‘सैराट’मध्ये आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको पाहिली का? मोठ मोठ्या अभिनेत्रींना ही टाकतेय मागे…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी चित्रपटसृष्टीत आपण आजवर अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते पाहिले आहेत. काही कलाकारांनी तर चित्रपटसृष्टीतही आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये नागराज मंजुळे यांचे नाव घ्यावे देखील आवर्जून घ्यावेच लागेल. त्यांचे काही चित्रपट हे आज सुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत.

यातील सर्वात महत्त्वाचा आहे सैराट. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवले. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की तो हिंदीतही दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत इतका लोकप्रिय झाला आहे की, या चित्रपटाने तब्बल 100 कोटींची कमाई केली आहे.

आर्ची आणि परशा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आणि आवडली देखील आहे. या चित्रपटातील अजय अतुलचे गाणे देखील खूपच लोकप्रिय झाले आहे.  लोकांनी सैराट चित्रपटातील गण्याना अक्षरशः डोक्यावर घेतले होते आणि सैराट चित्रपटातील गाणे आजही तितकेच हिट आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही अतिशय उत्तम केले आहे. या सैराट चित्रपटाची कथा ही सुद्धा सर्वसामान्यांना स्पर्श करणारी अशीच आहे.

See also  मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेची लव्ह स्टोरी आहे खूपच हटके, गुपचूप केले होते लग्न, जाणून घ्या कोण आहे तिचा पती...

सुरेश विश्वकर्मा यांनी आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. लोकनाट्य प्रकारात वर्गातील सर्व प्रमुख भूमिका अगदी सोंगाड्या देखील त्यांनी साकारली आहे. खरे तर सुरेश विश्वकर्मा पदवीनंतर मुंबईत आले तेव्हा त्यांना या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप अधिक कष्ट करावे लागले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक स्टेज शो तसेच चित्रपट आणि पथनाट्यांमध्ये काम देखील केले आहे.

सुरेश विश्वकर्मा यांची सर्वत्र खरी ओळख ही सैराट चित्रपटातून झाली. या चित्रपटाच्या आधी देखील त्यांनी त्यांनी रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ, दिल्ली मुजरा यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. सैराट चित्रपटात आर्चीच्या वडिलांचीही अतिशय सुंदर भूमिका सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली आहे. चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका करणारा अभिनेता सुरेश विश्वकर्माच आहे.

See also  "बिग बॉस मराठी" शो सोडण्यामागील महेश मांजरेकरांचं नेमकं कारण आले समोर, ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

सुरेश विश्वकर्मा हे सिनेवर्ल्डमधले यशस्वी अभिनेते असले तरी देखील त्यांची पत्नी मात्र या सर्व गोष्टींपासून दूर राहणेच पसंत करत असल्याचं दिसून येतं आहे. सुरेश विश्वकर्मा यांच्या पत्नीचे नाव हे विद्या विश्वकर्मा आहे.  विद्या दिसायला खूपच सुंदर आहे. विद्या मीडियापासून दूर राहणे पसंत करते. आणि अर्थातच ती नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहते.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment