मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सुरु केलाय नवीन व्यवसाय, जाणून घ्या कोणता आहे तिचा नवीन व्यवसाय…

आपली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आणि फॅशन इंडस्ट्री गाजवून आता अजून एका नवीन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. होय, सई ताम्हणकर चक्क बनली आहे उद्योजिका. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सईने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे साडी फॅशन ब्रँड लेबल लाँच केलं आहे.

सई ताम्हणकरने आजवर अनेक अभिनव निर्णय घेऊन आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. मग ते मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्री आणि फॅशन इंडस्ट्रीत तिने कमावलेलं नाव असो अथवा कुस्ती लीग मधे स्वत:ची कुस्ती टीम असणं. सईने नेहमीच वेगळा दृष्टिकोन ठेऊन मिळवलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलंय.

स्वतःच्या उत्तम फॅशन सेन्सचा आणि त्या क्षेत्रातील आपल्या अनुभवी ज्ञानाची सांगड घालून फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं अभिनव लेबल घेऊन वस्त्रं व्यवसायात उतरली आहे. सईची तरुणी, महिला फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. ती सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. सईच्या समस्त महिला फॅन्सला सईच्या स्वपसंतीच्या साड्या नेसण्याची संधी ‘दि सारी स्टोरी’ ब्रँडच्या माध्यमातून चालून आलीय.

सई ताम्हणकरची कॉलेजपासूनची मैत्रीण असलेल्या श्रुती भोसले-चव्हाण आणि सईने एकत्रितपणे हा साडीचा ब्रँड लाँच केलाय. “कॉलेजपासूनच आम्ही दोघींनी एकत्र येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण करावे, असं मला आणि श्रुतीला नेहमी वाटत असे. पण काय नवं त्याबाबत काहीच सुचत नव्हतं.

नंतर पुढे मग आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात करीयर करण्यात गुंतून गेलो. पण आता २०२० वर्षात आम्हाला अभिनव अश्या नवनवीन थिम्स आणि संकल्पनांवर विचार करायची संधी मिळतेय. आणि आता या ‘दि सारी स्टोरी’ ब्रँडच्या रुपात आम्ही आमचं स्वप्न आकाराला आणतो आहोत. त्यासाठी आपले प्रेम भरभरून मिळत राहो…राहील” असे सईने या ब्रँड लॉंचिंग प्रसंगी आवर्जून सांगितले.

‘दि सारी स्टोरी’ या ब्रँडच्या साड्यांमध्ये ग्राहकांसाठी खास असा ‘सई टच’ काय असेल? असं विचारल्यावर सईने सांगितले की , “माझ्या चित्रपट आणि त्यामधील भूमिकांबाबत जशी मी चोखंदळ आहे ना, अगदी तशीच माझ्या साड्यांबाबतही आहे. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते. तसेच आमच्या या लेबलची साडीही एखादी गोष्ट अलवारपणे उलगडावी इतकी सुरेख असेल.”

‘दि सारी स्टोरी’ या ब्रँड लेबल ची ही अभिनव संकल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याची प्रेरणा कशी मिळाली याविषयी विचारल्यानंतर श्रुती भोसले-चव्हाण म्हणाली की , “माझ्या आईकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. भारतातल्या कानाकोप-यात मिळणा-या प्रत्येक प्रकारातल्या साड्या तिच्याकडे आहेत. अर्थातच आईची ही साड्यांची आवड लहानपणापासून माझ्यात रूजत गेली. आणि आता त्याचेच साकार स्वरूप म्हणजे आमचे हे ‘दि सारी स्टोरी’.“

आपल्या भारत देशाला लाभलेली वस्त्रालंकारांची समृध्द परंपरा जपतांनाच, प्रत्येक वयोगटातील, क्षेत्रातील महिलांना आवडतील, शोभतील, अशा रंगांच्या, डिझाइनच्या साड्या ‘दि सारी स्टोरी’मध्ये उपलब्ध असतील. श्रुती याविषयी सांगते की, “साडी कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही… होणारही नाही. आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या सण-समारंभांना साडी नेसण्याकडे जगभरातल्या अगदी चिमुकल्या कुमारिका मुलींपासून ते अगदी ८० वर्षांच्या आजींपर्यंत प्रत्येक स्त्रीचा कल असतो. म्हणूनच ‘दि सारी स्टोरी’मध्ये शेकडो वैविध्यपुर्ण प्रकारातल्या साड्या तुमच्या सेवेत सादर असतील.”

अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची शाबासकी मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटामधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन तिच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय. त्याबद्दल स्टार मराठी टीम तर्फे हार्दिक अभिनंदन!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment