भारतात कधी येणार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज मंगळवारी जाहीर केले की रशियाने कोरोना विषाणूची पहिली लस बनविली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी असा दावा केला की ही जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरस लस आहे, जी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूर केली आहे. इतकेच नाही तर व्लादिमीर पुतीन म्हणाले की, त्यांच्या मुलीनेही ही लस घेतली आहे.

वृत्तसंस्था AFP च्या माहितीनुसार, ही लस मॉस्कोच्या गामेल्या संस्थानने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी असल्याचे म्हटले आहे. त्याद्वारे व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की लवकरच या लसीचे उत्पादन रशियामध्ये सुरू केले जाईल आणि मोठ्या प्रमाणात लसीचे डोस तयार केले जातील.

रशियाचे अध्यक्ष पुतीन म्हणाले की, त्यांच्या मुलीला ही लस दिली आहे, अगोदर तिचा ताप 38 अंश सेल्सियस होता, ही लस घेतल्यानंतर ताप नियंत्रणात येऊ लागला. या व्यतिरिक्त त्यांनी दावा केला की काही लोकांमध्ये लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसले नाही.

See also  "साधेपणा, सोज्वळपणा असलेल्या या महान व्यक्तीला सलाम" मराठी अभिनेत्याने केली पोस्ट शेयर

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जगात कोरोना विषाणूची लस बनवण्यासाठी सध्या चाचण्या सुरू आहेत, WHO च्या मते, 100 हून अधिक लस तयार करण्याचे काम चालू आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, चीन, रशिया, भारत यासारख्या देशांचा समावेश आहे. भारतात कोरोना विषाणूची लस सध्या मानवी चाचणी अवस्थेत आहे, ही लस बनवण्याचा हा दुसरा टप्पा आहे.

आता जर रशियाने केलेली घोषणा योग्य असल्याचे सिद्ध झाली आणि WHO ने ही लस मंजूर केली तर ती जगासाठी एक मोठा दिलासा ठरू शकते. जर आपण रशियामधील कोरोना विषाणूच्या स्थितीबद्दल बोललो तर येथे जवळपास नऊ लाख कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली आहे.

रशियामध्ये जवळपास पंधरा हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे, सर्वात जास्त कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आलेल्या देशांमध्ये रशियाचा समावेश आहे. रशियामधील पंतप्रधानांव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील काही इतर सदस्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

See also  घ्यायला गेली 1700 रुपयाची दारू अन घालवून बसली लाखो रुपये, महिलेची ऑनलाइन फसवणूक

ही लस लाँच तर झाली आहे पण हो जो पर्यंत याला मंजुरी देत नाही तो पर्यंत ती वापरात येऊ शकत नाही. भारतामधे ही लस लवकरच येणाचे संकेत आहेत, पण या लसीची किंमत काय असेल हे आणखी कळू शकलेलं नाही.

दुसरीकडे जर आपण जगाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत कोरोना विषाणूची दोन कोटीहून अधिक लोकांना लागण झाली आहे, तर सात लाखाहून अधिक लोक म-र-ण पावले आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशिया हे देश जगातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment