सैराटफेम सल्या करतोय खूप मोठं काम ! करोनाच्या परिस्थितीत ठरतोय गोरगरीब कुटुंबाचा वाली. तुम्ही सुद्धा म्हणताल की कडक सलाम !
तीन महिन्यापासून पुर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरामध्ये कैद आहेत. कसलाच कामधंदा चालू नाहीये. ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांची वेगळी गोष्ट आहे; पण गावा खेड्यात किंवा शहरात हातावरचं पोट असणाऱ्या माणसाचं खूप अवघड होऊन बसलंय. पोटापाण्याचा प्रश्न प्रचंड प्रमाणात उद्भवलाय. अश्यात गरजूंना मदत करण्याचे अनेक स्तराहून प्रयत्न होत आहेत. यांमध्ये सरकारी, खाजगी, समाजसेवा संस्था पुढे आलेले आपल्याला दिसत आहे. जे लोकं त्यांची कामे करून त्याला सोशल करतात.
ते माणसं आणि त्यांची मदत आपल्या पर्यंत पोहचते. यामध्ये सोनू सूद सध्या आघडीवर असताना आपल्याला दिसत आहे. पण जी माणसं कामाच्या पावतीची अपेक्षा ठेवत नाही, ती आपली कामे मुकाट्याने करत असतात. असाच एक जिगरबाज सैराट फेम अभिनेता सल्या म्हणजेच तुमचा लाडका अरबाज शेख हा सुद्धा सध्या गरजूंच्या गळ्यातला ताईत बनत आहे.
दोन तीन वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रसिकांनी त्याला प्रचंड डोक्यावर घेतला. त्यामधील सर्वच कलाकार एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामध्ये अरबाज शेख याने सल्या ही भूमिका करून अख्या महराष्ट्रात आपलं ओळखीचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. एक कलाकार म्हणून त्याचं रूप समोर आलं असलं तरी त्याच्या मागे माणुसकीचं दुसरं नातं लपलेलं होतं. सोशल मिडीयावर दिलेल्या वृत्तानुसार सल्या असं म्हणतो की “ लॉकडाऊन झाल्यामुळे गावामध्ये अनेक छोटे मोठे उदयोग बंद पडले. त्यामुळे गरीब कामगार यांचे एका वेळेच्याच जेवणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावला. मनाला वाटलं की यार आपण यांच्यासाठी काहीतरी करायला हवं राव ! पण कशी सुरुवात करावी हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा सचिन अतकरे यांच्याशी त्याची ओळख झाली तेव्हा त्याचं काम जोरात सुरु झालं.
सचिन अतकरे सामाजिक सेवाभावी संस्था मध्ये काम करतात. करोना मुळे करमाळ्यात गोरगरीब जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांनी अन्नधान्य वाटप सुरु केलं. अश्यात फेसबुक वर त्यांची सल्याशी ओळख झाली. मग मेसेज द्वारे सगळी माहिती मिळवून त्यांनी त्याला सोबत उतरून काम करायला आवाहन केलं. इथं सल्याला वाट सापडली. अनेकजण घरी बसून करोना काळात नियोजन करताना दिसतात. मात्र तळागाळात उतरून कुणीच काम करत नाही. “ बड्या बड्या बाता न ढुंगण खातय लाथा ”.. राजकारणी लोकं तर मदत करायची सोडून घरात बसलीयत. पण म्हणतात ना की ज्याचं मन साफ असतं फळाची अपेक्षा न करता काम सुरु करतात.
सल्यानं कसलाही विचार न करता लोकांना मदत करायला सुरवात केली. आधी गावातचं धान्य न कीट वाटप केलं. नंतर आसपासच्या गावात जावून काम केलं. सल्याचं हे रूप पाहून अनेक लोकांनी सोशल मिडीयावर त्याला कामाची पावती म्हणून शुभेच्छा दिल्या. त्याचं म्हणणं आहे की जेव्हा मी लोकांच्या घरोघरी गेलो तेव्हा त्यांचं दुखं अजून जास्त जवळून पाहता आलं. अनेकांच्या आयुष्याला चिरा पडलेल्या आहेत. त्या बुजवण्याचं काम अरबाज हाती घेतल्याचं सांगतो आहे. इतकच नव्हे तर पुढे चालून परिस्थिती बिकट होण्याआधी वैद्यकीय सोय सुविधा उपलब्ध करून कशी द्याता येईल यावरही सध्या तो विचार करत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन घरच्या सदस्यासारखं विचारपूस करून हवी ती मदत मिळवून देणाचं खूप जिगरबाज काम करत आहे. जेवढं बॉलीवूड व्हिलन सोनू सूद ला डोक्यावर घेऊन मिरवलं तेवढं सल्यालाही मिरवायला हवं. तसं जेव्हा महराष्ट्रातल्या रसिकांना सल्याची बातमी कळली तेव्हापासून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सगळीकडून होत आहे. सैराट फेम अरबाज ला कामाच्या घामासाठी कडक सलाम !
जसं काम सल्याने सुरु केलं आहे तसं बाकीच्या कलाकारांनाही याचा आदर्श घेऊन सहभागी व्हावं लागेल. कारण आज यांना मदत केली तर उद्या हेच आपल्या मदतीला येणार आहेत. हे जग एकमेकांच्या जगण्यावर अवलंबून आहे. सैराट फेम सल्याला त्याच्या माघामोलाच्या कामाला खूप शुभेच्छा. असचं काम करून कलाकार म्हणून माणुसकीचा झरा जिवंत ठेव.
धन्यवाद !