‘सैराट’ फेम सल्याला पुण्यात एका रिक्षावाल्याकडून शिवीगाळ, वाचा नेमकं काय झालं?
सशक्त कथानक आणि नव्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘सैराट’ आजही प्रेक्षकांच्या हृदयात त्याच स्थान निर्माण करून आहे. चित्रपटातील आर्ची आणि परश्या आणि त्या दोघांचे प्रेम तर अप्रतिम आहे. त्या बरोबरच या चित्रपटातील सल्या सुद्धा तुम्हाला आठवत असेलच.
होय, अभिनेता अरबाज शेखने या चित्रपटात सल्याची भूमिका साकारली आहे. हाच सल्ला सध्या सोशल नेटवर्कर चर्चेत आला आहे. होय, सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाज अस्लम शेखला पुण्यातील एका रिक्षाचालकाकडून फटका सहन करावा लागला आहे.
त्याने फेसबुकवर पोस्ट लिहून या घटनेची माहिती दिली आहे. माझा आरोप सर्व रिक्षाचालकांवर नाही, असे अरबाज ने त्याच्या फेसबुक पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.
पुण्यात रिक्षाचालकांकडून लुटमार सर्वच रिक्षाचालक असे नसतात. नाव आसिफ मुल्ला, रिक्षा क्रमांक MH 12 NW 9628, नांदेड शहर ते पुणे स्टेशन पर्यंत रिक्षाचे भाडे रु.198 होतात. मी Ola, Uber, Rapido सारखे अॅप कधीच वापरत नाही, त्या दिवशी पाऊस पडत होता. मी मित्राला म्हणालो, पाऊस पडतोय आणि तू कुठे मला सोडायला पावसात परत ये आणि जा करतो…
Mhnun माझ्या मित्राने मला रॅपिडो अॅपद्वारे रिक्षा मिळवून दिली. पाऊस पडतच होता. नांदेड शहरातून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले होते आणि मी त्याला म्हणालो देखील की दादा, तू खूप फिरवत आहेस, माझ्या बोलण्यावर त्याने उत्तर दिले नाही. वरून 60 रुपये जास्त मागू लागले. मी म्हणालो. का? मी त्याला अस विचारले असता त्याने मला शिवीगाळ केली.
पाऊस पडतोय… तू इथेच उतरून जा… जास्त बोलू नकोस… मी रोज रिक्षा चालवतो तू नाही… ६० रुपये जास्त द्यावे लागतील नाहीतर इथून खाली उतर… मी उतरू शकलो नाही आणि मला 6 वाजता ची ट्रेन पकडायची होती. मला गावी जायचे होते. मी त्याला माझी ओळख सांगितली नाही.
पुण्यात राहणा-या माझ्यासारख्या माणसाला जर दररोज या गोष्टीला सामोरे जावे लागत असेल, तर त्या लोकांचे काय होईल, जे खेडेगावातून पुण्यात येत आहेत. हे लोक किती लुटत आहेत? हे कुठेतरी थांबले पाहिजे…. आशा आहे की सिस्टम मार्ग काढेल…, अरबाजने या प्रकारची पोस्ट शेअर केली आहे.