छोटी कार्तिकी म्हणजेच साईशा भोईर पुन्हा झळकणार पडद्यावर, या कारणास्तव सोडली होती मालिका..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो रुपेरी पडद्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मालिका “रंग माझा वेगळा” आता एका मोठ्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मालिकेचे आजवर प्रदर्शित झालेले सर्व भाग प्रचंड लोकप्रिय झाले आहेत, इतकेच नसून यातील सर्व कलाकार देखील भक्कम अभिनय सादर करतात म्हणून तर लोकांच्यात मालिकेची आणि सोबतच यातील कलाकारांची क्रेझ वाढत आहे. मित्रहो यामध्ये असणारे बालकलाकार सुद्धा अतिशय लोकप्रिय बनलेले आहेत, त्यांच्या चिमुकल्या बोलीने मालिकेला एक सुंदर वळण मिळाले आहे. मध्यंतरी यामधील कार्तिकी बदलली गेली होती.

मालिकेत कार्तिकीची भूमिका याआधी साईशा भोईर ही साकारत होती, त्यामुळे अनेकजण तिला या भूमिकेवरून ओळखतात. तिने ही भूमिका अप्रतिम वठवली होती, या भूमिकेत इतका जीव भरला होता की तिच्याशिवाय मालिकेत मनोरंजनाचा रस कमी वाटतो. मात्र ती गेल्यानंतर मालिकेत कार्तिकीची भूमिका मैत्रेयी दाते ही निभावत आहे, मैत्रेयी ही देखील एक उत्कृष्ट बालकलाकार आहे. मित्रहो साईशाने मालिका सोडल्यावर अनेकजण नाराज झाले होते, पण आता पुन्हा एकदा आपण तिला पडद्यावर पाहणार आहोत.

See also  टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार लवकरच "या" मराठी चित्रपटातून, फेब्रुवारीत होणार हा चित्रपट प्रदर्शित

झी मराठी वाहिनीवरील एका नवीन मालिकेत साईशा पुन्हा एकदा झळकणार आहे. या मालिकेचा प्रोमो अलीकडेच प्रदर्शित झाला असल्याने सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक भन्नाट कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. “नवा गडी नवं राज्य” असे या मालिकेचे नाव आहे, नावावरून मालिकेच्या कथानकाला जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत.

तसेच यामध्ये बालकलाकार साईशा भोईर, वर्षा दांदळे, अनिता दाते यांसारखे बरेचसे बालकलाकार पाहायला मिळणार आहेत. मालिकेत अनिता दाते यांची फोटोफ्रेम पाहायला मिळते आहे, तिने काही दिवसांपूर्वी आपला हार घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावेळी हा असा फोटो तिने का शेअर केला असावा याबाबत खूप चर्चा सुरू होती. सर्व नेटकरी तिला अस पाहून संभ्रमात पडले होते. तसेच अनेकजणांनी तिला यावर निरनिराळ्या कमेन्ट सुद्धा केल्या होत्या. पण आता सर्वानाच याचा स्पष्ट उलगडा झाला आहे.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री देखील अडकली लग्नबंधनात... लग्नाला मराठी कलाकारांनी लावली हजेरी...!

आता परत एकदा साईशा भोईरला आपण पडद्यावर पाहणार आहे, या मालिकेत तिलाही एक रंजक भूमिका मिळाली आहे. शाळेच्या कारणास्तव तिने “रंग माझा वेगळा” ही मालिका सोडली, ती इयत्ता दुसरी मध्ये गेली असून तिला शिकण्याची इच्छा होती म्हणून मालिकेतून एक्झिट घेतली आहे असे तिच्या पालकांनी सांगितले होते. पण आता पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहून तिचे सर्व चाहते खूप आनंदी आहेत. तिला नेहमी अशीच लोकप्रियता मिळो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment