22 वर्षांपूर्वी या तारखेला लग्न करणार होता सलमान खान, पण अचानक असं काही घडलं आणि…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मोस्ट पॉप्युलर अभिनेता सलमान खान याचे जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्याच्या चाहत्यांना एकच चिंता नेहमी सतावते, ती म्हणजे सलमान खान लग्न केव्हा करणार? आता तर कतरिनाने सुद्धा आपला बॉयफ्रेंड विक्की कौशल याच्यासोबत लग्न केले आहे. पण मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता सलमान खान हा 22 वर्षांपूर्वी लग्न करणार होता. त्याच्या लग्नाची तारीख सुद्धा ठरली होती, एवढंच काय तर सलमान खान स्वतः लग्न करायला तयार सुद्धा झाला होता. परंतु त्यानंतर अचानक असं काय बरं झालं, ज्यामुळे त्याने लग्नाचा प्लॅन रद्द केला. मात्र त्याने असे का बरं केले, हेच आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
कपिल शर्मा च्या शो मध्ये सलमान खानचा जीवलग मित्र साजिद नाङियाङवाला याने ह्या गोष्टीचा खुलासा केला होता. त्याने सांगितले की, अभिनेता सलमान खान आणि त्याने एकत्र लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर अचानक सल्लू भाईजान च्या मनात एकदिवस आले की साजिद आणि तो लग्न करणार….ते ही एकाच दिवशी. मग शेवटी काय, 18 नोव्हेंबरला त्या दोघांचेही लग्न ठरले. कदाचित तुम्हांला माहीत नसेल, परंतु सलमान खानचे आईवडील सलिम खान आणि सलमा यांचे लग्न देखील 18 नोव्हेंबरलाच झाले होते.
लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर साजिद लग्नाच्या तयारीला लागला. परंतु त्याच्या काही दिवसांपूर्वीच सलमान खान ने साजिद ला कॉल केला आणि म्हटले की, यार माझा लग्न करायचा मूङ नाही. सलमानने तर प्लॅन रद्द केला, परंतु साजिदने त्याच दिवशी लग्न करून घेतले आणि आपला दबंग भाईजान मात्र असाच राहिला.
इतकंच नव्हे तर सलमान खान तर साजिद चे लग्न मोङायच्या सुद्धा तयारीत होता. परंतु तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. या शो मध्ये हा किस्सा सांगताना साजिद नाङियाङवाला याने सांगितले की, माझे लग्न झाल्यावर सलमान जेव्हा मला शुभेच्छा द्यायला आला. तेव्हा तो मला कानात म्हणाला की, अजूनही वेळ आहे, पळायचे असेल तर पळू शकतोस..गाडी बाहेर उभी आहे. त्यानंतर त्याने माझ्या पत्नीला शुभेच्छा दिल्या व निघून गेला.
तुम्हांला माहीत आहे का, अभिनेता सलमान खान हा तेव्हा अभिनेत्री संगीता बिजलानी सोबत लग्न करणार होता. परंतु तेव्हा त्याने लग्न केले नाही. त्यानंतर संगीता बिजलानी हिने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्धीन सोबत लग्न केले आणि बॉलिवूडमधून कायमचा निरोप घेतला.
अभिनेता सलमान खान च्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले तर, त्याचा अंतिम: द फायनल टूथ रिलीज झाला आहे. या चित्रपटात तो आपला मेहुणा आयुष शर्मा सोबत दिसेल. त्यानंतर सलमान खान लवकरच लाल सिंह चङङा, पलटन आणि टायगर- 3 मध्ये दिसणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.