सैफ अली खान आणि करीना कपूर आहेत कोट्यवधींचे मालक, त्यांच्या ‘पतौडी’ राजवाड्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!
अभिनेता सैफ अली खान याच्या मालमत्तेत अनेक महागड्या कार, बंगले आणि अगदी राजवाड्या सारख्या महालांचा समावेश आहे…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान दि. १६ ऑगस्ट रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ त्याच्या चित्रपटांमुळे खूप लोकप्रिय आहे आणि त्याने आपल्या चित्रपटांच्या बळावर एक खास ओळखही निर्माण केली आहे. पटौदीचे नवाब म्हणून सैफची आणखी एक ओळख आहे.
वडिलांच्या निधनानंतर २०११ मध्ये सैफ दहावा पटौदी नवाब बनला. सैफच्या फिल्मी करियरबरोबरच त्याच्या संपत्तीबद्दलही बरीच चर्चा आहे. पतौडी कुटुंबाशी असलेल्या त्याच्या संबंधामुळे त्यांची संपत्ती इतर बॉलीवूड स्टार पेक्षा खूपच जास्त आहे. तर जाणून घेऊ या सैफ अली खानच्या या संपत्तीची निव्वळ किंमत किती आहे ते…
जर आपण सैफ अली खानच्या मालमत्तेबद्दल बोलायचे तर त्याच्या हरियाणास्थित पतौडी पॅलेसचे मूल्य सुमारे 800 कोटी रुपये आहे. हा आलिशान राजवाडा सैफ अली खानच्या मालकीचा आहे, त्याशिवाय राजस्थानच्या नीमराणा येथील जागेचा मालक सैफ अली खान देखील आहे.
सैफने भाड्याने दिलेला हा नीमराणा किल्ला पुन्हा विकत घेतला. त्याचबरोबर बऱ्याच अहवालात असे म्हटले आहे की त्याच्याकडे मुंबईतही अनेक फ्लॅट्स आहेत. त्यातील एकाची किंमत ४.२ कोटी रुपये आहे आणि इतर दोन बंगल्यांची किंमत 6 कोटी रुपये आहे. खास विश्रांती साठी त्याचे स्वित्झर्लंडमध्ये एक घर आहे.
त्यांच्या कारबद्दल जर आपण चर्चा केली तर सैफ अली खान कडे बऱ्याच आलिशान किमती गाड्या आहेत . बऱ्याच अहवालांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे ३.४ कोटी रुपयांची ऑडी आर-8, ९० लाखाची फोर्ड मस्टंग 90, बीएमडब्ल्यू सिरीजची एक १.४४ कोटीची गाडी, १.५६ कोटीची लँड रोव्हर स्पोर्ट आणि जवळपास १० लाखाची हार्लेविडसन आयर्न मोटरसायकलही आहे. याशिवाय सैफ अली खान याने जवळपास १०० कोटींची गुंतवणूकही केली आहे. सैफ अली खानकडे अनेक ब्रँडेड कंपन्यांची महागडी घड्याळे सुदधा आहेत.
सैफ याची कमाई किती आहे म्हणाल तर फोर्ब्स मासिकाच्या १०० फिल्म सेलिब्रिटींच्या यादीमध्ये सैफचे ७४ वे स्थान होते. २०१९ च्या यादीनुसार, सैफ अली खानने २०१८- १९ मध्ये १७.०३ कोटींची कमाई केली होती.
या व्यतिरिक्त २०१८ मध्ये ही कमाई १०.२५ कोटी आणि २०१७ मध्ये १२.१७ कोटी रुपये होती. सैफ अली खानच्या नेट वर्थ चा अंदाज लावला तर सैफ अली खानची मालमत्ता ही महालाची किंमत सोडून सुमारे २८२ कोटी रुपये एवढी आहे.
(येथे दिलेली आकडेवारी इंटरनेटवरील वृत्तांच्या आधारे लिहिलेली आहे.)
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.