बिगबॉस फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा झाला साकारपूडा, लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखरपुड्याचे फोटो पहा…
सध्या अनेकजण जण लगीनघाई मध्ये अडकलेले दिसत आहेत. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री ने सोशल मिडियावर पोस्ट करून चाहत्यांना संभ्रमात टाकलेलं आहे. कारण ती लग्न करेल की काय अशी ती पोस्ट आहे. म्हणजे तिचा नुकताच साखरपुडा झालेला आहे. तर त्यातले तिने काही फोटो शेयर केले होते. आता ती अभिनेत्री कोण ? याआधी जाणुन घेऊयात. सविस्तर आढावा..
मराठी मध्ये सध्या रिलेशन मध्ये पडणं. त्या नंतर मग लग्न किंवा ब्रेकअप, अश्या अनेक घटना घडत असतात. कारण हे ग्ल्यामर फिल्ड आहे. बिगबॉस मराठीच्या आत्ता पर्यंतच्या पर्वाचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की अनेक जोड्या तिथं तयार झाल्या.
त्यात एकत्र काम केलं की लगेच रिलेशन मध्ये येणं ही गोष्ट आता फार अपरिचित राहिलेली नाही. म्हणजे ती सर्व सामान्य लोकांना कमी अनुभवायला मिळते. पण बॉलीवूड किंवा मराठी इंडस्ट्री या दोन्ही मध्ये अश्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
त्याचं उत्तरं उदाहरण म्हणजे मागच्या पर्वाची विजेता शिव आणि विणा जगताप. असे अनेक उदाहरणे देता येतील. त्यातच आता एका नव्या उदाहरणाची नव्याने भर पडलेली आहे. ती म्हणजे अभिनेत्री सई लोकूरची. आता आपण म्हणाल की तिचं काय ? होय आज आपण तिच्या आयुष्यात सध्या काय घडतय. हेच जाणुन घेणार आहोत.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई लोकूर हिने आपल्या चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला. ज्यात ती आणखी एका व्यक्तीसोबत पाठमोरी असल्याचे दिसून आले. “I finally found mine…”असे कॅप्शन देत तीने हा फोटो शेअर करताच मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्यावर लवकरच सई लग्नही करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. परंतु आता तिचा साखरपुडा झाला आहे. हे तिनेच इंस्टा ला शेयर केलं आहे.
अर्थात हे तिचे अरेंज मॅरेज असल्याने चाहत्यांना देखील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे की सईचा होणारा नवरा नेमका आहे तरी कोण आणि तो काय करतो? तर तिच्या नवऱ्याचं नाव आहे तिर्थदीप रॉय असे आहे. हा मराठी भाषिक नाहीये.
तीर्थदीप हा नेमकं करतो काय?? तो देखील फिल्म इंडस्ट्रीशीच निगडीत आहे का हे अद्याप समजू शकलेलं नाही तरीही दोघांनी फिल्मी स्टाईलने फोटोशूट केलं आहे.
सई लोकूर ही मूळची बेळगावची काही मोजक्याच मराठी हिंदी चित्रपटात तीने कामही केले आहे. “कूछ तुम कहो कूछ हम कहें ” हा तिने साकारलेला पहिला हिंदी चित्रपट त्यानंतर कपिल शर्मा सोबत “किस किसको प्यार करूं” या हिंदी चित्रपटातही ती झळकली परंतु मराठी बिग बॉसच्या शोमधून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.
याआधी बिगबॉस फेम शर्मिष्ठ राउत सुद्धा अशीच अडकलेली होती. त्या नंतर आता सईचा नंबर लागलेला दिसत आहे. यावर तिच्या चाहत्यांना फार आनंद होत आहे. तिला शुभेच्छा येत आहेत. आता फक्त तिचा हा नवरा कोण ? यावरच उत्तर मिळायचं राहिलेलं होतं तेही मिळलं आहे.. सई लोकूर ला स्टार मराठीच्या सर्व टीम कडून प्रचंड शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.