तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीत येतेय श्री साईबाबांवर आधारित मालिका, या वाहिनीवर प्रसारित होणार मालिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत साईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. “श्रद्धा आणि सबुरी” साई बाबांनी दिलेला मंत्र सांगतो की, कुठलेही काम करतांना त्या कामावर आपली श्रद्धा हवी व कुठलेही काम तडीस नेण्यासाठी व्यक्तीच्या अंगी नेहमी सबुरी म्हणजेच धीर असायला हवा.

म्हणून “श्रद्धा आणि सबुरी” ने काम केल्यास यश नक्की प्राप्त होते. तेव्हा “श्रद्धा आणि सबुरी” या मंत्राच्या माध्यमातून साईबाबांनी मोठा संदेश दिला आहे. ‘जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी…’ या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनायाची खऱ्या जीवनातील प्रेम कहाणी आहे खूपच रंजक, ऐकून थक्क व्हाल!

तब्बल २० वर्षांनंतर मराठी भाषेत साईबाबांवर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘साई बाबा – श्रद्धा आणि सबुरी’ असं या मालिकेचं नाव आहे. या निमित्तानं जवळपास २० वर्षांनी टेलिव्हिजनवर साईबाबांची मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १५ मार्च सोमवारपासून दररोज रात्री ८:०० वाजता फक्त मराठी या वाहिनीवर ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

तरी आजवर कधीही प्रकाशात न आलेले साईबाबांचे काही पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मालिकेत इ. स. १८५६ ते १५ ऑक्टोबर, १९१८ हा कालावधी दाखवण्यात येणार आहे. या मालिकेची निर्मिती व कलादिग्दर्शन प्रसिद्ध कलादिग्दर्शक अजित दांडेकरांनी केले असून त्यांनी १८५६ ते १९१८ चा काळ उभा करीत हुबेहूब प्रतिशिर्डी स्थापन केली आहे.

साईबाबा शिर्डीत आले तेव्हा त्यांनी आपली जात कुणालाही सांगितली नाही, साई बाबांना सर्व लोक एक समान होते, साईबाबा जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण जगाला दिली. म्हणून सबका मालिक एक हे वाक्य बाबांच्या नेहमी मुखी असे. साई बाबा हे कुठल्या धर्माचे होते याचे गु’ढ अजूनही उकललेले नाही.

See also  मुलगी झाली हो! प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र झाली आई...

साईबाबा मानवता हाच एक धर्म मानत असे, म्हणून साईबाबांना सर्वच धर्माचे लोक मानतात. देशभरातून विशेषतः गुरुवारी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण शिर्डी मध्ये गर्दी करतात. साईबाबा विजयाद्श्मीच्या दिवशी समाधीस्थ झाल्याने या दिवशी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक बाबांच्या दर्शनासाठी जमा होतात.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्या पासून साधारण ६ कि.मी अंतरावर व अहमदनगर शहरापासून ८३ किमी अंतरावर संत श्री साईबाबांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले शिर्डी हे गाव आहे. हिंदी भाषेत साई या शब्दाचा साधू किंवा संत असा अर्थ होतो. म्हणून श्री साईबाबांना साई हे नाव दिले असावे. अहमदनगर मनमाड या राज्य महामार्ग क्रमांक -१० वर वसलेले शिडी हे गाव साईबाबा यांचे घर म्हणून सुद्धा प्रख्यात आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन, इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती...

701309 h

साईबाबांच्या पश्चात येथे भव्य साई मंदिर उभारले आणि अल्पावधीत हे मंदिर प्रसिद्धी पावले. शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थान हे सर्वात श्रीमंत संस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते. शिर्डी या गावी देशभरातून भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात म्हणून भक्तांच्या सेवेसाठी येथे साईनगर शिर्डी नावाचे रेल्वे स्टेशन व विमानतळ उभारण्यात आले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment