बॉलीवुड अभिनेत्री सई मांजरेकरची बहीण देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
मनोरंजन सृष्टी म्हणलं की मग तिथं असणाऱ्या नात्यांच्या गोतावळ्याला अनेक वाटा फुटलेल्या आहेत. त्यात एक समजा प्रसिद्ध कलाकार असेल तर त्याला एक सोडून दोन दोन बायका सुद्धा आहेत. मराठी मध्ये ही आपल्याला अनेक उदाहरणे पाहायला मिळतील आणि हिंदी मध्ये सुद्धा. त्यातच आज आम्ही आपल्याला असेच एक प्रसिद्ध व्यक्तीचं उदाहरण देणार आहोत.
त्यांचं नाव आहे दिग्दर्शक, अभिनेता, आणि निर्मिती करणारे महेश मांजरेकर. ( mahesh manjrekar ) होय त्यांच्या दोन बायका आहेत आणि त्यांची मुलं. तर त्यातील गौरी ( gauri ingvale ) इंगवले म्हणून हीही एक मुलगी आहे जी खूप सुंदर आहे. अनेकांना तीच्या बद्दल माहीत नसेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठीत आपली छाप उमटविली आहे. महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.
या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. त्यातील सई मांजरेकर हिने दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय दुसरी लेक गौरी इंगवलेसुद्धा अभिनेत्री आहे.
महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता या कॉस्टयूम डिझायनर आहेत.मात्र मेधा मांजरेकर हिच्यासोबत काम केल्यावर त्यांचे प्रेम जुळून आले. १९९५ साली महेश मांजरेकर आई चित्रपट बनवत होते. त्यावेळी मेधाशी त्यांची ओळख झाली. आणि मैत्री ने सुरुवात झाली. पण पुढे हीच मैत्री प्रेमात बदलली.आणि मग पुढे लग्नात. आज ते सुखी आयुष्य जगत आहेत. कला क्षेत्रात उतुंग भरारी घेत.
आपल्या या चित्रपटात मेधानेच काम करावे म्हणून त्यांनी तिला विनवणी केली. मात्र अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही सौंदर्यावर घायाळ झालेल्या महेश मांजरेकरांनी तिला अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र मेधाला काही सुचेना काय करावे कारण मेधाला त्यावेळी परदेश दौरा करायचा होता तो करून आल्यावरच मी तुमच्या चित्रपटात काम करेन अशी अट मेधाने घातली आणि मग काय इथूनच त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
महेश मांजरेकर यांना सई, अश्वामि या २ मुली आहेत तर सत्या नावाचा एक मुलगा. तर गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील ते आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात. कारण सर्वांना सारखं सांभाळलं तर प्रेम टिकून राहतं असं त्यांचं म्हणणं आहे.
जिच्या बद्दल सांगणार आहोत त्या अभिनेत्री गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले आहे.
आणि इथं तिचा अभिनय खूप चांगला झाला. अनेकांनी खूप कौतुक केलं. बाल वयात एवढं भारी काम करते तर मोठेपणी खूप उत्तम काम करेल या विश्वासाने महेश मांजरेकर यांनी आता तिला मोठी अभिनेत्री बनवायचा निर्णय घेतलेला आहे.
गौरी लवकरच ‘पांघरुण’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे.
हळूहळू ती अनेक चित्रपट मध्ये आपल्याला दिसली तर नवल वाटायला नको. गौरी नाटकातून ही कामे करत आलेली आहे. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.