सलमान खान आहे रिलेशनशिपमध्ये, स्वतः शो दरम्यान केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडची क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ हिचे नुकतेच एक महिन्यापूर्वी लग्न झाले. त्यामुळे आपल्या सल्लू भाईजान च्या फॅन्सना मात्र कतरिनाचा चांगलाच संताप आला. अर्थातच बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दमदार वजनाचा आपला हा स्टार सलमान खान याला आपला लाईफ पार्टनर न बनवता तिने स्वतःसाठी विक्की कौशलची निवड केली. असो..शेवटी प्रत्येकाची आपली आपली आवङ असते.

आतापर्यंत सलमान खान च्या ऐश्वर्या राय पासून ते अगदी कतरिना कैफ पर्यंत अशा अनेक अभिनेत्रींसोबत अफेयर्सच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे तो केव्हा आणि कुणासोबत बरं लग्न करणार, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचप्रमाणे आपला दबंग स्टार सलमान खान हा नक्की कुणासोबत तरी एगेंज आहे का? असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना नेहमीच सतावतो. तर मित्रांनो बिग बॉस 15 च्या सेटवर या प्रश्नाचे उत्तर आपल्या सल्लू भाईजानने दिले आहे.

See also  अभिनेत्री राखी सावंत आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील...

बिग बॉस 13 ची सर्वांची फेवरेट स्पर्धक शहनाज गिल हिने बिग बॉस 15 मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तिच्याशी बोलताना अखेर सलमानने आपल्या लवलाईफचा खुलासा केला आहे. सध्या सोशल मीडियावर शहनाज गिल आणि सलमान खानचा एक व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे. यामध्ये शहनाज मुद्दामच सलमानची मस्करी करताना म्हणते की,”मी तर पंजाबच्या कतरिना कैफ पासून आता इंडियाची शहनाज गिल झाली आहे. तर कतरिना कैफ आता पंजाबची झाली आहे.” असे ती म्हणते.

हे ऐकल्यावर सलमान म्हणतो की, “सगळे असेच राहू दे. कतरिनाचे लग्न विक्की कौशल सोबत झाले आहे, ही चांगली गोष्ट आहे.” यावर शहनाज गिल म्हणते की,”तुम्ही फक्त खुश राहा सर…” त्यानंतर सलमान म्हणतो की,”हो मी तर ठीक आहे आणि लवकरच आणखी ठीक होईल.” सलमानचे हे शब्द ऐकून शहनाज गिल लगेच त्याला विचारते की,”सर तुम्ही कमिटेड आहात का??” तर त्यावर तो चक्क “हो” असे उत्तर देतो.

See also  'कुछ कुछ होता है' चित्रपटातील छोट्या सरदाराने केले लग्न, पत्नीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

पंजाब की कुङी शहनाज गिल आणि सलमान खान यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्यामुळे आता सलमान खान नक्की कुणासोबत कमिटेड आहे, हे सर्वांसाठीच खूप उत्सुकतेचे ठरले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment