सैराटच्या आर्चीवर नेटकरी झाले फिदा, पहा अभिनेत्री रिंकू राजगुरूचा भन्नाट स्टायलिश लुक मधील व्हायरल व्हिडिओ…

रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिंकूला सहसा आर्ची नावानेच जास्त संबोधल्या जातं, त्याच कारणही तितकच विशेष आहे. हे आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सैराट या नागराज मंजुळे यांच्या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक दैदीप्यमान असा साजेसा तुरा रोवला.

या सिनेमातले सर्वच कलाकारांना अगदी भरभरून प्रेम आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. आता या सिनेमातलं पात्र आर्ची अर्थात रिंकू राजगुरू. तिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक जबरदस्त भन्नाट स्टायलिश लुकमधला व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद येत आहे.

इतर अनेक इन्स्टाग्राम पेजेपसवरूनही हा व्हिडीओ शेअर होताना पहायला मिळतो आहे. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते, हे वारंवार पहायला मिळतं. तिने शेअर केलेला स्टायलिश लुक मात्र चाहत्यांच्या मनात घर करून जातो आहे.

तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधे ती एका गाण्याच्या म्युझिकवर थि’र’क’ता’ना दिसते आहे. यावेळी तिने अंगावर पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची शार्ट्स अंगावर परिधान केलेली आहे. एकप्रकारे ह्या काॅम्बीनेशनमुळे तिचा चेहरा यात आणखीच खुलून दिसत आहे. तिच्या या नव्या लुकवर चाहते अगदी घा’या’ळ झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव होताना पहायला मिळाला.

रिंकू राजगुरूला मराठी सिनेसृष्टीत सैराटनंतर बरीच चांगली कामे मिळाली आहेत. आणि ती आपल्या अभिनयाला अधिक खुलवत काम करताना पहायला मिळत आहे. तिने मागे अभिनेता चिन्मय उदगीरकर यासोबत “मेकअप” हा मराठी आणि उत्तम सिनेमा केला. यात तिने साकारलेली भुमिका तिच्या आधीच्या दोन सिनेमांपेक्षा पूर्णत: वेगळी होती.

रिंकू ने कागर या सिनेमातही जबरदस्त भुमिका केली होती. हा सिनेमा राजकारण या विषयावर आधारित होता, या सिनेमाला महाराष्ट्रातील जनतेने भरगच्च प्रतिसाद दिला असल्याच पहायला मिळालं. आता नागराज मंजुळे आपल्या नव्या झुंड या हिंदी प्रोजेक्टसोबत “अमिताभ बच्चन” यांना मुख्य भुमिकेत ठेवत जो सिनेमा घेऊन येत आहेत, त्यातही रिंकू राजगुरू असणार आहे.

रिंकूने आपल्या अभिनयाच्या प्रयत्नांना यशाच्या स्वरूपात दमदार पद्धतीने उतरवायला सुरूवात केल्याने आज तिच्याकडे उत्कृष्ट कामांची लिस्ट तयार होते आहे, अर्थातच तिला चांगल्या दर्जाची कामेदेखील करायला मिळत आहेत. मुळात महत्त्वाचं म्हणजे नुकताच तिचा ॲमेझॉन प्राईमवर “अनपॉज्ड” हा सिनेमा रिलीज झाला आहे.

या चित्रपटात एकूण पाच विविध प्रकारचे भाग आहेत, ज्यामधील “रॅट-ए-टॅट” यात रिंकू दिसली होती. याशिवाय नुकतचं रिंकू राजगुरूने तिचा पुढे येणारा मराठी सिनेमा “छु’मं’त’र” याचही शुटींग लंडनमधे पूर्ण केलं आहे.

या सिनेमात सुव्रत जोशी, प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आदी कलाकारांसोबत रिंकूला पाहणं रसिकप्रेक्षकांसाठी एक भन्नाट मेजवानी ठरणार आहे. मुळात या सिनेमाच दिग्दर्शन समीर जोशी करत आहे. आता एकदा हा सिनेमा मोठ्या पडद्यावर कधी एकदा अवतरतो ह्याची चाहत्यांमधे निश्चितच उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment