वडिलांना खूपच घा’बरतो अभिनेता सलमान खान, जाणून घ्या सलमानच्या जीवनाशी निगडित खास आणि मनोरंजक गोष्टी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

२७ डिसेंबर १९६५ रोजी इंदूरमध्ये सलमान खानचा जन्म झाला आहे. सलमान खानला नायक नव्हे तर चित्रपट दिग्दर्शक बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून लोक त्याला नायक म्हणून साइन करू इच्छित होते. सहाय्यक अभिनेता म्हणून सलमानचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. फारूक शेख, रेखा यासारखी स्टारकास्ट असूनही पब्लिकचे लक्ष वेधण्यात सलमान यशस्वी झाला होता.

हिरो म्हणून सलमानचा पहिला चित्रपट ‘मैंने प्यार किया’ १९८९. मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी पा’य’रे’सी’मुळे फिल्म इंडस्ट्रीची अ’व’स्था अ’त्यं’त वाईट होती. त्यामुळे चित्रपटाच्या फारच कमी प्रिंट्स आणि प्रसिद्धीसह तो प्रदर्शित झाला. नंतर, प्रचंड यशामुळे चित्रपटाच्या प्रिंट्स संख्या वाढविण्यात आली. चित्रपटात झळकण्यापूर्वी संगीता बिजलानीबरोबर सलमानचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यावेळी संगीता सलमानपेक्षा मोठी स्टार होती. ते जाहिरातीमध्ये एकत्र काम करत होते.

salman khan 1584090953

2004 मध्ये द पीपल मॅगझिनने सलमानला बेस्ट लुकिंग मॅनच्या इन द वर्ल्ड यादीमध्ये सातवा आणि भारतातील पहिला क्रमांक दिला होता. सलमान धर्मेंद्रचा प्रचंड मोठा फॅन आहे. अगदी आजही धरम पाजी हेच सलमानचेव आवडते नायक आहेत. हॉलिवूड मधे त्याला सिल्वेस्टर स्टॅलोन (रॅम्बो) प्रचंड आवडतात. सलमानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ फिल्म मध्ये धर्मेंद्रजींनी एक पैसा ही न घेता केवळ सलमानवरच्या प्रेमापोटी काम केले होते.

धर्मेंद्रजी म्हणतात की सलमान त्यांना स्वतःच्या तारुण्याची आठवण करून देतो. ते देखील सलमानसारखे दिलदार, सरळ, नितळ मनाचे पण स्पष्टवक्ते आहेत. सलमानची आवडती नायिका अर्थातच हेमा मालिनी या आहेत. टिप्स फिल्म कंपनीने सलमान खान अशा नावाच्या चित्रपटाचे नाव नोंदणीकृत केले होते, परंतु चित्रपट आजपर्यंत बनलेला नाही.

70305128

सलमान खान आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र होते. या दोघांनी हम तुम्हारे हैं सनम, करण अर्जुन आणि कुछ कुछ होता होता असे चित्रपट केले आहेत. सलमानचा जानेमन आणि शाहरुखचा डॉन २००६ च्या दिवाळीला एकाच दिवशी रिलीज झाले होते. दोघांची दोस्ती इतकी होती की सलमान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान लोकांना सांगत असे की त्यांनी डॉन फिल्म सुद्धा पाहायलाच हवी.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे लग्नानंतर लगेच झाले होते घटस्फो'ट, या अभिनेत्रीने तर लग्न सुद्धा...

काही वर्षांपूर्वी सलमान आणि शाहरुख यांचे कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत एका गोष्टीवरून भां’ड’ण झाले होते. काही वर्षे बोलचाल बंद राहिली. मग एका इफ्तार पार्टीत सलमाननेच पुढाकार घेत शाहरुखला मिठी मारली. यानंतर त्यांनी भेटणे सुरू केले. शाहरुख, सलमानच्या शो ‘बिग बॉस’मध्ये’ दिलवाले ‘च्या प्रमोशनसाठी गेला होता. आता दोघांनीही त्या कटू गोष्टी विसरलेल्या आहेत.

Salman Khan

सलमान रोमँटिक माणूस आहे. संगीता बिजलानीबरोबर त्याचे प्रदीर्घ प्रेमसंबंध होते. नंतर सोमी अलीशी आणि त्यानंतर अशा कितीतरी प्रेमप्रकरणे आणि ब्रे’क अ’प झाले. सोमीनंतर ऐश्वर्या राय सलमानच्या आयुष्यात आली आणि सलमानची राखवर खूप प्रेम होते. असे म्हटले आहे की ऐश्वर्या शाहरुखसोबत ‘चलते चलते’ चित्रपटात शुटिंग करत होती. सलमान सेटवर पोहोचला आणि शाहरुख आणि ऐश्वर्या यांना खूप बोलला. नंतर शाहरुखनेसुद्धा सलमानला पाठिंबा दर्शविला आणि ऐश्वर्याला चित्रपटातूनच व’ग’ळ’ले आणि तिच्या ऐवजी राणी मुखर्जीला घेतले.

सलमानने सोडल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्यात जवळीक निर्माण झाली. विवेक सलमान आणि त्याच्या भावांबरोबर पं’गा घेतला आणि अ’ड’च’णी’त सा’प’ड’ला. नंतर विवेक ओबेरॉयने सलमानची मा’फी’ही मागितली पण सलमानने त्याला आजपर्यंत मा’फ केले नाही आणि त्याला ‘नौटंकी’ म्हणून घोषित केले. सलमानच्या जवळचे लोक सांगतात की, तो जर एखाद्यावर रा’गा’व’ला तर मग सहजासहजी माफ करत नाही.

https%3A%2F%2Fspecials

ऐश्वर्या रायपासून वि’भ’क्त झाल्यानंतर सलमानचे नाव कतरिना कैफशी जोडले गेले. कतरिनाच्या कारकीर्दीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आता या दोघांचा सुद्धा ब्रे’क’अ’प झाला आहे. सलमानचा कोणत्याही फिल्म पुरस्कारावर विश्वास नाही. त्याच्या फॅन्सचे आणि रसिकांचे प्रेम हेच त्याच्यासाठी सर्वात मोठे पुरस्कार आहेत.

मैने प्यार क्यूं किया (२००५) नंतर सलमानचे अनेक चित्रपट आले (क्योंकी, शादी करके फस गया यार, जानेमन, बाबुल, सलाम-ए-इश्क, सावरिया, गॉड तुसी ग्रेट हो, युवराज, मुझसे शादी करोगी) आणि फ्लॉ’प झाले. जवळजवळ चार वर्षे त्याच्या फिल्म्स फ्लॉप होत राहिल्याने त्याचे करियर सं’पु’ष्टा’त येण्याच्या मार्गावर आहे, असे वाटत असतांनाच पार्टनर आणि वॉन्टेड सारख्या चित्रपटांनी त्याला पुन्हा पुनर्जीवित केले.

सलमानच्या दबंग 2, एक था टायगर, दबंग, वांटेड, रेडी आणि बॉडीगार्ड सारख्या चित्रपटांनी यशाची नवी परिभाषा लिहिली आणि आज त्याच सलमान खानला सध्याचा सर्वात मोठा स्टार मानले जाते. चिल्लर पार्टी चित्रपट पाहिल्यानंतर सलमान इतका प्रभावित झाला की तो त्वरित चित्रपटाचा निर्माता बनला.

See also  पती रणवीर नाही तर ही व्यक्ती आहे अभिनेत्री दीपिकाच्या खूपच जवळ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

काही वर्षांपूर्वी रणबीर कपूर चित्रपट क्षेत्रांत नव्हता तेव्हा सलमान आणि रणवीर एका नाईटक्लबमध्ये भां’ड’ले होते. सलमान ने रणबीरला मा’र’हा’ण केली होती पण दुसऱ्याच दिवशी सलमान ऋषी कपूरच्या घरी गेला आणि वडील सलीम खानच्या सांगण्यावरून त्याने चक्क माफी मागितली.

sallu

सलमानला त्याच्या वडिलांची फार भीती वाटते. सलीम साहेब म्हणतात की आता तरी सलमानने लग्न केले पाहिजे. सलमान अनेकदा नवीन कलाकारांना बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस टिप्स देतो. हृतिक रोशनसह अनेक कलाकारांनी याचा फायदा घेतला आहे. सलमान त्याच्या मित्रांच्या चित्रपटातील छोट्या भूमिकेसाठी सुद्धा लगेच तयार होतो. भूमिकेविषयी किंवा कथेबद्दल बोलण्याऐवजी कधी यायचे? असे विचारतो.

सलमानचे वडील मुस्लिम आणि आई हिंदू आहे. सलीम साहेबांची दुसरी पत्नी ख्रिश्चन आहे. म्हणूनच, प्रत्येक सण सलमानच्या घरी संपूर्ण उत्साहाने साजरा करतात. तो आपल्या कुटूंबाला मिनी इंडिया म्हणतो. सलमान परोपकाराची आणि जनसेवेची अनेक कामे करतो. बीइंग ह्यूमन या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केलीआहे. डुप्लिकेट बिइंग ह्यूमन टी-शर्ट घातलेल्या लोकांचा सलमानला राग येतो.

देशातील अनेक शहरांमध्ये बीइंग ह्यूमन शॉप सुरू करण्यात आले आहेत. यातून मिळणारे उत्पन्न लोककल्याणाच्या चांगल्या कामासाठी वापरले जाते. सलमान अनेकदा आपल्या जवळच्या लोकांना महागड्या भेटवस्तू देतात. त्याच्या या सवयीने त्रस्त झाल्याने त्याच्या आईने त्याला माणसांना बीइंग ह्युमनची घड्याळे देण्यास सांगितले. आता सलमान अनेकदा असेच करतो.

सलमान अभिनयाशिवाय लेखकही आहे. त्याने काही चित्रपटांची कथा लिहिली आहे. त्याला पेंटिंग्ज देखील करायला आवडतात. चित्रपटांव्यतिरिक्त सलमानला टीव्हीवर देखील प्रचंड पसंत केले गेलेय. बिग बॉस आणि दस का दम या त्यांच्या ती व्ही शोला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

वादाबरोबर सलमानचे नाव बऱ्याचदा जोडले गेलेय. २००२ मध्ये त्याच्या का’रने रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपलेल्या चार माणसांना चि’र’ड’ले, त्यातील एकाचा मृ’त्यू झाला. हे हि’ट अँ’ड र’न प्र’क’र’ण बराच काळ गा’ज’ले. आणि जवळपास १३ वर्षानंतर त्याला दिलासा मिळाला.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या चाहत्याला धक्का देऊन खाली पाडलं, कारण ऐकून तुम्हाला देखील राग येईल...

राजस्थानमध्ये काळवीट हरीण शि’का’री’चा ख’ट’ला अजूनही न्या’या’ल’या’त सुरू आहे. याप्रकरणी सलमानने अगदी जे’लची हवाही खा’ल्ली आहे.काही वर्षांपूर्वी सलमानने खूप म’द्य’पा’न करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी आरशात पाहतांना त्याला स्वतःलाच त्याच्या चेहऱ्याबद्दल खूप वा’ई’ट वाटले. आपला चेहरा आपल्यालाच आवडत नाही तो लोकांनी का स्वीकारावा असे त्याचे त्यालाच वाटले. नंतर मात्र त्याने म’द्य’पा’न कमीच केले.

सलमानला चित्रपटसृष्टीचा भाई म्हटले जाते आणि त्याला लोकं घाबरतात सुद्धा. तथापि, सलमानला हे आवडत नाही की कोणी त्याला भाई म्हणावे. काही वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये र’स नव्हता. त्यांचा असा विश्वास आहे की जर चित्रपट चांगला असेल तर नक्कीच यशस्वी होईल. पण जेव्हा चित्रपट आ’प’टू लागले. तेव्हा त्याने दबंगची जोरदार जाहिरात केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मग त्यालाही प्रसिद्धीचे महत्त्व समजले.

सलमानला मुलाखत देण्यास आवडत नाही, परंतु चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याला ना’ई’ला’जा’स्त’व त्या द्याव्याच लागतात. अब्दुल रशीद सलीम सलमान खान असे सलमानचे पूर्ण नाव आहे. सलमानला महागड्या कार्स आणि बाईक्सची आवड आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एम ५, बीएमडब्ल्यू एक्स ६, ऑडी, रेंज रोव्हर, लेक्सस एलएक्स ४७०, टोयोटा लँड क्रूझर अशा अनेक महागड्या कार्स आहेत. अनेकदा तो सायकलवरूनही मुंबईच्या रस्त्यावर फिरतो.

गेल्या कित्येक वर्षांपासून त्याने एक ब्रेसलेट घातले आहे ज्यामध्ये नीलमणीचा दगड आहे. सलमानचा असा विश्वास आहे की ते केवळ त्याच्यासाठी भाग्यवानच नाही तर नजर लागण्यापासूनही वाचवते. इंडस्ट्रीत अनेक नायिका सलमानपेक्षा उंच आहेत. यासाठी अनेकदा त्या त्याची खिल्लीही उडवितात. सलमान म्हणतो की तो अभिनय करतच नाही. तो जसा आहे तसाच पडद्यावरही दाखवतो. आहे आणि प्रेक्षकांनाही हेच आवडते.

जेव्हा जेव्हा तो चित्रपटांमध्ये टी-शर्ट काढतो तेव्हा त्याची तब्येत पाहून प्रेक्षक थिएटर डोक्यावर घेतात. तसं सलमानला जिममध्ये जायला फारसं आवडत नाही, फिल्म इंडस्ट्रीत काम करायचे तर तंदुरुस्त राहावेच लागते. म्हणून तो दररोज जिममध्ये जातो. मुंबईशिवाय त्याला लंडनसुद्धा आवडते.

स्टार मराठीच्या सर्व टीम तर्फे सलमान खानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment