“या” दोन गोष्टींमुळे सलमान खान लग्न करत नाही, नेमक्या कोणत्या आहेत बरं ह्या दोन गोष्टी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

दबंग स्टार सलमान खान याचे संपूर्ण जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. सलमान ची एक झलक पाहण्यासाठी अगदी वेडेपिसे होतात. परंतु आपल्या सलमानचे दोनाचे चार हात केव्हा होणार, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहतात. त्यामुळे त्याचे फॅन्स त्याला नेहमीच लग्नाचा प्रश्न विचारत असतात. एकदा एका मुलाखतीमध्ये वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी सुद्धा सलमानला लग्नाविषयीचा प्रश्न विचारला होता.

तेव्हा सलमान खानने आपल्याला लग्न का करायचे नाही, यामागील दोन घटना शेयर केल्या आहेत. त्याने सांगितले की, तुम्हांला माझे वैयक्तिक जीवन तर माहीतच आहे. जोधपुर आणि मुंबई अ’पघा’ताच्या दोन्ही के’स सुरू आहेत. आम्हांला पूर्ण विश्वास आहे की या दोन्ही केस मी जिंकणार आहे. मात्र देव न करो आणि मला शिक्षा झाली तर…..काय होणार. जर मी त्याआधी लग्न केले तर हे योग्य ठरेल का? आपला पती जे’लमध्ये आणि 2,3 आणि 5 वर्षाचे बाळ आपल्या जे’लमधील वङिलांना भेटण्यासाठी आतुर आहे. हे सर्वकाही अयोग्य आहे ना…..त्यापेक्षा ही के’स लवकरच सुटली तर मग नंतर विचार करता येईल.

See also  चित्रपट सृष्टीत येण्या अगोदर अभिनेते धर्मेंद्र करत होते हे काम!

सलीम खान यांचे मत : एका मुलाखती दरम्यान सलीम खान यांना विचारण्यात आले की, सलमान खान लग्न का बरं करत नाही? यावर अगदी मजेशीर अंदाजात उत्तर देत सलीम यांनी म्हटले की,”तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता. परंतु हे मुळीच विचारू नका की सलमान खान लग्न केव्हा करणार. कारण याचे उत्तर माझ्याकडे नाही.”

तसेच दुसर्या एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी म्हटले होते की,”सलमान साठी लग्नाची स्थळे येत नाही, असे काही नाही. एकदा तर लग्नापर्यंत सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. परंतु त्याच्या आईला एक गोष्ट खटकली. त्यामुळे ते स्थळ जमू शकले नाही. शेवटी लग्न होता होता राहून गेले. आता ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. परंतु हा सलमान खानचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे यावर तोच योग्य उत्तर देऊ शकतो.”

See also  "घराचा हप्ता भरायला पण पैसे नाहीत" कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर आली खूपच वाईट वेळ...

साजिद नाङियाङवाला ने शेयर केला होता हा किस्सा : “द कपिल शर्मा” शो मध्ये सलमानचा खूप जवळचा मित्र साजिद नाङियाङवाला याने एक किस्सा शेयर केला होता. त्याने सांगितले की,”मला तर दुसरे लग्न करायचे नव्हते. परंतु सलमान च्या हट्टामुळेच मला पुन्हा लग्न करावे लागले. खरंतर लग्न करण्याची इच्छा तर सलमानची होती. कारण दोघेही खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे लग्न सुद्धा एकाच दिवशी एकाच ठिकाणी करण्याचे ठरवले होते.

पुढे साजिद यांनी म्हटले की,”सलीम खान यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे लग्न करायचे होते. परंतु लग्नाच्या काही दिवसांआधीच सलमान म्हणाला की, माझा लग्न करायचा मूङ नाही. असे म्हणत सलमान तर मागे हटला. परंतु मी मात्र मागे हटू शकलो नाही.”

See also  खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment