करोडोंची कमाई करणारा हा फुटबॉल पट्टू वापतो स्क्रीन तु’ट’ले’ला फोन, कारण ऐकून तुम्हाला देखील गर्व वाटेल…

इंग्लंडचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब लीवरपूलचा स्टार विंगर सॅडिओ माने यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत होती. ही चित्रे त्याच्या तुटलेल्या फोनची आहेत. लोक आश्चर्यचकित झाले आहेत की कोट्यवधींची कमाई करणारे फुटबॉलपटू शाही जीवन जगतात, लक्झरी कार आणि महागड्या वस्तूंचा त्यांना खूप शौक असतो, तर आपल्या फक्त क्लबमधून वर्षाला सुमारे 73 कोटी कमावणारा सादियो स्क्रीन तु’ट’ले’ला मोबाइल का वापरतोय…

यावर चाहत्यांना हे जाणून घ्यायचे होते की तो हा जुना फोन का बदलत नाही? आणि काहींनी तर त्याची खिल्लीही उडविली की, जर तो खरेदी करू शकत नसेल तर किमान स्क्रीनगार्ड तरी नवीन लावून घ्यावे. आता सादिओने त्यास प्रत्युत्तर दिले आहे. त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला देखील गर्व वाटेल. खरं तर, तो फोनपेक्षा आपल्या देशातील गरीबांकडे अधिक लक्ष देतो आणि त्यांना मदत करतो.

तु’ट’ले’ल्या फोनबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले की, “मी मोबाइल नक्की दुरुस्त करील.” जेव्हा त्याला असेल विचारले गेले कि तुम्ही नवीन मोबाईल का घेत नाहीत तेव्हा त्याने उत्तर दिले की, ‘मी असे हजारो खरेदी करू शकतो. मला 10 फेरारीस, 2 जेट प्लेन आणि 20 डायमंड घड्याळे या सगळ्यांची काय आवश्यकता आहे… मला हे सर्व का पाहिजे? मी खूप गरिबी पहिली आहे, गरिबीमुळे मी शाळेत शिकण्यासाठी जाऊ शकलो नाही. यामुळेच मी माझ्या देशात शाळा बनविल्या आहेत जेणेकरुन तेथिल मुले अभ्यास करू शकतील, फुटबॉल स्टेडियम देखील बनविले आहेत.’

आपले संघर्षाचे दिवस आठवताना तो म्हणाला, ‘माझ्याकडे खेळायला शूज नव्हते, चांगले कपडे नव्हते, खाण्यासाठी अन्न नव्हते. आज माझ्याकडे सर्व काही असल्यास, मी त्याचा दिखावा का करू? मला हे माझ्या लोकांशी वाटून घ्यायचे आहे.’ आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सेनेगलच्या 27 वर्षीय सॅडिओ माने याला नुकतेच आफ्रिकेचा 2019 वर्षाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून निवडले गेले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment