प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या बिग बजेट सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकाधिपती रावणाची भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाद्वारे ओम राऊत यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ओम राऊत यांचा हा पहिलाच सिनेमा असा काही गाजला की, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला. साहजिकच, ‘तान्हाजी’ नंतर ओम राऊतच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सर्वांचीच उत्सुकता वाढली होती. तो नवीन प्रोजेक्ट म्हणजेच ‘आदिपुरुष’.

काही दिवसांपूर्वीच ओम राऊत यांनी आदिपुरुष या त्यांच्या बिगबजेट सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. सुपरस्टार प्रभास यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ओम राऊत यांच्या या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटात लंका नरेश रावणाची भूमिका कोण साकारणार? याबाबत अनेक नावं चर्चेत होती. यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या नावाची म्हणजेच सैफ अली खानची ओम राऊत यांनी लंकाधिपती रावणाच्या भूमिकेसाठी निवड केल्याची घोषणा केली आहे.

See also  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडतं? इंडियन आणि वेस्टर्न, जाणून घ्या सविस्तर...

आदिपुरुष या चित्रपटातून सैफ अली खान हा लंकाधिपती रावण भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज गुरुवारी सकाळी बरोबर ७ वाजून ११ मिनिटांनी ओम राऊत यांनी सैफचं नाव मीडिया समोर जाहीर केले.

काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाले होते. यात सुपरस्टार प्रभास प्रभू रामचंद्रांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा रामायणावरआधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे. “जेव्हा मी या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा माझ्या समोर फक्त प्रभासचाच चेहरा आला होता.

रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. प्रभास सध्या देशातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे आणि या भूमिकेसाठी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये शांती आणि आक्रमकता दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे” असं ओम राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले.

See also  सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

बाहुबली मधे प्रभास एक योद्धा म्हणून दिसला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या चित्रपटात तो एका योध्यापेक्षाही एक कुशल धनुर्धारी आहे. प्रभास यासाठी धनुर्विद्याही शिकणार आहे. त्याने मेहनत व सरावास सुरूवातही केलीय.

ओमच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. आता पुन्हा रावणाच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मधून रसिकांसमोर येतोय. याबाबत बोलतांना सैफ अली खान म्हणाला की, “मला पुन्हा ओम दा सोबत काम करण्यात आनंदच आहे. उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान आणि हटके दृष्टिकोन ही त्याची बलस्थाने आहेत.

आता आदिपुरुष प्रोजेक्टचा मी सुद्धा एक भाग झाल्याने मी आनंदित आहे. मी प्रभाससोबत स्क्रीन शेअर करण्यास आणि त्यातही महाबली रावणाची राक्षसी भूमिका साकारण्यास फार उत्सुक आहे.”

See also  फोटो मध्ये दिसणारी हि लहान चिमुकली आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

भगवान रामाची भूमिका प्रभास साकारणार आहे. त्यामुळे सीता, लक्ष्म आणि हनुमानाची भूमिका कोण साकारणार याचीही चर्चा आहेच. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कीर्ती सुरेशचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment