वयाच्या ४ थ्या वर्षापासून चित्रपटात काम करणारा हा मुलगा आहे आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“अखियोंके झरोंकोसे मैने देखा तुझें सांवरे, तुम दूर नजर आये, बडी दूर नजर आये.” हे श्रवणीय गाणे ऐकल्यावर सचिन पिळगावकर यांचेच नाव हमखास आठवते.

अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शरद पिळगांवकर हे मुंबई फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. ज्यावेळी त्यांचा फ्लूमुळे मृत्यू झाला, त्यावेळी सचिन खूप तरुण होता.

CqDfW7GXEAAXyET

सचिनने वयाच्या वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी “हा माझा मार्ग एकला” या मराठी चित्रपटातून बाल कलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटासाठी त्याने “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” पटकावला. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या ‘मंझली दीदी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट जगतात पाऊल ठेवले. यासह ते ज्वेल थिफ, चंदा और बिजली, ब्रह्मचारी आणि मेला अशा अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून चमकले.

See also  "ठिपक्यांची रांगोळी" मालिकेतील हा अभिनेता पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल...

सचिनला ‘गीत गाता चल’ या चित्रपटात अभिनेता म्हणून संधी मिळाली. त्यात सारिका त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यावेळी त्यांनी बालिका वधू, कॉलेज गर्ल, आँखियो के झरोखों से आणि नदिया के पार या सारख्या बऱ्याच यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले.

63845885

अभिनेता म्हणून त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी या प्रत्येक भाषेत काम केले आहे आणि यश संपादन केले आहे. त्यांनी बर्‍याच यशस्वी सीरियलची निर्मिती व दिग्दर्शनही केले आहे. त्याने तू तू में मैं, रिन 1 2 3, हद कर दी सारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले आहे.

त्यांनी माय बाप, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी, आमच्या सारखे आम्हीच आणि नवरा माझा नवसाचा सारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यात प्रमुख भूमिकाही केलेल्या आहेत. त्यांनी सुभाष घई यांच्या प्रेम दीवाने, ऐसी भी क्या जलदी है आणि राजश्री प्रॉडक्शनचा जाना पहचाना या चित्रपटांचेही दिग्दर्शन केलेले आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत पडलीय या अभिनेत्याच्या प्रेमात? अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सचिनने शोले, त्रिशूल, सत्ते पे सत्ता, नदिया के पार, जुदाई, डाक घर , माँ बेटी ,घर एक मंदिर या सारख्या असंख्य चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला जाना पहचाना हा चित्रपट अखियोंके झरोंकोसे या सचिन अभिनीत सिनेमाचा सिक्वल आहे.

सचिनने अँकर म्हणून ‘चलती का नाम अंताक्षरी’ होस्ट केला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक मराठी कार्यक्रम समारंभांचे आयोजन केले आहे. त्यांची पत्नी सुप्रिया यांच्यासमवेत, २००६ मध्ये “स्टार प्लस” वर प्रसारित झालेल्या “नच बलिये” या रिऍलिटी शोचे ते विजेतेही होते.

सचिनने १९८५ मध्ये अभिनेत्री सुप्रिया सबनीसबरोबर विवाह केला . “नवरी मिळे नवऱ्याला ” या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची भेट झाली. ज्याचे दिग्दर्शन सचिन करीत होते. त्यांना एक मुलगी श्रिया पिळगावकर आहे.

See also  अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यतील काही आठवणी !

आज सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस. सर्व स्टार मराठीच्या वतीने त्यांना वाढदिवसा साठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment