बिगबॉस फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकूरचे लग्नानंतर देवकार्याचे फोटो झाले व्हायरल..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सई लोकूर ला कोण नसेल ओळखत ? अहो बिगबॉस मध्ये नव्हती का ? आता आठवली असेल. कारण ती घराघरांत पोहचलेली अभिनेत्री आहे. जिने मागे लॉ’क काळात लग्न बंधनात अडकण्याचा विचार केला होता. पण आता सई लोकूर च्या लग्न कार्याच्या वेळी होणाऱ्या किंवा आधीचे काही देवा कार्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे जरा फोटो पाहुयात आणि माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

Sai Lokur Wedding Pic

‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर येत्या 30 नोव्हेंबर रोजी लग्नगाठीत अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतेच सईने घरी पार पडलेल्या देवकार्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काहीच अवधीत ते खूप व्हायरल झाले.

See also  "दमलेल्या बाबाची कहाणी" चित्रपटातील ही बाल कलाकार आता दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो...

27 नोव्हेंबर रोजी देवकार्य पार पडले. देवकार्यासाठी सईने जांभळ्या रंगाची खणाची साडी नेसली असून त्यावर तिने मोत्यांचे दागिने घातले आहेत. पारंपरिक रुपात सईचे सौंदर्य अधिकच खुलून आलेले आहे. हीच आपल्या महाराष्ट्र ची मराठी संस्कृती आहे. त्यामुळे चाहत्यांना तिचा हा पारंपरिक लूक फार आवडला.

Sai Lokur Family Photo

देवकार्यासाठी तिचा होणारा पती तिर्थदीप रॉय याने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला. तिर्थदीप व आई-बाबांसोबतचे हे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

काल म्हणजेच 28 नोव्हेंबर सईचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार होता. तर तो व्यवस्थित पार पडल्याचे व्हायरल फोटो होते. 29 नोव्हेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असेल. 30 नोव्हेंबर रोजी लग्न आणि याच दिवशी रिसेप्शनही होणार आहे. आता एकदोन दिवसात लग्न करून वैवाहिक जीवनात रमणारी सई लोकूर ला भावी वाटचाली करिता चाहते खूप कॉमेंट करून शुभेच्छा देतायत.

See also  या कारणामुळे कीर्तनकार शिवलीला पाटीलने घेतला बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय...

Sai Lokur Wedding Photo

कोण आहे कोण नेमकं सई लोकूर ?…जाणून घ्या सईविषयी… सई लोकूरने ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’ या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. फरदीन खान नायक असलेल्या या चित्रपटात सईने फरदीनच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. इतकेच नाही तर ‘पकडा गया’ या सई परांजपे यांच्या तर ‘मिशन चॅम्पिअन’ या तिच्या आईच्याच प्रॉडक्शनचा चित्रपटात सईने बालकलाकार म्हणून काम केले आहे.

हिंदी चित्रपटातही केले आहे काम: सईने 2015 साली आलेल्या ‘किस किस को प्यार करु’ या चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत भूमिका केली होती. यात सईने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती. सईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि आईच्या मार्गदर्शनाखाली सईने अनेक नाटकांत काम केले आहे. सईची आई वीणा लोकूर या प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत.

See also  पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास ! टाइमपास ३ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.

या चित्रपटात केले आहे काम सईने आतापर्यंत प्लॅटफॉर्म, आम्ही तुमचे बाजीराव, पारंबी, जरब, मी आणि यु या चित्रपटांत काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment