सचिन पायलट यांची प्रेम कहानी तुम्हाला माहित आहे का? त्यांची पत्नी आहे या बड्या नेत्याची मुलगी…

.

सध्याचं देशाचं राजकारण खुप तापलेलं दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्र मध्ये एकमेकांनवर सत्ताधारी आणि विरोधी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत; तर दुसरीकडे राजस्थान मध्ये राजकीय वातावरण ऐन कोरोनाच्या काळात अस्थिर होत आहे. अश्यात सध्या तिथे सचिन पायलट यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

खुप कमी वयात खासदार होण्याचा मान त्यांच्याकडे आहे. ते काँग्रेसचे खासदार आहेत. पण सध्या ते भाजपच्या संपर्कात असुन राजस्थान मधील अशोक गेहतोल सरकारला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

सचिन पायलट यांचा दावा आहे की, माझ्याकडे तब्बल तीस आमदार आहेत. हे सगळे घेऊन भाजपात जाण्याचा विचार त्यांचा चालु असल्याचं निदर्शनास येत आहे. असं जर झालं तर काँग्रेस साठी हा खुप मोठा झटका असेल. बंडखोरी ही सचिन पायलट यांच्यासाठी काही नवीन नाहीये. राजकीय बंडखोरी तर ते करू शकतात; पण याआधी त्यांनी प्रेमात मोठी बंडखोरी केलेली आहे.

सचिन पायलट एमबीए चं शिक्षण घ्यायला लंडन ला गेले होते. तिथं शिकत असताना जम्मू काश्मीर चे नेते फारूक अब्दुला यांची मुलगी सारा अब्दुला ही तिथेच शिकायला होती. तिथे त्यांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. मैत्री झाली. पण मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे मात्र कळलं नाही.

पुढे दोघेही शिकुन भारतात आले. इथुन पुढं खरा संघर्ष सुरू झाला. सचिन पायलट आणि सारा ला एकमेकांन पासुन कर मेना. सचिन ने घरी आईला सांगितलं. घरच्यांनी हे नातं स्वीकारले नाही. तिकडे जेव्हा फारुख यांना माहीत झालं तेव्हा तर हे कधीच होऊ शकत नाही असं मुलीला बजावलं. त्यांची कथा फिल्मी मार्गाने चालली होती.

शेवटी दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन हिंदू मुसलमान हया धर्माना सोडुन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झालं. पण फारुख यांनी मुलीशी नातं तोडलं. इकडं सचिन पायलट च्या घरच्यांनी मात्र हळूहळू समजुन घेतलं. लग्नानंतर सचिन ने साराला कधीच कमीपणाची उणीव भासू दिली नाही.

त्यांना जेव्हा मुलं झाली तेव्हा फारुख यांनी नातं स्वीकारले. त्यांना या सगळ्यामुळे खुप राजीकिय परिणाम सोसावे लागले. पण शेवटी दोन्ही कुटुंब धर्म विसरुन एकत्र आले. आज जेव्हा सचिन पायलट बंड करायला पेटून उठले तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment